Video: नाम भी राजीव था..और हम से छीने भी उसी उम्र में गये, सातवांच्या प्रार्थना सभेत प्रियंका गांधींचा हुंदका दाटला

काँग्रेसचे हिंगोलीचे खासदार आणि राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाच्या पदांवर काम करणाऱ्या राजीव सातव यांच्याविषयी बोलताना काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना हुंदका दाटून आल्याचं पाहायला मिळालं.

Video: नाम भी राजीव था..और हम से छीने भी उसी उम्र में गये, सातवांच्या प्रार्थना सभेत प्रियंका गांधींचा हुंदका दाटला
Follow us
| Updated on: May 19, 2021 | 10:06 PM

नवी दिल्ली : काँग्रेसचे हिंगोलीचे खासदार आणि राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाच्या पदांवर काम करणाऱ्या राजीव सातव यांच्याविषयी बोलताना काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना हुंदका दाटून आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी त्यांना आम्ही जसं वडील राजीव गांधी यांना वयाच्या 46 व्या वर्षी गमावलं, तसंच राजीव सातव यांनाही ते 46 वर्षांचे असतानाच गमावलंय. त्यांच्या जाण्यानं घरातील सदस्य गमावला आहे, असं मत प्रियंका गांधींनी व्यक्त केलं. विशेष म्हणजे हे बोलत असताना त्यांना भावना अनावर झाल्या आणि वडील राजीव गांधी आणि राजीव सातव यांच्याविषयी बोलताना त्यांना हुंदका दाटून आला. त्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या राजीव सातव यांच्या ऑनलाईन श्रद्धांजली सभेत बोलत होत्या (Priyanka Gandhi get emotional while speaking on Rajiv Satav and Rajiv Gandhi death).

प्रियंका गांधी म्हणाल्या, “ज्या वयात माझे वडील माझ्यापासून हिरावले गेले त्याच वयात राजीव सातव हेही हिरावले गेले. मनात विचार आला की त्यांचंही नाव राजीवच होतं आणि यांचंही. राजीव गांधींचा मृत्यू झाला तेव्हा त्यांचंही वय 46 वर्षे होतं आणि राजीव सातव यांचंही वय 46 वर्षेच होतं. या माणसात एक उज्वल भविष्य, समोर संपूर्ण आयुष्य, देशासाठी काही तरी करण्याची इच्छा आणि क्षमताही होती. त्यांच्या जाण्यामुळे घरातील सदस्य गमावल्याचं दुःख होत आहे.”

“राजीव यांच्या निधनाने आमच्या परिवारातील एक सदस्य गेल्याचे दुःख”

“राजीव यांना श्रद्धांजली अर्पण करत आहे यावर विश्वास बसत नाही. अत्यंत शांत स्वभावाचा, पक्षाशी निष्ठा असणारा, कामाच्या जोरावर पक्षावर विविध भूषवणारे, पक्ष कार्याला प्रथम महत्व देणारे राजीव यांचे एवढ्या कमी वयात निधन होईल असे वाटले नव्हते. ते एक लढवय्या नेता होते. पण कोरोनाविरुद्धची लढाई ते हरले. राजीव यांच्या निधनाने आमच्या परिवारातील एक सदस्य गेल्याचे दुःख आहे. सातव कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो हीच प्रार्थना,” असंही प्रियंका गांधी यांनी नमूद केलं.

“लोकसभेत काँग्रेस पक्षाचे 45 सदस्य असताना ते 5-7 व्यक्तीचे काम एकटे करायचे”

राहुल गांधी यावेळी म्हणाले, “राजीव सातव यांचे निधन झाले यावर आजही विश्वास बसत नाही, त्यांच्या निधनाने सातव परिवारावर जेवढा मोठा आघात झाला आहे तेवढाच आघात काँग्रेस पक्षावरही झाला आहे. राजीव यांची दोन कुटुंबं होती एक त्यांची आई, पत्नी व मुले आणि दुसरे काँग्रेस पक्ष. राजीवमध्ये एक चमक आहे हे पहिल्याच भेटीत दिसले होते, त्यांनी नेहमी पक्षासाठी उत्तम काम केले. राजकारणात त्यांनी विविध पदांची जबाबदारी यशस्वीपणे पार पडली. राजीव कधीच कोणाबद्दलही वाईट बोलत नसे. लोकसभेत काँग्रेस पक्षाचे 45 सदस्य असताना ते 5-7 व्यक्तीचे काम एकटेच करत असत. राजीव यांच्या निधनाने मी एक चांगला सहकारी व मित्र गमावला आहे. राजीव आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांच्या परिवाराच्या पाठीशी काँग्रेस पक्ष सदैव भक्कपणे उभे राहील.”

“राजीव यांच्या निधनाने पक्षाची व वैयक्तीक मोठी हानी”

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, “राजीव सातव हे उमदे नेतृत्व तसेच पक्षाचे भविष्य होते. कोरोनाने त्यांना अकाली हिरावून घेतले. शेतकरी, कामगारांसाठी लढणारा नेता अशी त्यांची ओळख होती. लोकसभेत त्यांच्याबरोबर काम केले. राजीव यांच्या निधनाने पक्षाची व वैयक्तीक मोठी हानी झाली आहे.”

“राजीव सातव यांच्याबरोबर संसदेत एकत्र काम केले. पाच वर्ष त्यांनी संसदेत उत्तम काम केले. ते अभ्यासपूर्ण विषय मांडायचे, स्वतःच्या मेहनतीच्या बळावर ते देशपातळीवर पोहचले. राजीव यांचे निधन हा एक मोठा धक्का असून पक्ष व सातव कुटुंबासाठी ही मोठी हानी आहे,” असं मत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं.

सुशिलकुमार शिंदे म्हणाले, “राहुलजी आणि सोनियाजी गांधी यांनी राजीव सातव यांच्यावर नेहमीच मोठ्या विश्वासाने जबाबदारी सोपवली आणि त्यांनी ती जबाबदारी उत्तमरितीने पार पाडून नेतृत्वाचा विश्वास सार्थ ठरवला. वंचित, मागास समाजाचे प्रश्न ते मोठ्या हिरीरीने मांडत असत. त्यांच्या निधनाने आपण एक तरुण नेतृत्व गमावले आहे.”

हेही वाचा :

कोरोनाने गांधी कुटुंबाचे दोन ‘आधार’ हिरावले, अहमद पटेलांनंतर राजीव सातव यांचं निधन

Rajeev Satav Death | राष्ट्रवादीची सीट घेऊन राजीव सातवांना मैदानात उतरवलं, मोदी लाटेतही जिंकून काँग्रेसची मान उंचावली

राजकारणातला देवमाणूस गेला, राजीव सातवांबद्दल बोलताना वडेट्टीवार ढसाढसा रडले

व्हिडीओ पाहा :

Priyanka Gandhi get emotional while speaking on Rajiv Satav and Rajiv Gandhi death

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.