AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Gandhi : राहुल गांधींचा उद्या परभणी दौरा; सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना भेटणार, बीडमधील मस्सीजोगमध्ये जाण्याची शक्यता

Rahul Gandhi visit to Parbhani tomorrow : उद्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे परभणी दौर्‍यावर येत आहेत.न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना ते भेट देतील. तर बीड जिल्ह्यातील मस्सीजोगमध्ये ते देशमुख कुटुंबियांना भेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Rahul Gandhi : राहुल गांधींचा उद्या परभणी दौरा; सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना भेटणार, बीडमधील मस्सीजोगमध्ये जाण्याची शक्यता
राहुल गांधी परभणी दौऱ्यावर
| Updated on: Dec 22, 2024 | 9:24 AM
Share

लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात येत आहेत. ते सोमवारी परभणीत येत आहेत. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी गांधी परभणी दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना भेट देणार आहेत. परभणीतील हिंसाचारानंतर विविध नेत्यांनी परभणीला भेट दिली आहे. काल ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट दिली होती. तर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात ते बीड जिल्ह्यातील मस्सीजोगमध्ये जाण्याची पण शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यांच्या दौर्‍यात अजून याविषयीची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

असा आहे दौरा

सोमवारी 23 डिसेंबर रोजी राहुल गांधी दिल्ली येथून नांदेड येथे विमानाने येथील. दुपारी पावणेतीन वाजता ते परभणीत दाखल होतील. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरी ते जातील. कुटुंबियांशी संवाद साधतील आणि त्यांचे सांत्वन करतील. तर दुपारी साडेतीन वाजता नांदेड विमानतळावरून ते दिल्लीला रवाना होतील, अशी माहिती समोर येत आहे. तर या दौऱ्यादरम्यान ते मस्साजोग येथे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूचं कारण काय?

10 डिसेंबर रोजी एका व्यक्तीने परभणी जिल्हा रेल्वे स्थानकाजवळ संविधान प्रतिकृतीची विटंबना केल्याने हिंसाचार उसळला. परभणी बंदची हाक देण्यात आली. बंद दरम्यान आक्रमक तरुणांनी वाहनांची, दुकानांची तोडफोड केली. प्रकरणात पोलीसांनी दोन दिवसानंतर 12 डिसेंबर रोजी सोमनाथ याच्यासह 300 लोकांना ताब्यात घेतले होते. तर 72 तासानंतर न्यायालयीन कोठडीत त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. तर सूर्यवंशीने छातीत दुखत असल्याचे सांगीतल्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याचे आणि त्याचा मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांनी केला होता. तर सूर्यवंशीच्या शवविच्छेदन अहवालात अनेक जखमा झाल्यामुळे मृत्यू झाल्याचे म्हटलं आहे. राज्य शासनाने या प्रकरणात सूर्यवंशीच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या सर्व घडामोडीनंतर आता राहुल गांधी हे या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी परभणीत येत आहेत.

रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.