‘कोरोना’ग्रस्त पोलिसाशी संपर्क, मंत्री जितेंद्र आव्हाड सेल्फ क्वारंटाईन

जितेंद्र आव्हाड यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे, परंतु खबरदारीचा उपाय म्हणून ते घरात 'सेल्फ क्वारंटाइन' झाले आहेत (Jitendra Awhad Self Quarantine amid Corona)

'कोरोना'ग्रस्त पोलिसाशी संपर्क, मंत्री जितेंद्र आव्हाड सेल्फ क्वारंटाईन

मुंबई : महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःला ‘क्वारंटाइन’ केलं आहे. ‘कोरोना’ग्रस्त पोलिसाशी संपर्कात आल्यामुळे आव्हाड यांनी ‘सेल्फ क्वारंटाइन’ होण्याचा पर्याय स्वीकारला आहे. (Jitendra Awhad Self Quarantine amid Corona)

मंत्री जितेंद्र आव्हाड हे मुंब्र्यातील ‘कोरोना’ पॉझिटिव्ह पोलिसाच्या संपर्कात आले होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी घरात ‘सेल्फ क्वारंटाइन’ होण्याचा निर्णय घेतला आहे. आव्हाड यांची टेस्ट ही निगेटिव्ह आली आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील मंत्र्याने खबरदारीसाठी ‘सेल्फ क्वारंटाइन करण्याची ही पहिली वेळ असेल.

संबंधित ‘कोरोना’ग्रस्त पोलिसाच्या संपर्कात आलेले इतर पोलिस कर्मचारी, पत्रकार, अधिकाऱ्यांच्याही ‘कोरोना’ चाचण्या केल्या जात आहेत. एका इंग्रजी वृत्तवाहिनीने केलेले ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी रिट्वीट केल्यामुळे या वृत्ताला दुजोरा मिळत आहे.

गेल्याच आठवड्यात जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या कळवा मुंब्रा मतदारसंघात जाऊन नागरिकांना घरी बसण्यास बजावलं होतं. जीवाशी खेळू नका, घराबाहेर पडाल, तर 14 दिवस तुरुंगात पाठवण्याची तरतूद केली आहे, अशी ताकीदच त्यांनी दिली होती.

‘जर आपण त्याच्या वरती जाऊन घरातून बाहेर पडणार असाल, तर तुम्हाला 14 दिवसांसाठी जेलमध्ये टाकण्याची तरतूद करण्यात आली आहे. जानकीनगरमधल्या माझ्या बंधू भगिनींनो, मी तुमचा जितेंद्र आव्हाड बोलतोय. मी स्वतः जानकीनगरमध्ये आलो आहे, तुम्हाला समजवायला. याच्यापुढे जानकीनगर संपूर्ण सील करण्यात येईल आणि एकाही माणसाला घराच्या बाहेर पडू देणार नाही.’ असं आव्हाड म्हणाले होते.

(Jitendra Awhad Self Quarantine amid Corona)

Published On - 11:15 am, Mon, 13 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI