Phonepe,Paytm युझर्ससाठी महत्त्वाची बातमी! आता उरलेत दोन दिवस, 15 सप्टेंबरपासून UPI बाबत मोठा बदल
Phonepe,Paytm Users : युपीआय व्यवहाराबाबत बदल होत आहे. 15 सप्टेंबरपासून फोनपे,पेटीएम युझर्सला त्याचा अनुभव येईल. राष्ट्रीय देयके मंडळाने (NPCI) या बदलावाला अनुकूलता दर्शवली आहे.

UPI transaction limits : राष्ट्रीय देयके मंडळाने (NPCI) 15 सप्टेंबर 2025 रोजीपासून युपीआय व्यवहाराची एक नवीन मर्यादा लागू केली आहे. त्यातंर्गत विमा हप्ता, कॅपिटल मार्केटमधील गुंतवणूक, क्रेडिट कार्ड बिल अदा करण्यासारख्या श्रेणीत आता एकावेळी 5 लाखांपर्यंतचा व्यवहार करता येईल. या कॅटेगिरीत 24 तासात जास्तीत जास्त 10 लाखांपर्यंतची रक्कम अदा करता येईल. क्रेडिट कार्डसाठीची 24 तासांची मर्यादा वेगळी ठेवण्यात आली आहे. ती जास्तीत जास्त 6 लाख असेल. राष्ट्रीय देयके मंडळाने हा बदल ग्राहकांना अधिकाधिक चांगली सेवा देण्यासाठी ही सुविधा लागू केल्याचे म्हटले. त्यामुळे या श्रेणीत ग्राहकांना लहान लहान व्यवहार करण्याची गरज पडणार नसल्याचे मंडळाने स्पष्ट केले.
ग्राहकांना काय फायदा?
सर्वसामान्य ग्राहकांना पर्सन टू पर्सन व्यवहाराच्या मर्यादेत कोणताही बदल केलेला नाही. ही मर्यादा सध्या एक लाख रुपये प्रति दिवस इतकी आहे. ती कायम ठेवण्यात आली आहे. Phonepe, Paytm आणि Google Pay यासारख्या लोकप्रिय UPI प्लॅटफॉर्मवर या नवीन मर्यादेचा थेट परिणाम दिसून येईल. आता युझर्सला मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करता येईल. विमा हप्ता भरता येईल. यात्रा बुकिंग आणि इतर व्यवहार मोठ्या प्रमाणात करता येईल.
- युपीआय व्यवहार मर्यादा 15 सप्टेंबर 2025 पासून लागू
- प्रत्येक श्रेणीत व्यवहार मर्यादा 24 तासांची एकूण मर्यादा असेल
- कॅपिटल मार्केट गुंतवणूक 5 लाख ते 10 लाखांपर्यंत
- विमा हप्ता अदा करण्याची मर्यादा 5 लाख, 10 लाख
- क्रेडीट कार्ड बिल अदा करणे 5 लाख, 6 लाख
- ट्रॅव्हल बुकिंग 5 लाख, 10 लाख
कमी व्यवहारासाठी UPI लाईट
UPI लाईट सप्टेंबर 2022 मध्ये आणण्यात आले होते. गेल्या काही वर्षांत युपीआय व्यवहारात मोठी वाढ झाली आहे. गल्ली-बोळातील दुकानदारांपासून ते मोठ्या व्यापाऱ्यांपर्यंत युपीआय आहे. त्यातून दिवसाकाठी मोठ्या रक्कमेची उलाढाल होते. छोट्या रक्कमेसाठी आरबीआयने युपीआय लाईट बाजारात आणले होते. त्याला पण नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. युपीआय लाईटच्या माध्यमातून ग्राहक 500 रुपयांपेक्षा कमी पेमेंट करु शकतो. व्यवहार करु शकतो. तर आता गुंतवणूक करणे सोपे झाले आहे. ग्राहकांना युपीआय प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक करता येणार आहे.
