AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, सात तलावांमध्ये फक्त 33 टक्के पाणीसाठा शिल्लक, अन्यथा…

मुंबईच्या सात प्रमुख जलाशयांमधील पाणीसाठा फक्त ३३% शिल्लक आहे. वाढत्या शहरीकरणामुळे पाण्याची मागणी वाढली आहे, तर अपुऱ्या पावसामुळे साठा कमी झाला आहे. पाणीटंचाई टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे.

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, सात तलावांमध्ये फक्त 33 टक्के पाणीसाठा शिल्लक, अन्यथा...
Mumbai water crisisImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 06, 2025 | 8:25 AM
Share

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांतील पाणीसाठा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. सध्या या सात तलावांमध्ये फक्त ३३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे लवकरच मुंबईकरांवरील पाणी संकटाचे सावट अधिक गडद झाले आहे. मुंबईतील तलावांमधील पाणीपातळी कमी झाल्याने लवकरच पाणी कपातीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.

पाऊस लांबणीवर पडणार

मुंबईला मोडक सागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार आणि भातसा या सात तलावातून दररोज ३८५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील वाढते औद्योगिकीकरण आणि शहरीकरण यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. मुंबईतील तलावातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा केला जात आहे. त्यातच हवामानातील बदलांमुळे पाऊस लांबणीवर पडल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे.

सध्याच्या पाणीसाठ्याची आकडेवारी

मुंबईकर गेल्या वर्षापासूनच १० ते २० टक्क्यांपर्यंत पाणी कपातीचा सामना करत आहेत. सध्याच्या पाणीसाठ्याची आकडेवारी पाहिल्यास अप्पर वैतरणा जलाशयात ९२ हजार ३५ दशलक्ष लिटर, मोडक सागरमध्ये ३० हजार २६० दशलक्ष लिटर, तानसामध्ये ३८ हजार ६६० दशलक्ष लिटर, मध्य वैतरणामध्ये ७५ हजार ५८५ दशलक्ष लिटर, भातसामध्ये सर्वाधिक २ लाख ३८ हजार ९५९ दशलक्ष लिटर, विहारमध्ये १२ हजार ३९० दशलक्ष लिटर आणि तुळशीमध्ये सर्वात कमी ३ हजार ५५० दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे.

राखीव कोट्यातील पाणीसाठा देण्याची मागणी

मुंबईतील पाणीसाठ्याची स्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. या गंभीर परिस्थितीत मुंबई महानगरपालिकेने राज्य सरकारच्या अखत्यारीतील वैतरणा आणि भातसा या मोठ्या पाणी प्रकल्पांमधून राखीव कोट्यातील पाणीसाठा देण्याची मागणी केली आहे. महापालिकेने याबाबत मागणी करुन तीन आठवडे उलटले आहेत. तरी राज्य सरकारचा हा निर्णय प्रलंबित ठेवला आहे. त्यामुळे मुंबईतील पाणी संकट अधिक गडद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच राज्य सरकार यावर कधी निर्णय घेणार आणि तातडीने निर्णय घेणार का? याकडे आता मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

लवकरच पाणी संकट ओढावणार

सध्या मुंबईतील धरणांचा पाणीसाठ ३३ टक्क्यांवर आला आहे. कडक उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन होतं आहे. यंदाचा पाऊस लांबला तर मुंबईकरांवर पाण्याचे संकट ओढवणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. पाणी पुरवठा खात्याचा राखीव पाणी वापरासाठी पाठपुरवठा करणे सुरू आहे. मुंबईच्या ७ धरणांमध्ये फक्त पाच लाख सात हजार ४४५ दशलक्ष पाणीसाठा म्हणजेच ३३ टक्के पाणी शिल्लक आहे. त्यामुळे लवकरच पाणी संकट ओढावणार असल्याचे दिसत आहे.

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.