संयमाचा अंत पाहू नका, दोन डोस घेतलेल्यांना रेल्वे प्रवासाची परवानगी द्या; दरेकरांच्या नेतृत्वात जोरदार आंदोलन

कोरोनाच्या लसीचे दोन डस घेतलेल्यांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात यावी या मागणीसाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली आज जोरदार आंदोलन करण्यात आलं. (pravin darekar demand to start local, protest at borivali station)

संयमाचा अंत पाहू नका, दोन डोस घेतलेल्यांना रेल्वे प्रवासाची परवानगी द्या; दरेकरांच्या नेतृत्वात जोरदार आंदोलन
pravin darekar

मुंबई: कोरोनाच्या लसीचे दोन डस घेतलेल्यांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात यावी या मागणीसाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली आज जोरदार आंदोलन करण्यात आलं. बोरिवली स्थानकाबाहेर भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत हे आंदोलन केलं. यावेळी संयमाचा अंत पाहू नका. दोन डोस घेतलेल्यांना रेल्वे प्रवासाची परवानगी द्या, असा इशाराच प्रवीण दरेकर यांनी दिला आहे. (pravin darekar demand to start local, protest at borivali station)

प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांनी बोरिवली स्थानकाबाहेर जमून जोरदार घोषणा देत निदर्शने केली. यावेळी आंदोलकांकडून आघाडी सरकारच्या निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या. ही निदर्शने करताना आंदोलक अधिकच आक्रमक झाले होते. आंदोलनात महिला कार्यकर्त्यांचा सहभाग मोठा होता. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रेल्वे पोलीस आणि जीपीआर तैनात करण्यात आले होते. तसेच आंदोलकांनी रेल्वे स्थानकात घुसू नये म्हणून रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारात बॅरेकेटिंग करण्यात आले होते. खासदार गोपाळ शेट्टी, आमदार सुनील राणे, आमदार मनिषा चौधरी यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते.

रोज 800 रुपये आणायचे कुठून?

ज्यांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहेत. त्यांच्यासाठी रेल्वे प्रवास सुरू करा. लोकांच्या संयमाचा अंत पाहू नका. आम्ही पत्र लिहिले, पण त्याला सरकारने दाद दिली नाही. लोकांना कोविड काळात काम नाही. त्यांना मुंबईत कामासाठी येण्यासाठी रोज 700-800 रुपये खर्च येत आहे. कामावर नाही गेल्या नोकरी धोक्यात येत आहे. सर्व सामान्य माणसाने एवढा पैसा आणायचा कुठून? असा सवाल दरेकर यांनी केला.

अहंकारापोटी निर्णय नाही

मुख्यमंत्री अहंकारापोटी रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेत नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे रेल्वे सुरू करण्याची मागणी करत आहेत. पण मुख्यमंत्री ऐकायला तयार नाहीत. हे अहंकारापोटी केलं जात आहे. हे सरकार निष्क्रिय आणि उदासीन आहे, असा घणाघाती हल्लाही त्यांनी चढवला.

ही तर सुरुवात

रेल्वे हा केंद्राचा विषय आहे. पण आपत्कालीन व्यवस्थापन कायद्यानुसार राज्याला अधिकार आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही रेल्वे सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे. राज ठाकरेंसह अनेक पक्षांनी रेल्वे सुरू करणायाची मागणी केली आहे. पण केवळ अहंकारापोटी मुंबईची लाईफलाईन सुरू केली जात नाही, असं सांगतानाच आजचं आंदोलन ही तर केवळ सुरुवात आहे, या पुढे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा देतानाच रेल्वे सुरू करण्यासाठी आघाडी सरकारने तोडगा काढावा, असं आवाहनही त्यांनी केलं. (pravin darekar demand to start local, protest at borivali station)

 

संबंधित बातम्या:

कृष्णा नदीचं पाणी सांगलीत शिरलं, तर कोल्हापूरजवळ हायवे अजूनही बंद, 20 किमीची भलीमोठी रांग

अतिवृष्टीमुळे नांदेडमध्ये मोठं नुकसान, तातडीने पंचनामे करा, आमदार जवळगावकर वडेट्टीवर-अशोक चव्हाणांच्या भेटीला

Taliye landslide death toll : तळीये गाव होत्याचं नव्हतं झालं, 40 मृतदेह एका रांगेत, आख्खं गाव स्मशानात बदललं

(pravin darekar demand to start local, protest at borivali station)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI