शरद पवार आज राजनाथ सिंह यांची भेट घेणार; संरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होणार

लोकसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज दुपारी 4 वाजता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेणार आहेत. (NCP chief sharad pawar to meet rajnath singh today)

शरद पवार आज राजनाथ सिंह यांची भेट घेणार; संरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होणार
rajnath singh
Follow us
| Updated on: Jul 16, 2021 | 11:52 AM

मुंबई: लोकसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज दुपारी 4 वाजता दिल्लीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेणार आहेत. या भेटीत ते राजनाथ सिंह यांच्याशी संरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहेत. त्यामुळे पवार-राजनाथ सिंह यांच्या भेटीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. (NCP chief sharad pawar to meet rajnath singh today)

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि माजी संरक्षण मंत्री शरद पवार तसेच काँग्रेस नेते आणि माजी संरक्षण मंत्री एके अँटोनी हे आज दुपारी 4 वाजता दिल्लीत राजनाथ सिंह यांची भेट घेणार आहेत. या भेटीत संरक्षण विषयक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. अधिवेशनाच्या तोंडावर भाजपकडून विरोधकांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. पवार-राजनाथ सिंह यांच्या आजच्या भेटीकडे त्याच दृष्टीने पाहिले जात आहे. या भेटीत इतर राजकीय विषयावरही चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संरक्षणाच्या मुद्द्यावरून धारेवर धरणार

दरम्यान, थोड्याच वेळापूर्वी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी नागपूरमध्ये मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लोकसभा अधिवेशनात सरकारला संरक्षणाच्या मुद्द्यावरून धारेवर धरणार असल्याचा इशारा दिला होता. दिल्लीतील पावसाळी अधिवेशनात महागाई, शेतकऱ्यांचा प्रश्न, कोरोना, चीनच्या सीमेवर काय चाललंय या मुद्द्यांवर चर्चा होणार, असल्याचंही त्यांनी सांगितलं.

संसंदेचं पावसाळी अधिवेशन 19 जुलैपासून

संसंदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलैपासून सुरू होणार आहे. तर, मान्सून सत्राचा समारोप 13 ऑगस्टला होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पावसाळी अधिवेशनात 20 दिवस कामकाज चालण्याची शक्यता आहे. तर, स्वातंत्र्यदिनापूर्वी संसदेचं पावसाळी अधिवेशन समाप्त होईल. पावसाळी अधिवेशनात कोरोना नियमांचं पालन केलं जाणार आहे. पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ज्यांनी कोरोना लस घेतली नाही ते खासदार कोरोना लसीचा पहिला डोस घेतील अशी शक्यता आहे.

किती खासदारांनी लस घेतली?

लोकसभेच्या एकूण सदस्यांपैकी 320 खासदारांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. तर, दुसरीकडे 124 खासदारांनी खासदारांनी एक डोस घेतला आहे. तर, आतापर्यंत 96 खासदारांनी आतापर्यंत एकही डोस घेतलेला नाही. तर, कोरोना लसीकरणाची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. (NCP chief sharad pawar to meet rajnath singh today)

संबंधित बातम्या:

लोकसभा आणि राज्यसभेच्या किती खासदारांनी कोरोना लस घेतली? एकही डोस न घेतलेले किती खासदार?

Special Report | कोरोनापासून फक्त लसच वाचवू शकते!

लसीकरण या एकाच मंत्राने तिसरी लाट थोपवता येईल, आरोग्यमंत्र्यांचं जनतेला आवाहन

(NCP chief sharad pawar to meet rajnath singh today)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.