AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवडी ते न्हावा पारबंदर प्रकल्प, देशातील सर्वात लांब सागरी पुलाचं मुख्यमंत्री उद्धाटन करणार

लाँचिंग गर्डरचे वजन 1000 मेट्रिक टन असून लॉचिंग गर्डरची वजन उचलण्याची एकूण क्षमता सुमारे 1400 मेट्रिक टन इतकी आहे

शिवडी ते न्हावा पारबंदर प्रकल्प, देशातील सर्वात लांब सागरी पुलाचं मुख्यमंत्री उद्धाटन करणार
| Updated on: Jan 15, 2020 | 10:54 AM
Share

मुंबई : मुंबई ट्रान्सहार्बर लिंक अर्थात पारबंदर प्रकल्पाअंतर्गत समुद्रातील पुलाच्या पहिल्या गाळ्याच्या उभारणीच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते (Mumbai Trans harbor Link Parbandar) करण्यात येणार आहे. मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर आज हा शुभारंभ होत आहे. प्रकल्पाच्या उभारणीतील हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे.

स्वयंचलित लॉचिंग गर्डरद्वारा पुलाच्या प्रकल्पाच्या पहिल्या स्पॅनची उभारणी होत आहे. या लाँचिंग गर्डरचे वजन 1000 मेट्रिक टन असून लॉचिंग गर्डरची वजन उचलण्याची एकूण क्षमता सुमारे 1400 मेट्रिक टन इतकी आहे. मुंबई पारबंदर प्रकल्पामध्ये मुंबई शहरातील शिवडी आणि मुख्य भूमीवरील न्हावा यांना जोडणाऱ्या सुमारे 22 किमी लांबीच्या सहापदरी (3+3 मार्गिका) पुलाचा अंतर्भाव आहे.

या पुलाची समुद्रातील लांबी सुमारे 16.5 किमी असून जमिनीवरील पुलाची एकूण लांबी सुमारे 5.5 किमी इतकी आहे. या पुलाला मुंबई शहरातील शिवडी आणि मुख्य भूमीवरील शिवाजी नगर आणि राष्ट्रीय महामार्ग 4 ब वर चिर्ले गावाजवळ आंतरबदल (इंटरचेंजेस) प्रस्तावित आहेत.

हा भारतातील सर्वात जास्त लांबीचा समुद्रावरील पूल ठरणार आहे. हा प्रकल्प जपान आंतरराष्ट्रीय सहकार संस्थेच्या (JICA) कर्ज सहाय्याने राबवण्यात येत आहे. प्रकल्पाचे बांधकाम हे तीन स्थापत्य कंत्राटांद्वारे आणि एका इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टीम कंत्राटाद्वारे करण्यात येणार आहे. पुलाच्या पायाचे आणि स्तंभांच्या उभारणीचे काम प्रगतिपथावर आहे. त्याचप्रमाणे सेगमेंट कास्टिंग आणि तात्पुरत्या पुलाच्या उभारणीचे कामही वेगाने सुरु आहे.

प्रकल्पाचा बांधकाम कालावधी सुमारे साडेचार वर्षांचा असून त्यानुसार सप्टेंबर 2022 पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन (Mumbai Trans harbor Link Parbandar) आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.