लॉकडाऊनमधील वाढीव वीज बिलात सवलत द्या, नाना पटोलेंचे सरकारला निर्देश

ग्राहकांना आलेल्या वाढीव वीज बिलात सरकारने सवलत द्यावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत.

लॉकडाऊनमधील वाढीव वीज बिलात सवलत द्या, नाना पटोलेंचे सरकारला निर्देश
Follow us
| Updated on: Oct 13, 2020 | 6:38 PM

मुंबई : लॉकडाऊन (Lockdown) काळात आलेल्या वाढीव वीजबिलामुळे ग्राहक चिंताग्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत ग्राहकांना आलेल्या वाढीव वीज बिलात सरकारने सवलत द्यावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले (Nana patole) यांनी दिले आहेत. शासनाने घरगुती ग्राहकांना दिलासा द्यावा, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. (Lockdown Electricity Bill Goverment Should be Consession Says Nana Patole)

वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरून आज नाना पटोले यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीला ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) तसंच उर्जा विभागाचे आणि वित्त विभागाचे अधिकारी, वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते.

कोरोना उद्रेकाच्या काळात शासनाला लॉकडाऊन करावं लागलं. राज्य शासनाने लोकांना घरात बसून काम करायला सांगितलं. त्यामुळे लोक घरात थांबली. याच काळात शासनाकडून वाढीव वीज बिल देण्यात आली. शासनाने या घरगुती ग्राहकांना दिलासा द्यावा, असे निर्देश नाना पटोले यांनी दिले आहेत.

कोरोना महामारीमुळे लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना विजेचे बिल अव्वाच्या सव्वा आले आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेकांचे लहान उद्योग धंदे बंद पडले आहेत. हातावर पोट भरणारे आर्थिक अडचणीमध्ये सापडले आहेत. त्यातच महावितरणाच्या वाढीव वीजेच्या बिलामुळे जनता चिंताग्रस्त झाली आहे. महावितरण कार्यालयात अनेक ग्राहक त्यांच्या वाढीव वीज बिलाबद्दल तक्रार घेऊन गेल्यावर तेथील आधिकारी त्यांची साधी दखल सुध्दा घेत नाहीत.

भाजपसह मनसेने याविरोधात आवाज उठवत राज्य सरकारकडे वारंवार निवेदने दिली. त्यावर सरकारने योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. याच पार्श्वभूमीवर ग्राहकांना आलेल्या वाढीव वीज बिलात सरकारने सवलत द्यावी, असे निर्देश खुद्द विधानसभा अध्यक्षांनीच सरकारला दिले आहेत.

(Lockdown Electricity Bill Goverment Should be Consession Says Nana Patole)

संबंधित बातम्या

बिलात 50 टक्के सूट द्या, वीज कापू नका, मनसेचं शिष्टमंडळ ऊर्जामंत्र्यांच्या भेटीला

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.