AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लगता है मोहतरमा मलाणा क्रिम लेकर ज्यादा बोल रही है, कंगनाचा पद्मश्री काढून घ्या; नवाब मलिक आक्रमक

लगता है मोहतरमा मलाणा क्रिम लेकर ज्यादा बोल रही है, ओव्हर डोस ज्यादाही हो गया है, असं सांगतानाच कंगनाचा पद्मश्री काढून घ्या, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.

लगता है मोहतरमा मलाणा क्रिम लेकर ज्यादा बोल रही है, कंगनाचा पद्मश्री काढून घ्या; नवाब मलिक आक्रमक
nawab malik
| Edited By: | Updated on: Nov 12, 2021 | 11:58 AM
Share

मुंबई: अभिनेत्री कंगना रणावतने स्वातंत्र्याबद्दल केलेल्या विधानाचा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी निषेध नोंदवला आहे. लगता है मोहतरमा मलाणा क्रिम लेकर ज्यादा बोल रही है, ओव्हर डोस ज्यादाही हो गया है, असं सांगतानाच कंगनाचा पद्मश्री काढून घ्या, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली आहे. 1857 पासून या देशात स्वातंत्र्याचं आंदोलन सुरू झालं. त्यानंतर लाखो लोकांनी प्राणाची आहुती दिली. गांधींनी मोठा लढा दिला. शेवटी ब्रिटीशांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं. त्यानंतर एक अभिनेत्री मलाणा क्रिम घेऊन ओव्हर डोस झाल्यावर काही तरी बोलत आहे. त्यामुळे त्यांचा पद्मश्री मागे घेतला जावा. या अभिनेत्रीने कोरोडो भारतवासियांचा अपमान केला आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. त्यांना अटक करा, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली.

माजी मंत्र्याकडून मंदिराच्या जमिनीचा घोटाळा

यावेळी त्यांनी मागच्या सरकारमधील एका मंत्र्यावरही गंभीर आरोप केला. फडणवीस सरकारमधील एका मंत्र्याने मंदिराच्या जमिनीचा घोटाळा केला होता. त्याचे पुरावे मी लवकरच देणार आहे. भाजपवाले कसे घोटाळे करत होते हे राज्यातील जनतेला दिसेल, असं त्यांनी सांगितलं.

ईडीच्या कारवायांना घाबरणार नाही

यावेळी त्यांनी कालच्या ईडीच्या छापेमारीवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. वक्फ बोर्डावर छापे पडले नाही. वक्फ बोर्डाशी संबंधितांच्या कार्यालयावर छापे पडले आहेत. त्याचं आम्ही स्वागत करतो. पुण्यातील एक ट्रस्ट आहे. ताबूत इनाम एंडोमेंट ट्रस्टवर कारवाई झाली. त्यात पुण्यात एमआयडीसीत पाच हेक्टर 51 आर जमीन अॅक्विजेशन करून ऑफिसरकडे पैसे जमा केले. इम्तियाज हुसैन शेख आणि इतर ट्रस्टींनी त्यांना 7 कोटीच्या 76 लाख 98 हजार 250 रुपये ताब्याचे पैसे दिले. मात्र कागदपत्रानुसार 9 कोटी 64 लाख 42 हजार 500 रुपये हे अॅक्विजेशनचे पैसे जिल्हाधिकाऱ्याकडे जमा होते. एका बनावट कागदपत्राद्वारे ही रक्कम आपल्या अकाउंटमध्ये घेतले. त्यानंतर वक्फ बोर्डाला माहिती मिळाल्यानंतर जी एनओसी त्यांनी दाखल केली. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिस शेख यांनी पुण्याचे ज्वॉइंट सीईओ खुसरो यांच्या माध्यमातून 13 ऑगस्ट 2021 रोजी पुण्याच्या बंड गार्डनमध्ये एफआयआर दाखल केला. त्यानंतर पाच लोकांना अटक झाली. त्यात चांद रमजान मुलानी, इम्तियाज महम्मद हुसैन शेख, अॅड कलिम सय्यद, राजगुरू आणि कांबळे आदींना अटक करण्यात आली आहे, असं त्यांनी सांगितलं. तसेच ईडीच्या कारवायांना मलिक घाबरणार नाही. आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करू नका, असा इशाराही त्यांनी दिला.

एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा

यावेळी त्यांनी एसटी कामगारांना संप मागे घेण्याचं आवाहन केलं. एसटी कामगार संप करत आहेत. त्यांच्या काही मागण्या आहेत. त्यावर तोडगा काढण्याचं काम संबंधित खात्याचे मंत्री करत आहेत. मुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणात लक्ष घातलं आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर लवकर तोडगा निघेल अशी आशा आहे, असं त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

भाजपच्या माजी मंत्र्याकडून मंदिराच्या जमिनीचा घोटाळा, लवकरच पुरावे देणार; नवाब मलिकांच्या आरोपांनी खळबळ

अनिल देशमुखांची ईडी कोठडी संपणार, जामीन मिळणार का?

मित्राचा वाढदिवस साजरा करुन घरी परतणाऱ्या 3 तरुणांचा अपघात, डंपरच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.