मोठी बातमी ! आधी मुख्यमंत्र्यांची भेट, नंतर पोहरादेवीला जाणार, संजय राठोड यांचं ठरलं

वनमंत्री संजय राठोड ( Sanjay Rathore) यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असताना राजकीय गोटात मोठ्या घडामोडी घडत आहेत. (sanjay rathore resignation uddhav thackeray)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:21 AM, 28 Feb 2021
मोठी बातमी ! आधी मुख्यमंत्र्यांची भेट, नंतर पोहरादेवीला जाणार, संजय राठोड यांचं ठरलं
संजय राठोड, वन मंत्री

मुंबई : वनमंत्री संजय राठोड ( Sanjay Rathore) यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असताना राजकीय गोटात मोठ्या घडामोडी घडत आहेत. एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे वेगवेगळ्या मार्गांनी पूजा चव्हाण आत्महत्येचा तपास करत आहेत. त्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. तर दुकरीकडे संजय राठोड हे राजीनामा देणार असल्याचं सांगितलं जात आहे. आज राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक होण्याआधी संजय राठोड हे उद्धव ठाकरे यांना भेटणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. तसेच राठोड राजीनामा देण्याआधी बंजारा समाजाचे महंत तसेच बंजारा समाजाशी चर्चा करुन योग्य तो निर्णय घेतील, असेही म्हटले जात आहे. (Sanjay Rathore may give resignation will meet to Uddhav Thackeray)

राठोड महंतांना भेटणार

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांचे नाव समोर आल्यामुळे सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली आहे. सरकारवरील वाढता दबाव लक्षात घेता उद्धव ठाकरे यांनी वेगवेगळ्या यंत्रणांकडून या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. तर दुसरीकडे संजय राठोड हे स्वत:हून राजीनामा देणार असल्याचं सांगितलं जात आहे. आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक आहे. ही बैठक होण्याआधी राठोड हे उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत. त्यावेळी दोघांमध्ये राजीनाम्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राठोड हे बंजारा समाजाचे महंत आणि बंजार समाजाशी चर्चा करणार असल्याचंही म्हटलं जात आहे. त्यासाठी ते पोहरादेवीला जाणार आहेत.

संजय राठोड आमदारकीचाही राजनीमा देणार?

दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. या प्ररणामुळे राज्यात खळबळ उडाल्यामुळे राठोड यांच्या अडचणींत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर राठोड मंत्रिपदासोबतच आपल्या आमदारकीचाही राजीनामा देणार असल्याचं बोललं जात आहे. आमदारकीचा राजीनामा देऊन ते पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जाण्याचीही शक्यता आहे.

इतर बातम्या:

VIDEO | शरद पवार माझा बापच, चित्रा वाघ यांचा कंठ दाटला

राठोडांच्या राजीनाम्यावरुन भाजप आक्रमक; महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक, आज मोठ्या घडामोडी घडणार

संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी सोमवारी भाजपचं राज्यव्यापी ‘नगाडा बजाव आंदोलन’

(Sanjay Rathore may give resignation will meet to Uddhav Thackeray)