राष्ट्रवादीकडून राज्यपालांना संविधानाची प्रत भेट!, पदाची जाणीव करुन देण्याचा प्रयत्न – परांजपे

ठाणे: राज्यातील मंदिरं उघडण्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राचा निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं खास गांधीगिरी दाखवलीय. ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यपाल कोश्यारी यांना पोस्टाद्वारे संविधानाची प्रत पाठवण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेश चिटणीस सुहास देसाई यांच्या उपस्थितीत ही गांधीगिरी करण्यात आली. (NCP presents a copy of Constitution […]

राष्ट्रवादीकडून राज्यपालांना संविधानाची प्रत भेट!, पदाची जाणीव करुन देण्याचा प्रयत्न - परांजपे
सागर जोशी

|

Oct 14, 2020 | 3:06 PM

ठाणे: राज्यातील मंदिरं उघडण्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राचा निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं खास गांधीगिरी दाखवलीय. ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यपाल कोश्यारी यांना पोस्टाद्वारे संविधानाची प्रत पाठवण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेश चिटणीस सुहास देसाई यांच्या उपस्थितीत ही गांधीगिरी करण्यात आली. (NCP presents a copy of Constitution to the Governor)

ncp protest

राज्यपाल कोश्यारी यांनी राज्यातील मंदिरं सुरु करण्यासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. त्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. धार्मिकस्थळं उघडली नाहीत म्हणून लगेच सेक्यूलर ठरवून अवहेलना करणार काय? असा सवाल पवारांनी मोदींना केला आहे. त्याचबरोबर राज्यपालाचं वागणं संविधानाच्या चौकटीबाहेरील असल्याची तक्रारही पवारांनी केलीय.

शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठवल्यानंतर आता राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्तेही आक्रमक झालेत. ठाणे शहरातील मुख्य टपाल कार्यालयात दाखल होत आनंद परांजपे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राज्यपालांना संविधानाची प्रत पाठवून दिली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी संविधानाचा विजय असो अशी घोषणाबाजीही केली.

‘भारतीय लोकशाही ही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून दिली आहे. संविधानाच्या प्रास्ताविकेतील ‘धर्मनिरपेक्षता’ हा शब्द राज्यपालांना दाखवून देण्यासाठी संविधानाची प्रत सविनय पाठवत आहोत. भारत हे धर्माधिष्ठीत राष्ट्र नसून धर्मनिरपेक्ष आहे, हे सांगण्यासाठीच त्यांना संविधानाची प्रत आदरयुक्त पाठवत असल्याचं यावेळी आनंद परांजपे म्हणाले.

राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांचं खरमरीत उत्तर!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या पत्राला उत्तर देताना खरमरीत शब्दांचा वापर केला आहे. “माझ्या हिंदुत्वाचा आपण जो उल्लेख केला, तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही” अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

संबंधित बातम्या: 

राज्यपालांच्या ‘त्या’ पत्रावरुन जोरदार घमासान!, पवारांची मोदींकडे तक्रार, तर शेलारांकडून राज्यपालांची पाठराखण

हे सरकार मिनिमम कॉमन हिंदुत्वावर गेलंय, संदीप देशपांडेंचा टोला

राज्यपालांनी राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वांना हात घातला, काँग्रेसची टीका

NCP presents a copy of Constitution to the Governor

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें