AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: जुहूच्या घरात एक इंचाचंही बेकायदा बांधकाम नाही, मातोश्रीच्या इशाऱ्यावरूनच तक्रार; नारायण राणेंचा आरोप

जुहू येथील माझ्या घरात मी एका इंचाचंही बेकायदा बांधकाम केलं नाही. मला बेकायदा बांधकाम करण्याची गरज पडली नाही. माझी इमारत शंभर टक्के कायदेशीर आहे. या इमारतीला सीसी आणि ओसी मिळालेली आहे. एकही गोष्ट मी अपूर्ण ठेवली नाही.

VIDEO: जुहूच्या घरात एक इंचाचंही बेकायदा बांधकाम नाही, मातोश्रीच्या इशाऱ्यावरूनच तक्रार; नारायण राणेंचा आरोप
जुहूच्या घरात एक इंचाचंही बेकायदा बांधकाम केलं नाही, मातोश्रीच्या इशाऱ्यावरूनच तक्रार; नारायण राणेंचा आरोप
ReporterSameer Bhise
ReporterSameer Bhise | Edited By: | Updated on: Feb 19, 2022 | 12:01 PM
Share

मुंबई: जुहू येथील माझ्या घरात मी एका इंचाचंही बेकायदा बांधकाम केलं नाही. मला बेकायदा बांधकाम करण्याची गरज पडली नाही. माझी इमारत शंभर टक्के कायदेशीर आहे. या इमारतीला सीसी आणि ओसी मिळालेली आहे. एकही गोष्ट मी अपूर्ण ठेवली नाही. मातोश्रीच्या (matoshri) सांगण्यावरूनच ही तक्रार करण्यात आली. तसं तक्रारदारानेही स्पष्ट केलं आहे. पण असो. ते आम्हाला चांगल्या आठवणी देत आहेत. सूडाने कारवाई होत आहे. या सर्वांना उत्तर देण्यासाठी मी समर्थ आहे, असा सूचक इशारा केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (narayan rane) यांनी दिला. नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या घराला मुंबई महापालिकेने (bmc) दिलेल्या घराच्या नोटीशीवरून खुलासा केला.

माझ्या जुहूच्या घरात 17 सप्टेंबर 2009मध्ये आलो. 14 वर्ष झाली मी या घरात आलो. या इमारतीचे आर्किटेक्ट नामांकित आर्किटेक्टने आहेत. त्यांनी ही इमारत बांधली आहे. ही इमारत बांधल्यानंतर 1991च्या डीसी रुलप्रमाणे इमारत बांधली आणि पजेशन देण्यात आलं. ओसी आणि सीसी दोन्ही गोष्टी पालिकेने दिल्या होत्या. मी एकही गोष्ट अपूर्ण ठेवली नाही. त्यानंतर एक इंचही बांधकाम केलं नाही. काही आवश्यकताच पडली नाही. माझे दोन मुले. त्यांच्या पत्नी आणि दोन लहान मुले असं सहा जण आम्ही या घरात राहतो. त्यामुळे या ठिकाणी हॉटेल किंवा कोणताही व्यवसाय चालत नाही. ही निवासी इमारत आहे. शंभर टक्के कायदेशीर इमारत असतानाही सेनेकडून, मातोश्रीकडून काही लोकांना सांगून या इमारतीविरोधात तक्रार करण्यात आली आहे, असं नारायण राणे यांनी सांगितलं.

शिवसेना पक्षप्रमुखच मराठी माणसाच्या मुळावर

पालिका त्यांच्याकडे आहे. सातत्याने 2015 आणि 2016 मध्ये तक्रारी करण्यात आल्या. प्रत्येकवेळी महापालिकेचे सर्व प्लान बघितल्या गेले आणि काही इलिगल नाही असं पालिकेकडून सांगितलं गेलं. हा दुष्टपणा वारंवार केला गेला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी शिवसेना काढली. आता शिवसेनेचे पक्षप्रमुख मराठी माणसाच्या मुळावर आले आहेत. मी सैनिक म्हणणार नाही. शिवसेनेचे पक्षप्रमुखच मुळावर आले, असा हल्लाही त्यांनी केला.

