सोमय्यांनी राजकारण सोडून ज्योतिषाचा धंदा सुरू करावा; राष्ट्रवादीचा हल्लाबोल

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करून आयकर विभागाने अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची 100 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केल्याचा दावा केला होता. (ncp reply to kirit somaiya over allegations of chhagan bhujbal's Property Seized by Income Tax)

सोमय्यांनी राजकारण सोडून ज्योतिषाचा धंदा सुरू करावा; राष्ट्रवादीचा हल्लाबोल
Kirit Somaiya

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करून आयकर विभागाने अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची 100 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केल्याचा दावा केला होता. त्यावर राष्ट्रवादीने पलटवार केला आहे. सोमय्या यांनी राजकारण सोडून ज्योतिषाचा धंदा सुरू करावा, अशी टीका राष्ट्रवादी प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. (ncp reply to kirit somaiya over allegations of chhagan bhujbal’s Property Seized by Income Tax)

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर व कुटुंबावर किरीट सोमय्या यांनी ट्विटद्वारे आरोप केले असून या आरोपाचा महेश तपासे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. अल जेब्रिया कोर्टा संदर्भात किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत भुजबळांवर आरोप केला आहे. मात्र या इमारतीचे मालक अर्शद सिद्दीकी यांनी या मालमत्तेच्या व्यवहारासोबत भुजबळ किंवा त्यांच्या कुटुंबाचा संबंध नाही असे स्पष्टीकरण दिले आहे, असे तपासे म्हणाले.

बदनामी करणं थांबवा

दरम्यान भाजप नेते वारंवार असे बेछूट आरोप करून महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना बदनाम करत आहेत. राजकारण करावे परंतु वस्तुस्थिती काय आहे हे समजून आरोप केले तर उचित होईल. एखाद्या नेत्याला बदनाम करण्याचे कटकारस्थान ताबडतोब थांबवावे, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

सोमय्यांचा आरोप काय?

किरीट सोमय्या यांनी ट्विट करत भाजपवर गंभीर आरोप केले होते. ठाकरे सरकारचे मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ यांचा 100 कोटींची बेनामी मालमत्ता आयकर विभागाने जप्त केल्या आहेत, असं सोमय्या यांनी म्हटलं होतं.

भुजबळ काय म्हणाले?

सोमय्यांच्या आरोपावर भुजबळांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 100 कोटींच्या इमारतीवर कारवाई होत आहे, त्याच्या सोबत माझं नाव जोडलं गेलं आहे. पण त्या इमारतीच्या मालकाने स्पष्टपणे सांगितलं आहे की, ही मालमत्ता त्यांच्या कंपनीची आहे. भुजबळ कुटुंबियांचा त्याच्याशी काही सबंध नाही. आमच्या केसेस 2005 पासून सुरू आहेत, यात नवीन काही नाही. भाजप असे मंत्र्यांवर कारवाईचे दावे का करतं कळत नाही? तुमच्या यंत्रणा स्वतंत्र आहेत, कोर्ट स्वतंत्र आहे तर तुम्ही कसं म्हणता हे करू?, असा सवाल करतानाच म्हणजे त्या यंत्रणा तुमच्या दबावाखाली काम करत आहेत का? असं म्हणावं लागेल, असं भुजबळ म्हणाले. यंत्रणांना त्यांच काम करू द्या, असंही त्यांनी सांगितलं. (ncp reply to kirit somaiya over allegations of chhagan bhujbal’s Property Seized by Income Tax)

 

संबंधित बातम्या:

नारायण राणेंच्या अटकेसाठी मंत्री अनिल परबांचे फोन, खासदार विनायक राऊत म्हणतात, ‘मग त्यात गैर काय?’

VIDEO : आता भाजपनेही उद्धव ठाकरेंनी केलेलं ‘थोबाड फोडणारं’ वक्तव्य शोधलं, 5 पोलीस ठाण्यात तक्रारी देणार

केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि तरीही अटक, राणे पहिले नाहीत, तिसरे; काय घडलं होतं 2001 साली? वाचा सविस्तर

(ncp reply to kirit somaiya over allegations of chhagan bhujbal’s Property Seized by Income Tax)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI