संजय राठोड पत्नी आणि मेव्हण्यासह मुख्यमंत्र्यांना भेटणार; कॅबिनेटपूर्वीच मोठा निर्णय होणार?

विरोधकांकडून राजीनाम्यासाठी दबाव येत असल्याच्या पार्श्वभूमीवर वनमंत्री संजय राठोड आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. (Pooja Chavan Suicide Case: Sanjay Rathod will meet cm uddhav thackeray today)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:03 PM, 28 Feb 2021
संजय राठोड पत्नी आणि मेव्हण्यासह मुख्यमंत्र्यांना भेटणार; कॅबिनेटपूर्वीच मोठा निर्णय होणार?
संजय राठोड आणि पत्नी शीतल राठोड

मुंबई: विरोधकांकडून राजीनाम्यासाठी दबाव येत असल्याच्या पार्श्वभूमीवर वनमंत्री संजय राठोड आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. राठोड हे पत्नी आणि मेव्हण्यासह कॅबिनेट बैठकीपूर्वीच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे राठोड यांच्या बाबत कॅबिनेटपूर्वीच काही मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Pooja Chavan Suicide Case: Sanjay Rathod will meet cm uddhav thackeray today)

आज संध्याकाळी 5.30 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वीच राठोड हे त्यांची पत्नी शीतल आणि मेव्हणे सचिन नाईक यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. राठोड गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी वेळ मागत होते. मात्र, त्यांना मुख्यमंत्र्यांकडून वेळ देण्यात आला नव्हता. आता उद्यापासून राज्याचं सुरू होणारं अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि विरोधकांकडून राठोड यांच्या राजीनाम्यासाठी वाढत असलेला दबाव या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राठोड यांना भेटीची वेळ दिली आहे. त्यामुळे राठोड आजच्या भेटीत मुख्यमंत्र्यांकडे केवळ आपली बाजू मांडणार की मंत्रिपदाचा राजीनामा देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सपत्नीक भेटण्यामागे कारण काय?

राठोड हे सपत्नीक मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत त्यांचे मेव्हणेही असणार आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पूजा चव्हाण प्रकरणात आपण निर्दोष असल्याचं राठोड हे पत्नीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना सांगण्याचा प्रयत्न तर करत नाहीत ना? अशी शक्यताही वर्तवली जात आहे.

कॅबिनेटला जाणार का?

उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. आज त्यानिमित्त विरोधकांसाठी चहापानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. तसेच आज संध्याकाळी कॅबिनेटचीही बैठक होणार आहे. त्यामुळे राठोड हे मुंबईतील छेडा सदन या त्यांच्या निवासस्थानी आहेत. मात्र, ते कॅबिनेटच्या बैठकीला जाणार की नाही? याबाबतच्या उलटसुलट चर्चा सुरू आहेत. कॅबिनेटपूर्वी राठोड मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. या भेटीनंतरच राठोड हे कॅबिनेटला जाणार की नाही? हे स्पष्ट होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

महंत राठोडांच्या पाठिशी

दरम्यान, पोहरादेवीच्या महंतांनी पुन्हा एकदा राठोड यांच्या पाठिशी ठामपणे उभे असल्याचं म्हटलं आहे. कोणत्याही चौकशीशिवाय राठोड यांचा राजीनामा घेऊ नये, असं आवाहन महंतांनी मुख्यमंत्र्यांना केलं आहे. राठोड यांचा राजीनामा घेऊ नये म्हणून पोहरादेवीतून मुख्यमंत्र्यांना ई-मेल पाठवण्यात येणार असल्याचं महंत जितेंद्र महाराज यांनी स्पष्ट केलं आहे. (Pooja Chavan Suicide Case: Sanjay Rathod will meet cm uddhav thackeray today)

 

संबंधित बातम्या:

मोठी बातमी ! आधी मुख्यमंत्र्यांची भेट, नंतर पोहरादेवीला जाणार, संजय राठोड यांचं ठरलं

माणिकराव ठाकरेंचा पराभव, क्रीडामंत्र्यांना हरवलं, खडसेंविरोधातही पंगा, संजय राठोडांची वादळी कारकीर्द

LIVE | संजय राठोड यांच्या अडचणी वाढणार, पूजाची आजी पोलिसांत तक्रार देणार

(Pooja Chavan Suicide Case: Sanjay Rathod will meet cm uddhav thackeray today)