जयंत पाटील यांचा नाराजीचा सूर? प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टच सांगितलं, पडद्यामागे नेमकं काय घडतंय?

"छगन भुजबळ यांनी अभिप्राय व्यक्त केला. तेच सर्व चॅनलने दाखवलं. भुजबळ यांचा तो अभिप्राय होता. पक्षाचं अजून काही ठरलेलं नाही. बैठक जेव्हा होईल तेव्हा मीच निमंत्रक राहणार आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका", असं प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं.

जयंत पाटील यांचा नाराजीचा सूर? प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टच सांगितलं, पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
Follow us
| Updated on: May 03, 2023 | 4:38 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे आज मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे गेले होते. या दरम्यान राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते देखील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे गेले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची आज बैठक असल्याच्या चर्चांना उधाण आलं. दुपारी चार वाजता शरद पवार वाय. बी. चव्हाण सेंटर येथून आपल्या सिल्व्हर ओक निवासस्थानी निघाले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

“आज वाय बी चव्हाण सेंटरला शरद पवार नेहमीप्रमाणे आले. ते नेहमी इथे येतात आणि लोकांच्या भेटीगाठी घेतात. ते नेमहमीप्रमाणे वाय. बी. चव्हाण सेंटरला आले. त्यांनी अनेक मान्यवरांच्या भेटी घेतल्या. राष्ट्रवादी काँग्रेसची आज कोणतीही बैठक बोलावली नव्हती. बैठकीसाठी कोणताही नेते आले नव्हते”, असं प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं.

‘अफवा पसरवू नका’

“आम्ही माध्यमांमध्ये बघितलं की, बैठक होणार किंवा निर्णय होणार. पण तसं काही नाही. आम्ही त्यांना विनंती केलीय. त्यांनी सांगितल्याप्रमाणे दोन दिवस जाऊद्या. कृपया कोणतीही अफवा नको. आजचा दिवस जाऊद्या. उद्या जाऊद्या. आम्ही त्यांना पुन्हा भेटू. विनंती करु. मीटिंग असेल तर आम्ही स्वत: सांगू. पण या विषयी कोणतीही चर्चा करु नका आणि अफवा पसरवू नका”, असं आवाहन प्रफुल्ल पटेल यांनी केलं.

हे सुद्धा वाचा

‘पक्षाचं अजून काही ठरलेलं नाही’

“छगन भुजबळ यांनी अभिप्राय व्यक्त केला. तेच सर्व चॅनलने दाखवलं. भुजबळ यांचा तो अभिप्राय होता. पक्षाचं अजून काही ठरलेलं नाही. बैठक जेव्हा होईल तेव्हा मीच निमंत्रक राहणार आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका. शरद पवार यांनी दोन-तीन दिवस सांगितले आहेत. दोन दिवस थांबूया ना”, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.

‘कदाचित त्यांच्या मनात असेल की…’

“शरद पवार यांनी काल घोषणा केली. जितकं तुम्हाला माहिती होतं तितकंच आम्हाला माहिती होतं. त्यामुळे आम्ही त्यांचा निर्णय ऐकून स्तब्ध झालो. सगळ्यांनी शरद पवारांना आग्रह केला. त्यांची जी मानसिकता आहे, मागे त्यांनी भाकरी फिरवली पाहिजे, असं म्हटलं होतं. पण आम्हाला त्यावेळेसही समजलं नव्हतं. कदाचित त्यांच्या मनात असेल की नवी पुढे समोर आली पाहिजे. हे त्यांच्या मनात असेल. पण आमच्या मनात नाही”, असं पटेल यांनी स्पष्ट केलं.

“शरद पवार हे देशाचे दिग्गज नेते आहेत. त्यांच्या मनात काही वेगळे विचार असतील. त्यामुळे त्यांना दोन दिवसांचा वेळ विचार करायला देऊयात. मी रोहित पवार, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे अनेक नेते आले होते. आम्ही शरद पवार यांना समजवण्याचा प्रयत्न केला”, असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.

जयंत पाटील नाराज?

“जयंत पाटील यांचा नाराजीचा सूर नाही. तुम्ही काल स्वत: ते किती भावनिक होते ते पाहिलं. ते आज त्यांच्या कारखान्याच्या मिटिंगसाठी पुण्यात गेले होते. मी आज इथे आलो ते स्वच्छेने आलो. आम्ही मुंबईला असल्याने साहजिकच आहे की साहेबांबरोबर राहावं. म्हणून आम्ही सगळे आलो. जयंत पाटील संध्याकाळी पुन्हा मुंबईला येतील. पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देऊ नये. कारण आमच्या मनातही तीच भूमिका आहे. आपण सगळ्यांनी धीर ठेवावा”, असं आवाहन प्रफुल्ल पटेल यांनी केलं.

“पक्षात आम्ही सुरवातीपासून काम करतोय. शरद पवारांनी जी जबाबदारी आमच्यावर दिली ती आम्ही पार पाडली. शरद पवार यांच्या राजीनाम्याबाबत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत नवी जबाबदारी कोण असेल ते समोर येत नाही. मी पक्षाच्या अध्यक्षपदासाठी इच्छूक नाही. मला माझ्या पक्षाने भरपूर दिलं आहे. शरद पवार यांचा जो निर्णय होईल त्यानंतरच पुढच्या अध्यक्षाबाबत विचार होईल”, असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.

“तशी परिस्थिती आली तर शरद पवार यांच्या सहमतीशिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. शरद पवार हे पार्टीचे सुप्रीमो आहेत. शरद पवार हेच पक्षाचं सर्व काही आहेत. त्यांचं मार्गदर्शन पक्षाच्या कार्यात नेहमी दिसेल”, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.

Non Stop LIVE Update
तर मी राजीनामा देऊन...., बीडमधील सभेत उदयनराजे भोसले भावूक
तर मी राजीनामा देऊन...., बीडमधील सभेत उदयनराजे भोसले भावूक.
...तर उद्धव ठाकरे लवकरच तुरुंगात दिसतील, अरविंद केजरीवाल यांचा दावा
...तर उद्धव ठाकरे लवकरच तुरुंगात दिसतील, अरविंद केजरीवाल यांचा दावा.
सरकार काय त्यांच्या..., अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत
सरकार काय त्यांच्या..., अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने.
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात.
केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.