पुरात अडकलेल्यांचा जीव वाचवणं महत्त्वाचं, विरोधी पक्षनेत्यांनीही पूरग्रस्त भागांचा दौरा करावा: मलिक

कोकण, कोल्हापूरसह संपूर्ण राज्यात पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पुरात अडकलेल्याचं पुनर्वसन केलं जाईल. पण हा नंतरचा भाग आहे. (nawab malik)

पुरात अडकलेल्यांचा जीव वाचवणं महत्त्वाचं, विरोधी पक्षनेत्यांनीही पूरग्रस्त भागांचा दौरा करावा: मलिक
नवाब मलिक, राष्ट्रीय प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us
| Updated on: Jul 23, 2021 | 3:48 PM

मुंबई: कोकण, कोल्हापूरसह संपूर्ण राज्यात पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पुरात अडकलेल्याचं पुनर्वसन केलं जाईल. पण हा नंतरचा भाग आहे. आधी त्यांचा जीव वाचवणं महत्त्वाचं असून त्यावर अधिक भर दिला जात आहे, असं सांगतानाच विरोधी पक्षानेही पूरग्रस्त भागाचा दौरा केला पाहिजे, असं राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. (opposition leaders should visit flood affected area in maharashtra, says nawab malik)

नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं. राज्यभरात पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक जिल्ह्यात पाण्याची पातळी वाढली आहे. परिस्थिती अत्यंत भीषण झाली आहे. अलमाटी, कोयना धरणाचे दरवाजे उघडले जात आहेत. त्यामुळे वस्त्यांमध्ये पाणी आले असून नागरिकांना इतरत्र हलवण्याचे काम सुरू आहे. रायगड, पोलादपूर, चिपळूनला गावची गाव पाण्यात बुडाली आहे. चिपळूनहून 500 लोकांची सुटका करण्यात आली आहे. युद्धपातळीवर बचाव कार्य केलं जात आहे, असं मलिक म्हणाले.

जयंत पाटीलांकडून नियोजन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: मंत्रालयात आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या कार्यालयात बसून माहिती घेत आहेत. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटीलही नियोजन करत आहेत. पुराचा धोका असलेली गावं रिकामी केली जात आहेत. अधिकाऱ्यांशी सतत संपर्क ठेवून आढावा घेतला जात आहे. पुनर्वसन आणि मदत हा नंतरचा भाग आहे. लोकांचा जीव वाचवणं ही आमची प्राथमिकता आहे, असं त्यांनी सांगितलं.

रस्ते, नेटवर्क बंद आहेत

जेव्हा पाणी ओसरेल तेव्हा रत्नागिरी आणि चिपळून या ठिकाणी लोकांना मदत केली जाईल. पण सध्या त्यांच्या राहण्याची आणि खाण्यापिण्याची सोय करणं हे महत्त्वाचं आहे आणि ते काम सुरू आहे, असंही ते म्हणाले. विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही दौरा करावा. त्यांनीही पूरग्रस्तांच्या मदतीला पुढं यावं. बऱ्याच ठिकाणी रस्ते बंद आहेत. नेटवर्क बंद आहेत. पण काही ठिकाणी ते जाऊ शकतात, असंही त्यांनी सांगितलं.

विधीमंडळाचा अधिकार संपवण्याचा डाव

यावेळी त्यांनी राज्यपालांनी नियुक्त करावयाच्या 12 आमदारांबाबतही प्रतिक्रिया व्यक्त केली. 12 आमदारांबाबतचा निर्णय विधिमंडळात घेतला आहे. एकदा निर्णय घेतला की त्याला न्यायालयात आव्हान देता येत नाही. तो अंतिम असतो. पण विधीमंडळाचा अधिकार संपवण्याचा भाजपचा डाव आहे, असा आरोपही त्यांनी केला. (opposition leaders should visit flood affected area in maharashtra, says nawab malik)

संबंधित बातम्या:

ढगफुटीचा अचूक अंदाज वर्तवता येत नाही, तळीये गावात कालच मदत पोहोचली होती: उद्धव ठाकरे

आम्ही पूरग्रस्त भागात बोटीत बसून निर्णय करायचो, तुम्हीही डायरेक्ट फिल्डवर उतरा; चंद्रकांत पाटलांचं आवाहन

Maharashtra Landslide : महाराष्ट्रावर दरडींचा घाला, रत्नागिरी रायगड आणि साताऱ्यात कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त, आतापर्यंत 50 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू

(opposition leaders should visit flood affected area in maharashtra, says nawab malik)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.