AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत महिलांना अखेर लोकलने प्रवासाची मुभा, पीयूष गोयल यांचे ‘नवरात्री’ गिफ्ट

सर्व महिला प्रवाशांना उद्यापासून सकाळी 11 ते दुपारी 3 दरम्यान आणि सायंकाळी 7 नंतर मुंबई उपनगरीय ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत आहे.

मुंबईत महिलांना अखेर लोकलने प्रवासाची मुभा, पीयूष गोयल यांचे 'नवरात्री' गिफ्ट
| Updated on: Oct 20, 2020 | 5:10 PM
Share

नवी दिल्ली : मुंबईतील महिलांना लोकलमधून प्रवास करण्याच्या मागणीला अखेर यश आलं आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी अखेर महिलांना लोकलमधून उद्यापासून प्रवास करण्यास मुभा देण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. गोयल यांनी तसं ट्विटच केलं आहे. (Piyush Goyal allows Women to travel by Mumbai Local)

सर्व महिला प्रवाशांना उद्यापासून (21 ऑक्टोबर) सकाळी 11 ते दुपारी 3 दरम्यान आणि सायंकाळी 7 नंतर मुंबई उपनगरीय ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत आहे.

मला घोषित करण्यास आनंद होत आहे की, उद्यापासून सर्व महिला प्रवाशांना स.11 ते दु.3 दरम्यान व सायं.7 नंतर मुंबई उपनगरीय ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत आहे.रेल्वेची नेहमीच तयारी होती त्यामुळे आज मिळालेल्या महाराष्ट्र शासनाच्या पत्रानुसार आम्ही त्वरित परवानगी देत आहोत.

— Piyush Goyal (@PiyushGoyal) October 20, 2020

विशेष म्हणजे घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्य सरकार सर्व महिला प्रवाशांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देणार असल्याचं एक परिपत्रक जारी करण्यात आलं होतं. पण रेल्वे बोर्डानं असा कोणताही निर्णय झालेला नसल्याचं स्पष्ट केल्याने हा मुहूर्त लांबणीवर पडला होता. आता केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी अधिकृतरीत्या रेल्वेमध्ये महिलांना प्रवासास मुभा दिली आहे.

राज्य सरकारकडून महिलांनाही मुंबई लोकलमध्ये प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली होती. तत्पूर्वी राज्य सरकारने त्याबाबतचे पत्रक प्रसिद्धीस दिलं होतं. महिलांना मुंबई लोकलमध्ये सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत तर संध्याकाळी 7 नंतर पुढे प्रवास करता येणार असून, महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी क्यूआर कोडची आवश्यकता नसल्याचंही या परिपत्रकात नमूद करण्यात आलं होतं. (Piyush Goyal allows Women to travel by Mumbai Local)

अनलॉकची प्रक्रिया केल्यानंतर अनेक गोष्टी हळूहळू सुरू केल्या आहेत. सुरुवातीला दुकाने, भाजी मार्केट, चिकण-मटण शॉप सुरू करण्यात आले. हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्यात आले. हळूहळू सर्व गोष्टी सुरू केल्या जात आहेत. आता सिनेमागृहदेखील सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. आता मुंबईची लाईफलाईन असलेली लोकलमधून महिलांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

कोरोनामुळे लॉकडाऊनदरम्यान मुंबई लोकल रेल्वे 22 मार्चपासून बंद होती. त्यानंतर अनलॉक झाले, तेव्हापासून अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली. पण सर्वसामान्य नागरिकांना लोकलमध्ये प्रवेश मिळत नसल्याने, सर्वसामान्य मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत. शिवाय रस्त्यावर ट्रॅफिकमुळे मुंबईकरांचे अनेक तास हे प्रवासातच जात आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर मनसेसह अनेकांनी मुंबई लोकल रेल्वे सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याची मागणी लावून धरली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयानं वकिलांना ट्रेननं प्रवास करण्याची मुभा दिली होती.

संबंधित बातम्या

महिलांच्या लोकल प्रवासावर भाजप गप्प का? : सचिन सावंत

…म्हणून तूर्तास महिलांना लोकलनं प्रवास करता येणार नाही

(Piyush Goyal allows Women to travel by Mumbai Local)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.