AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मतदारांची नावे ठेवण्यासाठी हिरवा पेन, नावं काढण्यासाठी लाल पेन, वरून आदेश; जयंत पाटील यांचा खळबळजनक आरोप

जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगावर मतदार यादीत गंभीर हेराफेरीचा आरोप केला आहे. 'सोयीची' नावे हिरव्या तर 'गैरसोयीची' लाल पेनाने वगळण्याचे आदेश दिले जात असल्याचा दावा त्यांनी केला.

मतदारांची नावे ठेवण्यासाठी हिरवा पेन, नावं काढण्यासाठी लाल पेन, वरून आदेश; जयंत पाटील यांचा खळबळजनक आरोप
| Updated on: Oct 15, 2025 | 2:13 PM
Share

राज्यातील प्रमुख विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाची मुख्य निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतली. या भेटीनंतर नुकतीच विरोधी पक्षाची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप केले आहेत. मतदारांची नावे नोंदवण्यासाठी हिरवा पेन आणि नावे वगळण्यासाठी लाल पेन वापरण्याचे वरुन आदेश असल्याचा खळबळजनक दावा जयंत पाटील यांनी केला आहे.

या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगासोबतच्या बैठकीदरम्यान नेमकं काय घडलं, याबद्दलची माहिती राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी दिली. सोयीचे नावे हिरव्या पेनाने मार्क करा आणि गैरसोयीची नावे लाल पेनाने मार्क करण्याचे आदेश देण्यात आले आणि नावे डीलिट केली असा आरोप जयंत पाटील यांनी केला.  जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगावर तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा आणि त्यांना बासनात गुंडाळल्याचाही आरोप केला. यावेळी त्यांनी अनेक पुरावेही सादर केले.

साधी चौकशीही केली नाही

आम्ही १९ ऑक्टोबरला कार्यालयात नेऊन पत्र दिलं. आमचे प्रतिनिधी म्हणून जितेंद्र आव्हाड भेटले. पण त्याची दखल घेतली नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाला एक महिना आधी विधानसभेच्या पत्र दिलं होतं. नालासोपारा येथील सुषमा गुप्ता प्रकरणाचा उल्लेख करत ते म्हणाले की, १२ ऑगस्टची घटना आहे. निवडणूक आयोगाने याची साधी चौकशीही केली नाही. मुरबाड मतदारसंघात घरासमोर फक्त ‘डॅश’ लिहिलेली ४०० घरे आहेत. पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये ८६९ मतदार एकाच ठिकाणी आहेत, तर मध्य नाशिकमध्ये ३८२९ क्रमांच्या घरात ८१३ मतदार आहेत. “हे सर्व पुरावे आहेत. मी हवेत बोलत नाही, असे जयंत पाटील म्हणाले.

शिरूरचे आमदार अशोक पवार यांच्या मतदारसंघातील एका घटनेचा उल्लेख करताना जयंत पाटील यांनी गंभीर माहिती दिली. पवार यांनी हरकतीमध्ये घर क्रमांक एक दाखवला, ज्यात १८८ मतदार दाखवले होते, पण ते घर गावातच नव्हते. यावर तक्रार केल्यावर मतदाराची प्रायव्हसी डिस्टर्ब होते म्हणून माहिती देऊ शकत नाही,” असे उत्तर निवडणूक अधिकाऱ्याने दिल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली.

निवडणूक आयोगाच्या हातात यंत्रणा नाही

आम्हाला निवडणूक आयोगाने उत्तर द्यावं. ही भाजपच्या विरोधातील मोहीम नाही. भाजपच्या प्रवक्त्यांनी उत्तरे देऊ नये. मतदार याद्यात दुसरा कोणी तरी नाव घालतो. नाव काढतो. कुणी तरी बाहेरचा व्यक्ती सिस्टिम ऑपरेट करतो. राज्य निवडणूक आयोगाच्या हातात यंत्रणा राहिली नाही, असा आमचा समज झाला आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.