मातोश्रीचे प्लान माझ्याकडे आहेत

त्यांनी मातोश्री दुरुस्त केली. मातोश्री पार्ट टू तयार केली. आम्ही काय म्हणालो? मातोश्री पार्ट टूसाठी पैसे भरून इलिगल काम लिगल करून घेतलं. त्यांच्या दोन्ही बिल्डिंगचे प्लान माझ्याकडे आहेत. पण मी कुणाच्या घरावर किंवा नोकरीवर जात नाही म्हणून गप्प आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

बाळासाहेब असते तर गृहप्रवेशाला आले असते

प्रदीप भालेकर हा तक्रारी करायचं काम करतो. त्याने ट्विट केलं. ते कशा वृत्तीचे आहेत ते दिसेल. राजकीय सूडबुद्धी किंवा दुष्टबुद्धी असू नये. त्याने ट्विट केलं. शिवसेनेच्या लोकांनी पुढे करून मला तक्रार करायला सांगितली. तो मला भेटला. पण मी म्हटलं मला तुमच्या लफड्यात पडायचं नाही. शिवसेनेत असताना या घराची सुरुवात केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना सांगितलं जुहूला घर घेतोय. साहेबांनी छान म्हटलं. ते असते तर गृहप्रवेशाला आले असते, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

VIDEO: आम्हीही मराठ्यांच्या पोटचे आहोत, आम्हालाही मराठा आरक्षण द्यायचं आहे; अजित पवारांनी गोंधळ घालणाऱ्यांना खडसावलं

अमोल कोल्हे पुन्हा एकदा साकारणार शिवरायांची भूमिका, ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’चा शिवजयंती विशेष भाग

VIDEO: तुम्ही काय कुणाची सुपारी घेऊन आलाय का?, अजित पवारांनी भरसभेत मराठा तरुणांना झापले

Follow Us
चेंबूरमधील गुड लक आणि अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित
Mumbai FDA : चेंबूरमधील गुड लक आणि अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित; स्वच्छता निकषांचे उल्लंघन
सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28...
Shivsena Hearing : सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28 वा मुद्दा सर्वात खास
जरांगे नावाची सिरीज, प्रोड्युसर शिंदे, हिरो मनोज जरांगे आणि...
जरांगे नावाची सिरीज, प्रोड्युसर शिंदे, हिरो मनोज जरांगे आणि... गुणरत्न सदावर्तेंची पत्रकार परिषद ऐकाच!
माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर नाही मात्र अमित ठाकरेंवर...
माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर नाही मात्र अमित ठाकरेंवर... सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेवर सुळे संतापल्या
मराठा आरक्षणाचं प्रकरण निर्णायक वळणावर? प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार
मराठा आरक्षणाचं प्रकरण निर्णायक वळणावर? प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार अन्...
हातावर बड्या नेत्याचं नाव लिहून जीवन संपवणाऱ्या डॉक्टर प्रकरणी मोठा...
हातावर बड्या नेत्याचं नाव लिहून जीवन संपवणाऱ्या डॉक्टर प्रकरणी मोठा खुलासा; कुटुंबाकडून हादरवणारी माहिती समोर
महालेंनी गायकवाडांच्या मतदारसंघात जाऊन अजब पद्धतीने साजरा केला वाढदिवस
बुलढाण्यात राजकीय वाद विकोपाला; महालेंनी गायकवाडांच्या मतदारसंघात जाऊन अजब पद्धतीने साजरा केला वाढदिवस
जरांगे पाटीलांंची उपोषणाच्या पाचव्या दिवशी तब्येत खालावली; व्हिडीओच...
चालता येईना... जरांगे पाटीलांंची उपोषणाच्या पाचव्या दिवशी तब्येत खालावली; व्हिडीओच आला समोर
कोर्टातील युक्तिवादाबाबत एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, काय म्हणाले?
बाळासाहेब म्हणाले होते, माझ्या पक्षाची काँग्रेस... कोर्टातील युक्तिवादाबाबत एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, काय म्हणाले?
केडीएमसीमध्ये भाजप-मनसे वाद चिघळला
केडीएमसीमध्ये भाजप-मनसे वाद चिघळला: अमित ठाकरेंच्या निषेधार्थ सभा तहकूब