आता भाजपने गुजरात दंगल ही चूक होती हे मान्य करावं: नवाब मलिक

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लावलेली आणीबाणी ही चूकच होती, असं म्हटलं आहे. (now bjp should accept godhra riots was wrong says nawab malik)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:38 AM, 3 Mar 2021
आता भाजपने गुजरात दंगल ही चूक होती हे मान्य करावं: नवाब मलिक
नवाब मलिक, प्रवक्ते, राष्ट्रवादी

मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लावलेली आणीबाणी ही चूकच होती, असं म्हटलं आहे. त्यावरून राष्ट्रवादीने आता भाजपला घेरलं आहे. आता भाजपनेही गुजरात दंगल ही चूक होती हे मान्य करावं, अशी मागणी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. (now bjp should accept godhra riots was wrong says nawab malik)

नवाब मलिक यांनी विधान भवनाच्या मीडिया हाऊसमध्ये बोलताना ही मागणी केली आहे. ४५ वर्षांनंतर राहुल गांधी यांनी कुठेतरी आणीबाणी ही चूक असल्याचे मान्य केले आहे. आता भाजपनेही गुजरात दंगल ही चूक होती हे मान्य करावे, अशी मागणी मलिक यांनी केली आहे. जर कॉंग्रेस चूक सुधारण्याचा प्रयत्न करत आहे तर भाजप केव्हा चूक सुधारणार याची माहिती जनतेला द्यावी. दिल्ली दंगलीबाबत काँग्रेसने माफी मागितली होती, आता गुजरात दंगलीबाबत भाजपने माफी मागावी, असेही ते म्हणाले.

गुजरात दंगल ही रिअॅक्शन: पाटील

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गोध्रा कांडानंतर गुजरातमध्ये जी दंगल झाली ती केवळ रिअॅक्शन होती. गोध्रा कांडाशी संबंधित कोणत्याही चौकशीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव आलेलं नाही, असं स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्यावरही टीका केली. इतक्या वर्षानंतर आणीबाणी चूक होती हे काँग्रेसला सूचला. आणीबाणीमुळे हजारो लोकांना त्रास सहन करावा लागला, असंही ते म्हणाले.

राहुल गांधी काय म्हणाले होते?

कॉर्नेल विद्यापीठात एका कार्यक्रमात राहुल गांधी सहभागी झाले होते. त्यावेळी बोलताना राहुल यांनी आणीबाणीबाबत मोठं वक्तव्य केलं. प्राध्यापक कौशिक बसू यांनी राहुल गांधी यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना ‘आणीबाणी घोषित करणं ही इंदिरा गांधी यांची चूक होती. मात्र, काँग्रेसनं पक्ष म्हणून त्याचा कधीही फायदा करुन घेतला नाही. तेव्हा जे झालं आणि आज जे होत आहे, त्यात मोठा फरक आहे’, असं राहुल गांधी म्हणाले. ‘काँग्रेस पक्षात अंतर्गत लोकशाहीला चालना देण्याचा प्रयत्न गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे. यावरुन माझ्याच पक्षातील लोकांनी माझ्यावर टीकाही केली होती. पण पक्षांतर्गत लोकशाही असणं अत्यंत गरजेचं असल्याची मी पक्षातील नेत्यांना सांगितलं. आधुनिक लोकशाही व्यवस्था त्यामुळेच प्रभावी आहेत. कारण, त्यांच्याकडे स्वतंत्र संस्था आहेत. पण भारतात त्याच स्वातंत्र्यावर हल्ला केला जात आहे’, असा गंभीर आरोपही त्यांनी केला होता. (now bjp should accept godhra riots was wrong says nawab malik)

 

संबंधित बातम्या:

‘होय, आणीबाणी चुकच होती!’, काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाकडून पहिल्यांदाच जगजाहीर कबुली

Video: सभेला उशीर झाला तर तुम्ही काय कराल? प्रियंका गांधींनी काय केलं ते बघा!

PHOTOS : पुशअप्स, समुद्रात स्विमिंग आणि अ‍ॅब्स… ‘या’ कारणांमुळे सर्वत्र राहुल गांधींच्या फिटनेसची चर्चा

(now bjp should accept godhra riots was wrong says nawab malik)