पालक संघटनेचा थेट शिवसेना भवनावरच मोर्चा, फीचं काय करणार?

विद्यार्थ्यांच्या फी वाढीच्या मुद्द्यावरुन पालक संघटना आक्रमक झाली आहे (parents march at Shivsena Bhavan)

पालक संघटनेचा थेट शिवसेना भवनावरच मोर्चा, फीचं काय करणार?

मुंबई : विद्यार्थ्यांच्या फी वाढीच्या मुद्द्यावरुन पालक संघटना आक्रमक झाली आहे. ऑल इंडिया पॅरेंट्स असोसिएशन या पालकांच्या संघटनेने आज थेट शिवसेना भवनवर मोर्चा काढला. पालकांची 40 टक्के फी भरण्याची तयारी आहे. मात्र, काही शाळांनी फीची सक्ती केल्याने पालक संघटना आक्रमक झाली आहे. या मुद्द्यावरुन पालकांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे पालकांनी थेट शिवसेना भवनकडे आपला मोर्चा वळवला. शिवसेना भवनसमोर पालकांनी मोठी गर्दी केली (parents march at Shivsena Bhavan).

पालक आज सकाळी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थानी गेले होते. मात्र, तिथे त्यांची वर्षा गायकवाड यांच्यासोबत भेट होऊ शकली नाही. त्यामुळे त्यांनी आपला मोर्चा शिवसेना भवनकडे वळवला. यावेळी शिवसेना भवनबाहेर गर्दी केलेल्या काही पालकांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली (parents march at Shivsena Bhavan). शिवसेना भवनवर स्टेट मायनाॅरिटी कमिशनचे अध्यक्ष जे एम अभ्यंकर यांनी याप्रकरणी एक बैठक बसवू, असं आश्वासन पालकांना दिलं आहे.

“फी वाढीच्या मुद्द्यावरुन आम्ही वर्षा गायकवाड यांना भेटण्याचा वारंवार प्रयत्न केला. प्रत्येक राज्यात 30 टक्के फी कमी करण्यात आलेली आहे. ज्यावेळी आम्ही वर्षा गायकवाड यांना याबाबत विनंती केली तेव्हा त्यांच्याकडून आणि शिक्षण विभागाकडून प्रकरण हाय कोर्टात सुरु असल्याचं सांगण्यात आलं”, असं एका पालक प्रतिनिधीने सांगितलं.

“महाराष्ट्र सरकारने मार्च 2020 मध्ये एक जीआर काढला होता. या जीआरमध्ये फी वाढ करु नये, असं नमूद करण्यात आलं होतं. मात्र, बऱ्याच शाळांनी फी वाढ केली आहे. बऱ्याच शाळांनी 10 फेब्रुवारीचा वेळ दिला आहे. तोपर्यंत पैसे भरले नाहीत प्रत्येक शाळेतील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात येणार आहे”, अशी प्रतिक्रिया एका पालकाने दिली.

“फी भरण्यास आमचा नकार नाही. आम्ही 40 टक्के फी भरण्यास तयार आहोत. राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत. त्यांनी माझं कुटुंब, माजी जबाबदारी ही योजना राबवली आहे. आम्ही देखील त्यांच्याच कुटुंबाचे एक भाग आहोत. त्यामुळे त्यांनी आपलं कुटुंब समजून दिलासा द्यावा. आम्ही सगळ्यांना निवेदन दिलंय”, अशी भावना एका पालकाने व्यक्त केली.

पालकांनी शिवसेना भवनला जावून आपलं निवेदन दिलं आहे. या प्रकरणी शिवसेना पालकांची बाजू मांडेल, अशी पालकांची आशा आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पालकांची बाजू समजून योग्य निर्णय घेतील, अशी अपेक्षा पालकांची आहे. आता याबाबत मुख्यमंत्री काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा : मी उपमुख्यमंत्री असलो, तरी टॅक्स भरावे लागतात; गिरीश प्रभुणेंना नोटीस प्रकरणी अजित पवारांची चौकशीची ग्वाही

Published On - 2:43 pm, Sat, 30 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI