AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patole: पेट्रोल-डिझेलच्या किमती, धार्मिक गोष्टींवर पंतप्रधानांचे मौन का; नाना पटोलेंचा तिखट प्रश्न

पंतप्रधान (Prime Minister) हे देशाचे असतात. मात्र, गेल्या 8 वर्षांत भाजप सरकार आल्यापासून आपण पाहतोय की, पंतप्रधान हे भाजपचे (BJP) असल्यासारख वागतात. त्यांचे काम 24 तास राजकारण असेच आहे. देशात धार्मिक गोष्टी सुरू असताना पंतप्रधान का बोलत नाहीत. पेट्रोल - डिझेल दरवाढीवर का बोलत नाहीत, असा तिखट प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पेटोले (Nana Patole) यांनी केला आहे.

Nana Patole: पेट्रोल-डिझेलच्या किमती, धार्मिक गोष्टींवर पंतप्रधानांचे मौन का; नाना पटोलेंचा तिखट प्रश्न
नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष Image Credit source: TV9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 28, 2022 | 1:49 PM
Share

मुंबईः पंतप्रधान (Prime Minister) हे देशाचे असतात. मात्र, गेल्या 8 वर्षांत भाजप सरकार आल्यापासून आपण पाहतोय की, पंतप्रधान हे भाजपचे (BJP) असल्यासारख वागतात. त्यांचे काम 24 तास राजकारण असेच आहे. देशात धार्मिक गोष्टी सुरू असताना पंतप्रधान का बोलत नाहीत. पेट्रोल – डिझेल दरवाढीवर का बोलत नाहीत, असा तिखट प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पेटोले (Nana Patole) यांनी केला आहे. ते मुंबईत बोलत होते. पटोले म्हणाले की, त्यांना कोणाच्या सल्ल्याची गरज नाही. संविधानानुसार राज्य चालते. कायद्यानुसार चालते. यूपीचे उदाहरण इथे देण्याची गरज नाही. सगळ्यांना मोठे करायचे काम काँग्रेसने केले आहे. जे लोक सत्तेच्या बाहेर आहेत ते वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मतभेद आहेत असे भासवण्याचा प्रयत्न करतात. आशिष शेलार यांनी गौप्यस्फोट केलाय, त्यावर आम्ही बोलण्याची काही गरज नाही. मात्र, ज्या प्रकारे तमाशा बनवला जातोय, धार्मिक वाद बनवण्याचा प्रयत्न केला जातोय, ते अगदी चुकीचे असल्याचे ते म्हणाले.

दंगे घडवण्याचा प्रयत्न…

नाना पटोले म्हणाले की, इतर महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा न होता या गोष्टीकडे लक्ष दिले जाते आहे. केंद्र प्रत्येक विषय डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्राला बदनाम करण्याचा हा डाव आहे. राज्यात धार्मिक दंगे घडवण्याचा प्रयत्न जसे दिल्लीत झाले, तसे हे कोण करण्याचा प्रयत्न करते आहे, हे आम्हाला माहिती आहे. गृहमंत्र्यांनी अलर्ट दिलेला आहे. त्यानुसार राज्य सरकार काम करत आहे.

तर अजितदादा म्हणतात…

अजित पवार म्हणाले की, पेट्रोल-डिझेल दर कपातीचा निर्णय आज होणार नाही. आर्थिक बोजाचा विचार करावा लागेल. केंद्र सरकारला महाराष्ट्र सर्वाधिक टॅक्स देतो. त्यामुळे इंधनावरील राज्य आणि केंद्राची कर मर्यादा ठरवावी लागेल. केंद्राकडून जीएसटीचे पैसे यायचे बाकी आहेत. ते पैसे लवकर येतील असा अंदाज आहे. मात्र, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत इंधन कपातीचा विषय नाही.जीएसटीचे पैसे अजून केंद्राकडून येणे बाकी आहेत. ते पुढच्या दोन – तीन महिन्यांत येतील असा अंदाज आहे. आम्ही अर्थसंकल्पात कोणताही नवा टॅक्स आम्ही लावलेला नाही. गॅसचा टॅक्स कमी केलाय. त्यामुळे एक हजार कोटीचा टॅक्स येणं बंद झालंय, म्हणजे एक हजार कोटीचा दिलासा सरकारनं राज्यातील लोकांना दिलाय.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.