Gold And Silver Price Today : महागाईनंतर आनंदवार्ता धडकली, सोन्याचा दिलासा, चांदीची काय वार्ता, एका क्लिकवर जाणून घ्या
Gold And Silver Rate Today : सोन्याने ग्राहकांना दिलासा दिला. सकाळी सकाळी गुडन्यूज आली. काल संध्याकाळी सोन्याने महागाईचा दौरा रद्द केला. पण चांदी माघारी फिरली नाही. आता काय आहेत दोन्ही धातूचे भाव?

काल संध्याकाळी सोन्याने महागाईचा दौरा रद्द केला. तर आज सकाळी सुद्धा बेशकिंमती धातूने स्वस्ताईचा सांगावा पाठवला. दुसरीकडे चांदीने मरगळ झटकत महागाईचा झेंडा पुन्हा हाती धरला. आज सकाळी चांदीने महागाईकडे कूच केल्याचे संकेत दिले. भारत आणि अमेरिकेतील टॅरिफ वॉरवर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर भूराजकीय संकटावर सुद्धा मार्ग निघण्याची शक्यता आहे. पण सणासुदीमुळे ग्राहकांना खिसा कायम गरम ठेवावा लागणार आहे.
सोन्याचा ग्राहकांना दिलासा
गुडरिटर्न्सने अपडेट केलेल्या किंमतीनुसार, 8 सप्टेंबरपासून 10 सप्टेंबरपर्यंत सोन्याने चांगलीच झेप घेतली. या काळात सोन्याने गरूडझेप घेतली. स्थानिक बाजारपेठेत ग्राहकांना मोठा झटका बसला. पण काल 10 सप्टेंबर रोजी संध्याकाळी भावात घसरण दिसली. आज सकाळच्या सत्रातही सोन्याच्या किंमतीचा रोख स्पष्ट नाही. गुडरिटर्न्सनुसार, सकाळच्या सत्रात 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,10,660 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,01,450 रुपये इतका आहे.
चांदी चमकली
मागील आठवड्यातील घसरणीनंतर चांदीने मोठी झेप घेतली. 8 सप्टेंबर रोजी चांदी 1000 रुपयांनी स्वस्त झाली होती. तर 9 सप्टेंबर रोजी चांदीने 3 हजारांची उसळी घेतली. 10 सप्टेंबर रोजी चांदीत संध्याकाळी पडझड दिसली. तर गुडरिटर्न्सनुसार, सकाळच्या सत्रात चांदीचा रोख स्पष्ट नाही. एक किलो चांदीचा भाव 1,29,000 रुपये इतका आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) सोने आणि चांदीचा भाव घसरला आहे.. 24 कॅरेट सोने 1,09,100 रुपये, 23 कॅरेट 1,08,660, 22 कॅरेट सोने 99,930 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 81,820 रुपये, 14 कॅरेट सोने 63,820 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 1,24,499 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
शुद्ध सोन्याची ओळख अशी करा
सोन्याच्या दागिन्याची शुद्धता ओळखण्याची एक पद्धत आहे. यामध्ये हॉलमार्कशी संबंधित अनेक चिन्हे दिसून येतात. या चिन्हांमुळे सोन्याची गुणवत्ता सिद्ध होते. सोने कोणत्या कॅरेटचे आहे ते दिसून येते. सोन्यामध्ये एक कॅरेटपासून ते 24 कॅरेटपर्यंतची तफावत असते. सोन्याचे दागिने तयार करण्यसाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर होतो. ज्वेलरी वर हॉलमार्क लावणे, चिन्हांकित करणे अनिवार्य करण्यात आले आहे. 24 कॅरेट सोने शुद्ध मानण्यात येते. त्यावर 999 अंक चिन्हांकित असते. या सोन्यापासून दागिने तयार करण्यात येत नाही. 22 कॅरेट चे दागिने असतील तर त्यावर 916 अंक चिन्हांकित असतो. 21 कॅरेटचे दागिने असतील तर त्यावर 875 हा अंक चिन्हांकित करण्यात येतो. 18 कॅरेटच्या ज्वेलरीवर 750 अंक असतो. तर 14 कॅरेटच्या दागिन्यावर 585 अंक असतो.
