मुंबई: वांद्रे पश्चिममधील शास्त्रीनगरमध्ये बेकायदेशी बांधकाम कोसळल्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे (nitesh rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thakceray) यांना पत्रं पाठवून खरमरीत सवाल केला आहे. मुंबईत (mumbai) बांधकामं राजरोसपणे अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. ही अनाधिकृत बांधकामं वाढत वाढत खारफुटी जागांवर पोहचली आहेत. त्यामुळे वारंवार अनाधिकृत बांधकामं ढासळत आहेत. यात लोकांचा बळी जातोय. आपण मात्र शांतपणे हा मृत्यूचा तांडव उघड्या डोळ्यानं पाहत आहात. एकीकडे राजकीय आकसापोटी विरोधकांना अनाधिकृत बांधकामांच्या नोटीसी पाठवाल्या जात आहेत. पण मतांसाठी या अनाधिकृत बांधकांना संमती दिली जात आहे. विरोधकांना नोटीसा पाठवताना जी तत्परता दाखवली जात आहे, तिच तत्परता हे अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी दाखवणार आहात काय? असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे.