AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई-पुण्यासह राज्यात गणेशोत्सवासाठी पोलिस दल सज्ज, सर्वत्र कडेकोट बंदोबस्त

गणेशोत्सव तोंडावर आला असून गणरायाच्या आगमनासाठी मुंबापुरी सज्ज झाली आहे. मुंबई-पुण्यासह सर्वत्र प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गणेशोत्सवात 'लालबागच्या राजा'च्या मंडपामध्ये रोज लाखो भाविकांची गर्दी ओसंडून वाहत असते. दर्शनासाठी येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचीही संख्या मोठी असते.त्यामुळे अधिक काळजी घेण्यात येणार आहे.

मुंबई-पुण्यासह राज्यात गणेशोत्सवासाठी पोलिस दल सज्ज, सर्वत्र कडेकोट बंदोबस्त
ganesh festival
| Updated on: Aug 25, 2025 | 7:46 PM
Share

विघ्न विनाशक गणरायाच्या आगमनासाठी आता काही तास राहिले आहेत. मुंबई आणि पुण्यात मोठ्या प्रमाणावर हा उत्सव साजरा केला जात असल्याने मुंबई आणि पुण्यासह राज्यातील पोलिस बंदोबस्तात वाढ केलेली आहे. मुंबईतील लालबागचा राजासह सर्व मोठ्या गणेश मंडळांना सुरक्षा पुरविण्यात आले असून यंदा मोठ्या प्रमाणात एआय कॅमेऱ्यांचा वापर लालबागचा राजासाठी करण्यात आलेला आहे.

पुणे येथील गणपतीची आरास पाहण्यासाठी दूरवरुन लोक पुण्याला जात असतात. येथे गणेशोत्सवाला मुंबईतील गणेशोत्सवाप्रमाणेच मोठा इतिहास आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात ७००० पोलिस तैनात असणार आहेत. पुणे शहरात एकूण ३९५९ सार्वजनिक गणेश मंडळे आहेत.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी एकूण ८२ बैठक घेतल्या आहेत. प्रत्येक महत्वाच्या चौकात एआय कॅमेऱ्यांचे लक्ष ठेवले जाणार आहे.चेंगराचेंगरी परिस्थिती उद्भवू नये म्हणून विशेष गर्दीवर नियोजन करण्यात आले आहे. ३० ऑगस्ट ते ४ सप्टेंबर आणि ६ सप्टेंबर असे सात दिवस सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत ध्वनिक्षेपक वापरायला परवानगी देण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षेबरोबरच दागिने आणि मोबाईल चोरणाऱ्यांवर अँटी चेन स्नॅचिंग पथकाचे लक्ष असणार आहे.

पुण्यात ७००० पोलिस तैनात

पुण्यात बंदोबस्तसाठी पोलिस आयुक्त,पोलिस सह आयुक्त, अपर पोलिस आयुक्त, १० पोलिस उपयुक्त, २७ सहायक पोलिस आयुक्त, १५४ पोलिस निरीक्षक, ६१८ सहायक पोलीस निरीक्षक, ६२८६ अंमलदार, १६ स्ट्रायकर, १४ क्यूआरटी टीम, ७ बीडीडीएस पथके, ११०० होमगार्ड, १ एसआरपीएफ कंपनी तैनात असणार असल्याचे पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

मुंबई पोलिस दल सज्ज

मुंबईत गणेशोत्सवा दरम्यान ७ अतिरिक्त पोलिस आयुक्त ३६ पोलिस उपायुक्त,५१ सहाय्यक पोलिस आयुक्त,२६०० पोलिस अधिकारी १५ हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे असे सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी सांगितले. लालबागच्या राजासाठी स्वतंत्र पोलिस बंदोबस्त असणार आहे.लालबागच्या राजासाठी ५०० पेक्षा जास्त पोलिसांचा बंदोबस्तात असणार आहे.यात श्वानपथक, बीडीडीएस, १२ एसआरपी कंपनी, क्यूआरटी, ११ हजार सीसीटीव्ही मुंबईत कार्यान्वित असणार आहेत.याशिवाय गर्दीच्या ठिकाणी ड्रोनद्वारेही लक्ष ठेवले जाणार आहे. चौपाटीवरही स्वतंत्र सीसीटीव्ही लावण्यात आले आहे. यासह ४५० मोबाइल व्हॅन, ३५० बीट मार्शल याचा फिरता पहारा मुंबईत राहणार आहे.

लालबागच्या राजासाठी खास दक्षता

लालबागच्या राजासाठी स्वतंत्र पोलिस बंदोबस्त राहणार आहे. यावर्षी लालबागचा राजाची सुरक्षा अधिक कडेकोट असणार आहे. मुंबई पोलीस, खाजगी सुरक्षा रक्षक आणि मंडळाचे कार्यकर्ते तैनात असणार आहेत. CCTV सोबत सुरक्षेसाठी मंडळाकडून AI चा वापर करण्यात येणार आहेत.पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या यूट्युबर ज्योती मल्होत्रा हिने ‘लालबागचा राजा’ गणपतीच्या मंडपातही रेकी केल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर मंडळाने आपली सुरक्षाव्यवस्था अधिक अभेद्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून पोलिसांनी केलेल्या सुरक्षा उपाययोजनांच्या पलिकडे मंडळाने स्वतः चे २५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे परिसरात कार्यान्वित केले आहेत. त्याशिवाय अत्याधुनिक कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) मदतही घेतली जाणार आहे.

 गणपती स्पेशल एसटी बसेस

पालघर जिल्ह्यातील वसई- विरार- नालासोपारा येथून सर्वाधिक 570 एसटी महामंडळाच्या बस कोकणात सोडण्यात आल्या आहेत. 570 पैकी 397 बस ह्या केवळ विरार – मनवेलपाडा येथून कोकणात जात आहेत. गणेशोत्सवानिमित्त पालघर एसटी विभागामार्फत कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी विशेष बस सोडण्यात येत आहेत. यासाठी नागपूर प्रदेशातून 150 बस, अमरावती प्रदेशातून 173 बस,पालघर विभागातून 158 बस आणि रत्नागिरी विभागातून 99 बस अशा अतिरिक्त 580 विशेष बसचे नियोजन केवळ वसई- विरारसाठी पालघर विभागाने केले आहे.

त्यातील 570 बसेस या कोकणात जाण्यासाठी बुकिंग झाल्या असून, एका बसचे भाडे 35 हजारप्रमाणे एसटी महामंडळाकडे ऍडव्हान्स जमाही झाले आहे. विरारच्या मनवेलपाडा विभागात शिवसेना उबाटा विरार शहरप्रमुख उदय जाधव यांनी सर्व बस चालक, वाहक, इतर कर्मचारी यांची राहणे जेवणाची व्यवस्था केली आहे.

अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय.
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?.
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन.
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार.
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल.
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट.
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले.
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना...
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना....
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.