AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BIG BREAKING | महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष ‘या’ दिवशी ठरणार

राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण असेल याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. शरद पवार यांनी निवड समिती जाहीर केलीय. ही समिती याबाबत अंतिम निर्णय घेणार आहे. या समितीची बैठक 6 मे ला होणार होती. पण शरद पवार यांनी याबाबत एक महत्त्वाची सूचना दिली आहे.

BIG BREAKING | महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष 'या' दिवशी ठरणार
| Edited By: Chetan Patil | Updated on: May 03, 2023 | 5:09 PM
Share

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात सध्याच्या घडीला सारं काही आलबेल नाही. कारण पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षपादाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खळबळ उडाली आहे. शरद पवार यांनी आपल्या राजीनाम्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून केला जातोय. अनेक कार्यकर्त्यांकडून त्यासाठी आंदोलनही केलं जात आहे. कार्यकर्त्यांचा हट्ट पाहता शरद पवार यांनी दोन दिवसांचा कालावधी मागितला आहे. शरद पवार दोन दिवस याबाबत विचार करणार आहेत. त्यानंतर ते आपला निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती समोर आलेली. पण आता खूप मोठी बातमी समोर आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नवा अध्यक्ष कोण असणार? याबाबत 5 मे ला बैठक होणार आहे. शरद पवार यांनी जाहीर केलेल्या निवड समितीची 5 मे ला बैठक होईल. या बैठकीत याबाबत निर्णय होणार आहे. विशेष म्हणजे निवड समितिची 6 मे ला बैठक होणार होती. पण ही बैठक शरद पवार यांनी 5 मे ला घेतली आहे. निवड समितीची बैठक जो निर्णय घेईल तो आपल्याला मान्य असेल, असं शरद पवार यांनी सांगितल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच कार्यकर्ते आणि नेते यांना विश्वासात घेऊन याबाबतचा निर्णय जाहीर करायला हवं होतं हे मला जाणवत आहे, अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली. पण विचारुन राजीनामाची घोषणा केली तर विरोध झाला असता, असंही शरद पवार म्हणाले.

शरद पवार यांची राजीनाम्यानंतरची नेमकी भूमिका काय?

शरद पवार यांची राजीनाम्यानंतरची भूमिका समोर आली आहे. पवारांनी एक खंत व्यक्त केली. “६ मेची बैठक ५ मेलाच घ्या, समिती जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल. मी वरीष्ठांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे होतं, असं मला आता जाणवत आहे”, अशी खंत शरद पवारांनी व्यक्त केली. “जर मी हा निर्णय सर्वांना विचारून घेतला असता तर स्वाभाविकरित्या सर्वांनी मला विरोध केलाच असता. म्हणून मी हा निर्णय माझ्या मनाशी एकमत करून घेतला “, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली.

“१ मे १९६० रोजी मी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेतली होती. त्यामुळे माझं 1 मे शी वेगळं नातं आहे. मी युवक काँग्रेसच्या बैठकीत भाकरी फिरवण्याचं व्यक्तव्य केलं होतं. मी युवकांची मतं विचारात घेणारा नेता आहे. त्यामुळे तुमच्या मतांचा मी आदर करतो . ग्रामीण भागातील युवक आणि युवतींना मुख्य प्रवाहात आणायचे आहे”, असं शरद पवार म्हणाले आहेत.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान