Laxman Hake : आता ॲक्शनला रिएक्शन, लक्ष्मण हाकेंनी थोपाटले दंड, तो मोठा इशारा काय?

Laxman Hake Big Statements : प्राध्यापक लक्ष्मण हाके राजकारण्यांवर चांगलेच ढाफरले. त्यांनी राज्यात ॲक्शनला रिएक्शन देण्यात येईल असा इशारा दिला. मराठा आरक्षण जीआरमुळे ओबीसी नेते दुखावल्या गेल्याचे समोर येत आहे. काय म्हणाले हाके?

Laxman Hake : आता ॲक्शनला रिएक्शन, लक्ष्मण हाकेंनी थोपाटले दंड, तो मोठा इशारा काय?
लक्ष्मण हाकेंचा इशारा
| Updated on: Sep 12, 2025 | 11:38 AM

OBC नेते लक्ष्मण हाके यांनी राजकारण्यांवर चांगलीच आगपाखड केली. हैदराबाद गॅझेटवरून त्यांनी राजकीय पुढाऱ्यांना चांगलेच सुनावले. मुळात इथले राजकारणी मराठा आरक्षणाच्या संदर्भात खोटं बोलत आहेत. वास्तव पाहता कुणामध्येही डेरिंग धाडस नाही, असा दावा त्यांनी केला. त्यांनी राज्यात ॲक्शनला रिएक्शन देण्यात येईल असा इशारा दिला. मराठा आरक्षण जीआरमुळे ओबीसी नेते दुखावल्या गेल्याचे समोर येत आहे.

ॲक्शनला रिएक्शन देणार

महाराष्ट्रामध्ये ॲक्शनला रिएक्शन नक्कीच मिळेल, असा इशारा हाके यांनी दिला. त्याचवेळी ही रिॲक्शन लोकशाही मार्गाने असेल ही जबाबदारीने सांगतो, असे आश्वासही त्यांनी दिले. आम्ही मोर्चे काढून आंदोलने करू. पण आम्ही महाराष्ट्रातल्या ओबीसीचा आवाज बुलंद करू. ओबीसी जर जागा झाला तर हे आमदार खासदार अर्थमंत्री कारखानदार नेते राहणार नाहीत. २०२९ मध्ये फुले शाहू आंबेडकर विचारांचा खरा महाराष्ट्र जनतेला पाहायला मिळेल, असे ते म्हणाले.

मनोज जरांगे यांच्यावर टीका

यावेळी प्राध्यापक हाके यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर टीका केली. मुळात जरांगे नावाचा माणूस हा फाळकुट आहे. चावडीवर बसणारा हा माणूस आहे, अशी टीका त्यांनी केली. लक्ष्मण हाकें वरती आतापर्यंत सात ते आठ वेळेस हल्ले झाले. इथलं गृह विभाग चौकशी करेल असे ते म्हणाले.

आतापर्यंत लाखोंच्या बोगस प्रमाणपत्राचे वाटप झालं आहे, असा गंभीर आरोप हाकेंनी यावेळी केला. शासनच दर बेजबाबदारपणे वागत असेल तर न्याय मागायचा कुणाकडे, असा सवाल त्यांनी केला. ओबीसीवर हा खूप मोठा अन्याय आहे, असे ते म्हणाले.असा काय मराठा समाज मागास झाला ज्याला काही प्रमाणपत्र काढायची अक्कल नाही. ज्याला वंशावळी शोधता येत नाहीत एवढा अशिक्षित आहे का मराठा समाज. मराठ्याचे फक्त मुख्यमंत्री नाहीत.ओबीसीचे पण मुख्यमंत्री आहात, 14 करोड जनतेचे मुख्यमंत्री आहात असं जबाबदारीने वागा, असे हाके म्हणाले.

राधाकृष्ण विखे पाटील यांना मुख्यमंत्री पदाची स्वप्न

राधाकृष्ण विखे पाटील मुळात कारखानदारीचा नेता आहे.सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांची पाचवी पिढी राजकारणात आहे. कारखानदारी मधून पैसे कमावणे त्या पैशांमधून *निवडणुका जिंकणे त्यापेक्षा अधिक त्यांनी काय केले. मुळात जी समिती नेमली तीच बेकायदेशीर आहे. विखे पाटलांचं काय दुखणे माहिती का मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायचंय हे आहे. कारखानदारी चालून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता येत नाही. स्वतःचं कर्तुत्व सिद्ध करावं लागतं. आत्ता मुख्यमंत्र्यांचा दिवस स्वप्न तुम्ही सोडून द्या आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ओबीसी आणि दिनदलित ठरवतील, असा दावा हाकेंनी केला.