Mumbai Lockdown | मुंबईत सध्या लॉकडाऊनची गरज नाही, मात्र…. : मुंबई महापालिका

मुंबईतही अंशत: लॉकडाऊन लागू शकते, असे संकेत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिले आहेत. (No lockdown in Mumbai BMC)

Mumbai Lockdown | मुंबईत सध्या लॉकडाऊनची गरज नाही, मात्र.... : मुंबई महापालिका
मुंबई कोरोना

मुंबई : मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे मुंबईतही अंशत: लॉकडाऊन लागू शकते, असे संकेत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिले आहेत. तर दुसरीकडे मुंबईत सध्या तरी लगेच लॉकडाऊन लावण्याची गरज नाही, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. (No Need To lockdown in Mumbai said BMC)

मुंबईकरांवर सध्या तरी लगेच लॉकडाऊन करण्याची गरज नाही. मात्र मुंबईकरांनी गांभीर्याने कोरोनाचे नियम पाळले नाही तर भविष्यात कठोर निर्णय घ्यावे लागू शकतील, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

कोव्हिड चाचण्यांमध्ये वाढ

मुंबईतील कोविड चाचण्यांची संख्या वाढल्यानं पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मुंबईत काल 23 हजार कोव्हिड चाचण्या झाल्या. याआधी म्हणजे जानेवारीपर्यंत 10 ते 12 हजार चाचण्या व्हायच्या. त्या आता सातत्यानं वाढवत नेत आहेत. मुंबईत दर 100 चाचण्यांमागे केवळ 6 पॉझिटीव्ह रुग्ण आढळत आहेत.

सध्या मुंबईचा पॉझिटीव्हिटी रेट हा 6 टक्के आहे. तर इतर ठिकाणचा पॉझिटीव्हिटी रेट हा मुंबईपेक्षा जास्त आहे. त्यामुळे त्या ठिकाणी लॉकडाऊन संदर्भातला विचार होऊ शकतो. मात्र, मुंबईत ती स्थिती नाही, असे पालिकेने सांगितले आहे.

कुठे किती पॉझिटीव्हिटी रेट?

  • पुणे – 15 टक्के
  • विदर्भ – 25 टक्के
  • विदर्भातील काही ठिकाणी – 50 टक्के
  • नाशिक – 15 टक्के
  • मुंबई – 6 टक्के

(No Need To lockdown in Mumbai said BMC)

मुंबईचा मृत्यूदर खालावला

विशेष म्हणजे मुंबईचा मृत्यूदरही खालावला आहे. मुंबईतील कोरोना मृत्यूदर हा 4. 50 टक्के इतका होता. तो आता 4.1 टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच मुंबईतील असिम्प्टमेटीक रुग्णांची संख्याही ५ टक्क्यांनी वाढली आहे. मुंबईत महिनाभरापूर्वी 80 टक्के लक्षणं नसलेले रुग्ण आता 85 टक्के झाला आहे.

मुंबईत अंशत: लॉकडाऊन

काल मुख्यमंत्री उद्धव ठकारे यांनी कोरोना आढावा बैठक घेतली. जिथं जिथं केसेस वाढत आहेत. त्या ठिकाणी अंशत: लॉकडाऊन, रात्रीची संचारबंदी आणि इतर निर्बंध लावण्यात येणार आहेत. स्थानिक प्रशासनाला तसे आदेश देण्यात आले आहेत. केसेस वाढत राहिल्यास मुंबईतही अंशत: लॉकडाऊन लागू शकतो, असं मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले.

रात्रीची संचाबंदी लावणार

मुंबई आणि ठाण्यात कोरोनाच्या केसेस वाढत आहेत. त्यावर आरोग्य यंत्रणा लक्ष ठेवून आहे. या बैठकीत लोकल ट्रेन आणि बेस्ट बसेसमधील गर्दीवरही चर्चा झाली. तसेच लग्न समारंभांवरही चर्चा झाली, असं त्यांनी सांगितलं. रात्री अनेक ठिकाणी गर्दी होत असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे रात्रीची संचाबंदी लावण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. (No Need To lockdown in Mumbai said BMC)

संबंधित बातम्या :

मुंबईतील नाईट क्लब सर्वात आधी बंद करू; अस्लम शेख यांचे संकेत

Maharashtra Lockdown | ठाण्यातील हॉटस्पॉटमध्ये लॉकडाऊन लागू; मुंबईही लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर?

Published On - 2:16 pm, Tue, 9 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI