कोरोना रुग्ण शोधण्यासाठी आता पल्स ऑक्सिमीटर, असं होणार निदान?

पल्स ऑक्सिमीटरद्वारे संबंधित व्यक्तीच्या (Pulse Oximeter For Corona Detection) रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण समजेल.

कोरोना रुग्ण शोधण्यासाठी आता पल्स ऑक्सिमीटर, असं होणार निदान?
आता ऑक्सिमीटर आणि ऑक्सिजन केंद्राचा काळा बाजार थांबणार
Follow us
| Updated on: Apr 26, 2020 | 4:52 PM

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता लवकरच (Pulse Oximeter For Corona Detection) आरोग्य सेवकांना पल्स ऑक्सिमीटर देण्यात  येणार आहे. या यंत्राद्वारे लोकांमध्ये कोरोनाची लक्षण आहे की नाही हे समोर येणार आहे. परळमधील केईएम रुग्णालयाचे माजी डीन संजय ओक यांनी कोरोना संदर्भातील महत्त्वाची माहिती दिली आहे.

आरोग्य सेवकांना देण्यात येणार पल्स ऑक्सिमीटरद्वारे संबंधित व्यक्तीच्या (Pulse Oximeter For Corona Detection) रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण समजेल. जर त्याच्या शरीरातील प्रमाण कमी असेल तर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले जाणार आहे.

तसेच जर ऑक्सिजनची मात्रा ही 94 पेक्षा कमी असेल तर त्याला तातडीने कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार आहे. यामुळे कोरोनाबाधित संशयित रुग्णांचे निदान तातडीने करणे शक्य होणार आहे.

रुग्णांच्या तपासणीचा दर्जा वाढवण्यासाठी पल्स ऑक्सिमीटरचा वापर सुरु केला आहे. यापूर्वी रुग्णालयात डॉक्टर, नर्सकडून पल्स ऑक्सिमीटरचा वापर केला जात होता. मात्र आता मुंबईत कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी पल्स ऑक्सिमीटरचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे धारावीत मोठ्या संख्येनं रुग्ण असल्याने पल्स ऑक्सिमीटर निर्णायक ठरेल, असे बोलले जात आहे. सध्या लक्षणेविरहित रुग्णांचे प्रमाण अधिक आढळून येत आहेत.

पल्स ऑक्सिमीटर नेमंक काय?

  • पल्स ऑक्सिमीटर हे थम इम्प्रेशन प्रमाणेच एक मशीन आहे.
  • यात बोट ठेवल्यानंतर माणसाच्या शरीरात रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कळते.
  • जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण हे 95 ते 100 दरम्यान असेल तर ते साधारण मानलं जातं.
  • याचा अर्थ त्या व्यक्तीला कोरोना झालेला नाही.
  • मात्र जर एखाद्याच्या शरीरात रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण हे 94 किंवा त्याहून कमी असेल तर त्याला संशंयित समजलं जातं.
  • ज्या व्यक्तींना अन्य आजार आहेत. त्यांच्यात ऑक्सिजन घेण्याची क्षमता कमी असते. त्यामुळे त्यांच्या रक्तातील
  • ऑक्सिजनचे प्रमाण कमी दिसून येते.

संबंधित बातम्या : 

Mann Ki Baat : जगाला औषधांची मदत करुन भारताने संस्कृतीचं दर्शन घडवलं : पंतप्रधान

यवतमाळमध्ये कोरोनाचा विळखा वाढला, 24 तासात 27 नवे रुग्ण

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.