एनसीबीने जावयाच्या घरी धाड टाकल्यानंतर नवाब मलिक म्हणाले….

एनसीबीने आज सकाळी समीर खान यांच्या घरी धाड टाकली असून त्याठिकाणी शोधाशोध सुरु आहे. | Nawab Malik

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 9:55 AM, 14 Jan 2021
Nawab Malik reaction on NCB action against Son in law Samir Khan in Drugs case

मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) पथकाने गुरुवारी सकाळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे जावई समीर खान (Samir Khan) यांच्या घरावर धाड टाकली. सध्या एनसीबीकडून याठिकाणी महत्त्वाच्या पुराव्यांची शोधाशोध सुरु आहे. या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी एक ट्विट केले आहे. (Nawab Malik son in law Samir Khan Residence NCB raid)

यामध्ये नवाब मलिक यांनी म्हटले आहे की, कोणीही कायद्यापेक्षा मोठा नसतो. कोणत्याही भेदभावाशिवाय हा नियम सगळ्यांना लागू झाला पाहिजे. कायदा त्याचं काम करेल आणि न्याय नक्की मिळेल. मला न्यायसंस्थेविषयी पूर्ण आदर आणि विश्वास असल्याचे नवाब मलिक यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

नवाब मलिकांच्या जावयाला का अटक?

ब्रिटिश नागरिक असलेला ड्रग्ज सप्लायर करण सजनानी केसमध्ये समीर खान यांना अटक झाली आहे. एनसीबीच्या सूत्रांच्या माहितीनुसार करण सजनानी आणि समीर खान या दोघांमध्ये ड्रग्जबाबत झालेले चॅट आणि पैशांच्या देवाणघेवाणीचे पुरावे सापडले आहेत.

किरीट सोमय्यांचा नवाब मलिकांवर हल्लाबोल

नवाब मलिक यांचे जावई आणि ‘ड्रग्जचा लॉर्ड’ समीर खान यांना एनसीबीने अटक केली आहे. आता मलिक यांनी ठाकरे सरकारमधून पायउतार व्हावे, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.

समीर खान रडारवर का?

समीर खान हे नवाब मलिक यांची कन्या निलोफर यांचे पती आहेत. समीर खान यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) समन्स बजावले होते. ड्रग्ज प्रकरणातील संशयित करण सजनानी यांच्यासोबत समीर खान यांचा गुगल पे द्वारे 20 हजार रुपयांचा व्यवहार झाला होता. सजनानी याने ड्रग्ज पुरवल्यामुळे समीर यांनी त्यांना 20 हजार रुपये गुगल पे द्वारे पैसे पाठवल्याचा आरोप आहे.

मुच्छड पानवाला ड्रग्ज प्रकरणाची चौकशी सुरु असताना हा व्यवहार समोर आला. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एनसीबीने समीर यांना बोलावलं होतं. या प्रकरणी काल (बुधवार) सकाळपासून त्यांची चौकशी सुरु होती. संध्याकाळी समीर खान यांना एनसीबीने अटक केली.

संबंधित बातम्या :

नवाब मलिक यांच्या जावयाकडून ड्रग्ज सेवन, आमच्याकडे पुरावे, एनसीबी अधिकाऱ्याचा दावा

नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना अटक; एनसीबीकडून 10 तास कसून चौकशी

(Nawab Malik son in law Samir Khan Residence NCB raid)