AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange Patil : मुख्यमंत्र्यांसोबत अजितदादा नसल्याने चर्चांना उधाण, त्यावर राष्ट्रवादीच्या नेत्याने म्हटलं….

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण अखेर आज सुटलं. तब्बल 17 दिवसापासून हे उपोषण आंदोलन सुरु होतं. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंद आंतरवाली सराटी गावात गेले. त्यांच्यासोबत अजित पवार असतील, अशी चर्चा होती.

Manoj Jarange Patil : मुख्यमंत्र्यांसोबत अजितदादा नसल्याने चर्चांना उधाण, त्यावर राष्ट्रवादीच्या नेत्याने म्हटलं....
Eknath Shinde-Ajit Pawar
| Edited By: | Updated on: Sep 14, 2023 | 11:53 AM
Share

मुंबई : मागच्या 17 दिवसांपासून सुरु असलेलं मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण अखेर आज सुटलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंतरवाली सराटी गावामध्ये जाऊन मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढली. मुख्यमंत्र्यांच्या हातून ज्यूस पिऊन जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं. “उपोषण सुटलं ही फार चांगली बाब आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या ठिकाणी पोहचले आहेत आणि ज्यूस पीऊन जरंगे पाटील यांनी उपोषण सोडलंय. ही महाराष्ट्रासाठी, मराठा बांधवांसाठी अत्यंत चांगली बाब आहे” असं दिलीप वळसे-पाटील म्हणाले. “मराठा आरक्षण द्यावे ही सरकारची भूमिका आहे. त्यात काही तांत्रिक अडचणी आहेत. त्या तांत्रिक अडचणी देखील लवकरच महाराष्ट्र सरकारकडून दूर होतील असा आम्हाला विश्वास आहे” असं दिलीप वळेस पाटील म्हणाले.

“सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरक्षण कसे टिकेल? कसं टिकवलं जाईल? कोर्टामध्ये काय होईल? यावर आता सध्या मी भाष्य करू शकणार नाही, पण कायदेशीररित्या यासाठी नक्कीच शासन दरबारी प्रयत्न केले जातील आणि मराठ्यांना न्याय दिला जाईल” असं दिलीप वळेस पाटील यांनी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आंतरवाली सराटी गावात जातील अशी चर्चा होती. पण प्रत्यक्षात मुख्यमंत्री एकटेच गेले, त्यामुळे चर्चांना उधाण आलय. “अजित दादा जावो किंवा मुख्यमंत्री जावो, गोष्ट एकच आहे. दोघे राज्याचे प्रतिनिधित्व करत आहेत. आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सरकारचा एक महत्वाचा भाग म्हणून तिथे गेलेले आहेत” असं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं. ‘काम होत आहे, हे महत्त्वाच आहे’

“अजित पवार आज मंत्रालयात आहेत. विविध कामांचा ते या ठिकाणी आढावा घेत आहेत. महाराष्ट्रातील विविध घडामोडी या ठिकाणी घडतात. बऱ्याच बैठका लावण्यात आलेल्या आहेत. या सगळ्या बैठका अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली होणार आहेत. महाराष्ट्र पुढे जातोय, काम होत आहे, हे महत्त्वाच आहे” असं दिलीप वळेस पाटील यांनी सांगितलं.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?