महाराष्ट्राबाहेर जाताय? जरा जपून! या ‘अकरा’ राज्यात नो एन्ट्री; कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट दाखवणं बंधनकारक

महाराष्ट्रातून इतर राज्यात नातेवाईकांकडे किंवा काही कामनिमित्त जात असाल तर जपून. (Negative Covid test report is now mandatory to enter several states in India; check full list)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 10:00 AM, 26 Feb 2021
महाराष्ट्राबाहेर जाताय? जरा जपून! या 'अकरा' राज्यात नो एन्ट्री; कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट दाखवणं बंधनकारक

मुंबई: महाराष्ट्रातून इतर राज्यात नातेवाईकांकडे किंवा काही कामनिमित्त जात असाल तर जपून. तुमच्याकडे कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट नसेल तर तुम्हाला दिल्ली, पश्चिम बंगाल, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा या राज्यांसह जम्मू-काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशात तुम्हाला प्रवेश मिळणार नाही. म्हणजे देशातील 9 राज्ये दोन केंद्रशासित प्रदेश मिळून अकरा राज्यात तुम्हाला प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह असाल तर तात्काळ रुग्णालयात जाऊन उपचार घ्या आणि रिपोर्ट निगेटिव्ह असेल तर गरज असेल तरच प्रवास करा. (Negative Covid test report is now mandatory to enter several states in India; check full list)

नागपूरमध्ये रुग्ण वाढताच मध्यप्रदेशचा निर्णय

मध्यप्रदेशात जाण्यासाठी कोरोना निगेटिव्ह रिपोर्टची सक्ती करण्यात आली आहे. रिपोर्ट नसेल तर मध्यप्रदेशात महाराष्ट्रातील प्रवाशांना प्रवेश देण्यात येणार नाही. महाराष्ट्रात विशेषत: नागपूरमध्ये रुग्णवाढ अधिक झाल्याने मध्यप्रदेश सरकारने हा निर्णय घेतला आहे. नागपूर जिल्ह्याला लागून असेलेल्या मध्यप्रदेशमधील छिंदवाडा जिल्ह्यात व्यावसायिक कामानिमित्त दोन्ही राज्यातील नागरिकांच मोठ्या प्रमाणात ये-जा असते या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

दिल्लीत कडक निर्बंध

दिल्ली सरकारनेही महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि पंजाबमधील प्रवाशांना दिल्लीत एन्ट्री करण्यासाठी कोरोना रिपोर्ट बंधनकारक केला आहे. दिल्लीमध्ये फ्लाइट्स, ट्रेन आणि बसमधून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना निगेटि्व्ह रिपोर्ट दाखवणं बंधनकारक करण्यात आलं आहे. हा नियम 15 मार्चपर्यंत लागू राहणार आहे.

पश्चिम बंगालचे नियम 27 फेब्रुवारीपासून

पश्चिम बंगलामध्ये बुधवारपासून राज्यात यायचे असेल तर कोरोनाचे निगेटिव्ह सोबत ठेवणं बंधनकारक केलं आहे. कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट नसेल तर महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक आणि तेलंगनाहून विमानाने येणाऱ्या प्रवाशांना पश्चिम बंगालमध्ये प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा नियम 27 फेब्रुवारीपासून लागू करण्यात येणार आहे. प्रवाशांना विमानतळावरून उड्डाण करण्यापूर्वी 72 तासांत आरटीपीसीआर चाचणी करावी लागणार आहे. म्हणजे त्यांच्याकडील कोरोना रिपोर्ट 72 तासांतीलच असावा, त्या पूर्वीचा नसावा.

कर्नाटकातही मज्जाव

कर्नाटक सरकारनेही या पूर्वीच महाराष्ट्र आणि केरळमधून येणाऱ्या प्रवाशांना राज्य बंदी केली आहे. ट्रेन, बस आणि विमानासह कोणत्याही साधनांनी राज्यात येण्यासाठी या दोन्ही राज्यातील नागरिकांना कोविड निगेटिव्हचा रिपोर्ट जवळ बाळगणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

उत्तराखंडमध्ये बॉर्डवर तपासणी

उत्तराखंड सरकारेने महाराष्ट्र, गुजरात, केरळ, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि इतर राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांना राज्यात बंदी घातली आहे. राज्याच्या बॉर्डर, रेल्वे स्थानके, डेहराडून विमानतळावर कोरोना टेस्ट वाढवण्यात आल्या आहेत. या ठिकाणी तपासणीसाठी डॉक्टरांची मोठी टीम तैनात करण्यात आली आहे. महाराष्ट्र, गुजरात, केरळ, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्याने हा निर्णय घेण्यात आल्याच डेहराडूनच्या जिल्हाधिकाऱ्याने सांगितलं.

मणिपूरमध्ये विमानातून आलेल्यांनाच चाचणी बंधनकारक

मणिपूर सारख्या छोट्या राज्यानेही महाराष्ट्रा आणि केरळातून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा नियम फक्त विमानाने येणाऱ्या प्रवाशांसाठीच लागू करण्यात आला आहे.

जम्मू-काश्मीर आणि लडाख

श्रीनगरमध्ये देशातील कोणत्याही राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना आरटी-पीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. लडाखमध्येही हाच नियम लागू करण्यात आला आहे. (Negative Covid test report is now mandatory to enter several states in India; check full list)

मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरातही बंधनं

मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरात जाण्यासाठीही कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट असणं बंधनकारक करण्यात आलं आहे. हा नियम बस, ट्रेन आणि विमानांसह कोणत्याही साधनांनी या राज्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी लागू करण्यात आला आहे. (Negative Covid test report is now mandatory to enter several states in India; check full list)

 

संबंधित बातम्या:

टेन्शन वाढले! नागपूर, औरंगाबादेत रुग्ण आणि मृत्यू संख्या वाढली; कोल्हापूर- नागपूर 12 मार्चपासून सुरू होणार

धोका वाढला! नव्या कोरोना रुग्णांची फुफ्फुस लवकर होतायत खराब

नियम सर्वांना सारखेच, पोहरादेवी गडावरील गर्दीबाबत कारवाई करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

पोहरादेवीमध्ये संजय राठोडांच्या शक्तिप्रदर्शनानंतर महंतांसह 8 जण कोरोना पॉझिटिव्ह

(Negative Covid test report is now mandatory to enter several states in India; check full list)