कोणतीही वीज बिलं माफ होणार नाहीत; ऊर्जामंत्र्यांचा सामान्यांना शॉक

लोकांनी वीज‌ वापरली त्याचे बिल भरावे, कुठलीही वीजबिल माफी (Electricity Bill) मिळणार नाही, असं ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) म्हणाले.

कोणतीही वीज बिलं माफ होणार नाहीत; ऊर्जामंत्र्यांचा सामान्यांना शॉक

मुंबई : सर्वसामान्यांना मोठा झटका बसणार आहे. कारण लोकांनी वीज‌ वापरली त्याचे बिल भरावे, कुठलीही वीजबिल माफी (Electricity Bill) मिळणार नाही, असं ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) म्हणाले. वाढीव वीज बिलातून सवलत देणे अशक्य असल्याचं नितीन राऊत यांनी यापूर्वीच म्हटलं होतं. त्याचा पुनरुच्चार राऊत यांनी केला. लॉकडाऊनकाळात वीज ग्राहकांना वाढीव बिलांचा शॉक बसला. आधीच अनेकांचे रोजगार गेले, त्यात वाढीव वीजबिले आल्याने सर्वसामांन्यांचे कंबरडे मोडले. (No electricity bills will be waived Said Nitin Raut). सरकारकडून वीजबिलांमध्ये सवलत मिळेल अशी आशा होती, मात्र आता ऊर्जामंत्र्यांनी सवलत मिळणार नसल्याचं स्पष्ट केल्याने, सर्वसामान्यांना शॉक बसला आहे.

“लॉकडाऊनमध्ये आलेली बिलं भरली पाहिजे. आम्ही पण ग्राहक आहोत. कर्ज घेऊन मदत करत आहोत, कामकाज चालवण्यासाठी आम्हालाही मर्यादा आहेत. वीज बिल सवलतीचा विषय आता नाही”, असं नितीन राऊत यांनी स्पष्ट केलं.

तुम्ही जसे ग्राहक आहात तसं आम्ही सुद्धा वीज ग्राहक आहोत, आम्हाला सुद्धा वीजेचं बिल द्यावं लागतं. वापरापेक्षा वाढीव बिलं आली असतील त्याची चौकशी सुरु आहे. पण ज्यांनी वीज वापरली आहे त्यांना बिल भरावं लागेल असं नितीन राऊत म्हणाले.

नितीन राऊत नेमकं काय म्हणाले?

वीज वापरली तितकेच बिल आले पाहिजे. कोणाचे वीज कनेक्शन कट होणार नाही. योग्य बिल नसले तर त्याची तक्रार करावी मीटर पाहणी केली जाईल. राज्यात बिल सवलत याबाबत प्रस्ताव केंद्र सरकारने मदत करावी अशी मागणी केली, पण केंद्र सरकारने मदत केली नाही. वीजबिल सवलत तूर्तास मिळेल असे वाटत नाही, असं नितीन राऊत म्हणाले.

महावितरणने 24 तास वीज उपलब्ध केली. लोकांनी वीज वापरली त्याची बिलं भरावी. वीज कंपनीने लॉक डाऊनमध्ये वीज पुरवठा केला. महावितरणवर 69 हजार कोटी कर्ज आहे. आम्ही कर्ज काढून कामकाज करत आहोत अजून किती करणार? असा सवाल नितीन राऊत यांनी विचारला.

महावितरणकडून वसुलीबाबत परिपत्रक जारी दरम्यान, महावितरणने वीजबिल वसुलीबाबत परिपत्रक जारी केलं आहे. त्यानुसार डिसेंबर 2020 पर्यंत थकीत वीजबिले भरावी लागणार आहेत.

वीजबिलात सवलत द्या : नाना पटोले

लॉकडाऊन (Lockdown) काळात आलेल्या वाढीव वीजबिलामुळे ग्राहक चिंताग्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत ग्राहकांना आलेल्या वाढीव वीज बिलात सरकारने सवलत द्यावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले (Nana patole) यांनी गेल्या महिन्यात दिले होते. शासनाने घरगुती ग्राहकांना दिलासा द्यावा, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

(No electricity bills will be waived Said Nitin Raut)

संबंधित बातम्या :  

लॉकडाऊनमधील वाढीव वीज बिलात सवलत द्या, नाना पटोलेंचे सरकारला निर्देश

Electricity Bill | लीलाधर गायधने यांनी जाळून स्वत:चे जीवन संपविले, सरकार आता तरी जागे होईल का? : फडणवीस

Electricity Bill | घराचं वीज बिल 40 हजार, MSEB च्या फेऱ्या मारुनही कपात नाही, जाळून घेत आत्महत्या

Published On - 12:22 pm, Tue, 17 November 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI