AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bird Flu | घाबरू नका, महाराष्ट्रात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव नाही; वन विभागाचा दिलासा!

देशातील पाच राज्यांमध्ये बर्ड फ्ल्यूचा कहर झाला असला तरी महाराष्ट्रात मात्र बर्ड फ्ल्यूची एकही केस आढळलेली नाही. (No bird flu cases yet in Maharashtra: Forest official)

Bird Flu | घाबरू नका, महाराष्ट्रात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव नाही; वन विभागाचा दिलासा!
| Updated on: Jan 05, 2021 | 7:05 PM
Share

मुंबई: देशातील पाच राज्यांमध्ये बर्ड फ्ल्यूचा कहर झाला असला तरी महाराष्ट्रात मात्र बर्ड फ्ल्यूची एकही केस आढळलेली नाही. राज्यात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झालेला नाही, त्यामुळे घाबरून जाऊ नका, असं आवाहन राज्याच्या वन विभागाने केलं आहे. (No bird flu cases yet in Maharashtra: Forest official)

‘पीटीआय’ने या संदर्भातील वृत्त दिलं आहे. या क्षणापर्यंत राज्यात कोणत्याही भागात बर्ड फ्ल्यूची एकही केस आढळलेली नाही, असं मुख्य वन संरक्षक नितीन काकोडकर यांनी सांगितलं. मध्य प्रदेशात काही कावळ्यांमध्ये बर्ड फ्ल्यूची लक्षणे आढळली आहेत. केरळ, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशातही बर्ड फ्ल्यूचा फैलाव झालेला आहे. केरळमध्ये तर बर्ड फ्ल्यूला राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्यात आलं आहे.

केरळमध्येही बर्ड फ्ल्यूचा कहर वाढल्याने हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. कोट्ट्यम आणि अलाप्पुझा जिल्ह्यात खासकरून बर्ड फ्ल्यूचा कहर वाढला आहे. बर्ड फ्लूचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या परिसरापासून एक किलोमीटर क्षेत्रातील बदक, कोंबड्या आणि पाळीव पक्ष्यांना मारण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. H5N8 व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी नाईलाजाने हे पाऊल उचलावे लागत असल्याची माहित अधिकाऱ्यांनी दिली. कोट्टायम जिल्ह्यातील नीदूर येथे बदक पालन केंद्रातील 1500 पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. बर्ड फ्लूची साथ ही अत्यंत वेगाने पसरते. H5N8 व्हायरसमुळे पक्ष्यांच्या श्वसनयंत्रणेत बिघाड होऊन त्यांचा मृत्यू होता. माणसांनाही याची लागण होऊ शकते. महाराष्ट्रातील नंदूरबार आणि धुळे जिल्ह्यात 2006मध्ये बर्ड फ्ल्यूचा फैलाव झाला होता. यावेळी हजारो कोंबड्यांना बर्ड फ्ल्यूची लागण झाली होती.

तर, पशूसंवर्धन कार्यालयाशी संपर्क साधा

दरम्यान, मंत्री सुनील केदार यांनीही महाराष्ट्रात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मध्ये प्रदेश आणि राजस्थानमध्ये बर्ड फ्ल्यू साधर्म्य लक्षणं असलेल्या काही कोंबड्या सापडल्याची चर्चा आहे. वास्तविक त्यांना बर्ड फ्ल्यू झालेला नाही, असं सुनील केदार यांनी सांगितलं. राज्यात खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने दिलेल्या गाईडलाईन्स पाळल्या जात आहेत, असं सांगतानाच अन्य काही कारणाने जनावरांचा मृत्यू झाल्यास तात्काळ पशुसंवर्धन कार्यालयाशी संपर्क साधावा, असं आवाहन त्यांनी केलं आहे. (No bird flu cases yet in Maharashtra: Forest official)

संबंधित बातमी:

कोरोनानंतर आता बर्ड फ्लूचं मोठं संकट; केरळमध्ये 40,000 पक्ष्यांना मारण्याची वेळ

मध्य प्रदेशात 300 कावळ्यांचा मृत्यू, बर्ड फ्लूचं संकट, अलर्ट जारी

 बर्ड फ्लू नेमका काय?, लक्षणे कोणती?, औषध काय?, सर्व प्रश्नांची उत्तरं!

(No bird flu cases yet in Maharashtra: Forest official)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.