ओमिक्रॉन चाचणीबाबत काँग्रेस नेत्याची महत्वाची मागणी, सरकार मान्य करणार?

ओमिक्रॉन चाचणीबाबत काँग्रेस नेत्याची महत्वाची मागणी, सरकार मान्य करणार?
कोरोना

मुंबईमध्ये कोरोना टेस्ट पुरेशा प्रमाणात होत आहेत. त्यामुळे कोरोबाधित रुग्ण मोठ्याप्रमाणात समोर येत आहेत. मात्र दुसरीकडे शहरात म्हणाव्या तशा ओमिक्रॉनच्या टेस्ट होताना दिसत नसल्याचे संजय निरुपम यांनी म्हटले आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Jan 07, 2022 | 8:48 PM

मुंबई : शहरात कोरोनाबाधितांची संख्या गेल्या काही दिवसांपासून  झपाट्याने वाढत आहे. मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांनी वीस हजारांचा टप्पा पार केला आहे. आज मुंबईमध्ये 20 हजार 971 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. एकीकडे कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. मात्र दुसरीकडे ओमिक्रॉनचे रुग्ण त्या तुलनेमध्ये कमी आहेत. शहरात ओमिक्रॉनच्या टेस्ट या कमी होत असल्याने रुग्ण कमी प्रमाणत आढळून येत असल्याचे काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी म्हटले आहे. ओमिक्रॉनच्या टेस्ट वाढवण्यात याव्यात अशी मागणी देखील त्यांनी ट्विट करत केली आहे.

काय म्हणाले निरुपम ?

मुंबईमध्ये कोरोना टेस्ट पुरेशा प्रमाणात होत आहेत. त्यामुळे कोरोबाधित रुग्ण मोठ्याप्रमाणात समोर येत आहेत. मात्र दुसरीकडे शहरात म्हणाव्या तशा ओमिक्रॉनच्या टेस्ट होताना दिसत नाहीत. ओमिक्रॉनची टेस्ट ही महाग आहे, त्यासाठी रुग्णाला पाच ते आठ हजारांपर्यंत पैसे मोजावे लागतात. त्यामुळे सरकारने ओमिक्रॉनच्या टेस्टची सोय  ही अल्पदरात अथवा मोफत उपलब्ध करून द्यावी अशी जनतेची मागणी असल्याचे निरुपम यांनी म्हटले आहे.

मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी 20 हजारांपेक्षा अधिक रुग्ण संख्या

मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी 20 हजारापेक्षा अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबई शहरात (Mumbai City) आज 20 हजार 971 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 8 हजार 490 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. दिवसभरात 6 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी ट्वीटरद्वारे दिलेल्या माहितीनुसार मुंबईत आज 20 ङजार 971 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 8 हजार 490 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे. मुंबई शहरात सध्या 91 हजार 731 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. तर मुंबईतील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 87 टक्क्यांवर आहे.

संबंधित बातम्या 

Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचा कहर सुरुच; मॉल, चित्रपटगृहांवर पुन्हा निर्बंध?

Mumbai Corona Update : मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी 20 हजारापेक्षा अधिक कोरोना रुग्ण, 6 जणांचा मृत्यू

Nana Patole : महाराष्ट्रातून सर्वात जास्त डिजीटल सदस्य नोंदणी करणार : नाना पटोले

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें