पोस्टाची ‘डबल धमाका’ योजना, नवरा-बायकोला मिळणार 60 हजार रुपयांपर्यंतचा लाभ!

जर आपण नोकरी व्यतिरिक्त इतर उत्पन्नाचा पर्यायी शोध घेत असाल तर पोस्टाची एमआयएस (मंथली इनकम स्कीम) योजना आपल्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकते. | Post office MIS Scheme

पोस्टाची 'डबल धमाका' योजना, नवरा-बायकोला मिळणार 60 हजार रुपयांपर्यंतचा लाभ!
Follow us
| Updated on: Jan 30, 2021 | 11:47 AM

मुंबई : जर आपण नोकरी व्यतिरिक्त इतर उत्पन्नाचा पर्यायी शोध घेत असाल तर पोस्टाची एमआयएस (मंथली इनकम स्कीम) योजना आपल्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकते. जर तुम्ही विवाहित असाल तर या योजनेत तुम्हाला दुप्पट फायदाही मिळू शकतो. पती आणि पत्नी दोघेही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. पोस्ट ऑफिसच्या मंथली इनकम स्कीमच्या अंतर्गत दरमहा पैसे मिळविण्याची संधी मिळते. तसंच यामध्ये जॉइंट खाते उघडण्याची सुविधादेखील आहे. (Post office MIS Scheme Gave Joint Account Holder get benifits 59 Thousand 4 Hundred)

…तर 59 हजार 400 रुपयांची वार्षिक कमाई होऊ शकते!

एमआयएस योजनेच्या जॉइंट अकाऊंटद्वारे आपला नफा दुप्पट होऊ शकतो. वैयक्तिक खाते उघडताना या योजनेत तुम्ही किमान 1,000 आणि जास्तीत जास्त 4 लाख 50 हजार रुपयांची गुंतवणूक करु शकता. किंबहुना जॉइंट अकाऊंटमध्ये जास्तीत जास्त 9 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. सेवानिवृत्त कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना अत्यंत फायदेशीर आहे.

तुम्हासा कसा फायदा मिळू शकतो हे उदाहरणांसहित समजून घ्या….

असं समजा की या योजनेंतर्गत पती-पत्नीने संयुक्त खात्यात 9 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. 9 लाखांच्या ठेवींवर 6.6 टक्के व्याज दराने वार्षिक परतावा 59 हजार 400 रुपये असेल. जर त्याचे 12 भागात विभागणी केली तर हा महिना 4950 रुपये असेल. म्हणजेच तुम्ही तुमच्या खात्यात मासिक 4950 रुपये मागू शकता. पण जर तुम्हाला महिन्याला ही रक्कम नको असेल तर तुम्ही थेट 5 वर्षांनीही रक्कम घेऊ शकता.

या योजनेचे आणखी कोणकोणते फायदे…?

एमआयएस या योजनेची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे दोन किंवा तीन लोक जॉइंट अकाऊंट उघडू शकतात. या अकाऊंट्सच्या बदल्यात मिळणारे उत्पन्न प्रत्येक खातेदारास समान दिले जाते. जर गरज असेल तर जॉइंट अकाऊंट कधीही एकाच खात्यात रूपांतरित केली जाऊ शकतात. सिंगल अकाऊंट्सही जॉइन खात्यात रूपांतरित केले जाऊ शकते. खात्यात कोणत्याही प्रकारचा बदल करण्यासाठी सर्व खाते सदस्यांचा संयुक्त अर्ज द्यावा लागतो.

ही योजना काम कशी करते…?

या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास सध्या वार्षिक व्याज दर 6.6 टक्के आहे. योजनेंतर्गत तुमच्या एकूण ठेवीवरील वार्षिक व्याजानुसार परताव्याचं कॅलक्युलेशन केलं जातं. यात आपले एकूण परतावे वार्षिक आधारावर आहेत. म्हणून, दरमहा हे 12 भागात विभागले गेले आहे. आपण प्रत्येक महिन्यात आपल्या खात्यात एक हिस्सा मागू शकता. जर आपल्याला महिन्याला या रकमेची आवश्यकता नसेल तर ही रक्कम तुम्ही मूळ रकमेला जोडल्यास त्यावर व्याज देखील मिळते.

(Post office MIS Scheme Gave Joint Account Holder get benifits 59 Thousand 4 Hundred)

हे ही वाचा :

Budget 2021 | सेवानिवृत्तीनंतर ‘या’ योजनेतून मिळेल निवृत्ती वेतन, बजेटमध्ये मोठ्या तरतुदीची शक्यता..

PNB कडून दरमहा 30 हजार रुपये कमावण्याची संधी; आताच भविष्य करा सुरक्षित

सोनं आजही महागलं, चांदीला मोठी झळाळी, बजेटनंतर मात्र दर पडणार? वाचा काय घडतंय बजेटच्या पार्श्वभूमीवर

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.