AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rain Alert : राज्यात पावसाची जोरदार बॅटिंग; रस्त्यांना नद्यांचे स्वरुप, अनेक गावात शिरेल पाणी, सुरक्षित राहा, काळजी घ्या

Heavy Rain Alert in Maharashatra : राज्यात पावसाने जोरदार बॅटिंग केली. राज्यातील अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले. घरं पडली. संसार उघड्यावर पडला. खायला सुद्धा अन्न नसल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी टीव्ही 9 शी बोलताना दिल्या.

Rain Alert : राज्यात पावसाची जोरदार बॅटिंग; रस्त्यांना नद्यांचे स्वरुप, अनेक गावात शिरेल पाणी, सुरक्षित राहा, काळजी घ्या
राज्यात पावसाचे धुमशान
| Updated on: Aug 19, 2025 | 10:00 AM
Share

हवामान खात्याने मुंबईसह उपनगरांना रेड अलर्ट दिला आहे. तर राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडून अनेक गावांना पुराचा वेढा पडला. तर अनेक गावात पुराचे पाणी शिरले. पिकांचेच नाही तर अनेक गावातील संसार उघड्यावर आले. घरं पडली. नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काय आहे राज्यातील परिस्थिती, जाणून घेऊयात

बीडमध्ये पावसाचा धुमाकूळ

बीडच्या माजलगाव तालुक्यातील गंगामसला व आडोळा शिवारात काल रात्री अतिवृष्टी सुदृश्य पाऊस झाल्याने सोयाबीन पीक पाण्याखाली गेले आहे. गंगामसला भागातील अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. माजलगाव तालुक्यातील गंगामसला, आडोळा शिवारात अतिवृष्टी सुदृश्य पाऊस झाल्याने सोयाबीन पीक पाण्याखाली गेले.

बीडच्या माजलगाव तालुक्यातील सादोळा येथून जाणारा खामगाव-पंढरपूर रस्ता पावसामुळे गावातील नदी परिसरात पाण्याखाली गेला आहे. मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने काही काळ वाहतूक बंद होती मात्र पाणी कमी झाल्यानंतर नागरिकांकडून वाहने काढून दिली जात आहेत. दरम्यान या परिसरातील शेतीला सर्वाधिक फटका बसला असून मोठ्या प्रमाणात शेती पाण्याखाली आहे.

तर परळीसह अनेक गावांना पाणी पुरवणारे नागापूर धरण ओवर फ्लो झाले. परळी तालुक्यातील नागापूर येथील नागापूर धरण ओवर फ्लो झाले आहे गेल्या दोन दिवसापासून परळी तालुक्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. परळी तालुक्यात अनेक नदिया नाले ओसंडून वाहत आहेत. नागापूर धरण ओवर फ्लो झाल्यामुळे परळी सह अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

धाराशिवमध्ये अतिवृष्टी

धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ अरुण गुट्टे यांनी अतिवृष्टी मध्ये नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. थोडीफार बचावलेल्या पिकांना वाचवण्यासाठी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ अरुण गुट्टे यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.तसेच महसूल आणि कृषी विभागाकडून पाहणी करून पंचनामेही केले जात आहेत.

जालन्यात पावसाचे धुमशान

जालना जिल्ह्यामध्ये मागील तीन ते चार दिवसापासून सर्वदूर मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठ्या नुकसान होताना पाहायला मिळत आहे जालन्यातील बदनापूर तालुक्यात देखील काल आणि परवा दोन दिवस मुसळधार पाऊस पडला आहे.बदनापूर तालुक्यातील पाडळी शिवारात पावसामुळे शेताला अक्षरशः तलावाच स्वरूप आल असून खरिपातील पिके पाण्याखाली गेली आहे.पाडळी शिवारातील सोयाबीन,मका, कपाशी ही पिके पूर्णता पाण्याखाली गेली असून शेताला तलावाच स्वरूप आलं आहे.

धुळ्यात पावसाचा कहर

धुळे शहरातील तेउराम हायस्कूलमध्ये पावसाचे पाणी साचले. दोन दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे अद्यापही शाळेच्या आवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. पाणी निचरा होत नसल्याने विद्यार्थ्यांसह पालकांचे हाल झाले. मोठ्या प्रमाणात शाळेच्या मैदानात पाणी साचल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.

तर जळगाव जिल्ह्यातील भुसावळच्या हतनूर धरणाचे 41 पैकी 20 दरवाजे उघडले आहेत. सध्या हतनूर धरणातून 63 हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रात होत आहे. विदर्भात सतत त्याने पावसाचा जोर कायम असल्याने हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढत आहे. त्यामुळे हे दरवाजे उघडले आहेत.

नाशिक जिल्ह्याला देखील आज हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे. रेड अलर्ट असले तरी नाशिक मध्ये अद्याप तरी पाऊस नाही. जलसंपदा विभागाचा नागरिकांसाठी अलर्ट जारी केला आहे. पावसाचे आगमन झाल्यास गंगापूर धरणातून केव्हाही पाणी सोडण्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. पाणी सोडावे लागल्यास गोदावरीची पातळी अचानक वाढू शकते. येणाऱ्या तीन दिवसात केव्हाही धरणातून पाणी सोडले जाऊ शकते. गोदाकाठावरील सर्व गावांना आणि व्यावसायिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आले आहे.

बुलडाण्यात पुरामुळे शेती खरडली

बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली तालुक्यात काल झालेल्या पावसाने जांबुवंती नदीला पहिल्यांदाच पूर आला होता. त्यामुळे नदी काठावरील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन तूर उडीद मूग यासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अद्याप पंचनामा झाले नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. तत्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

चंद्रपूराला पावसाचा फटका

चंद्रपूर जिल्ह्यात काल दुपारपासून पावसाची संततधार, चंद्रपूर शहरात पूर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका कायम आहे. एकीकडे वर्धा नदीला पूर आला असताना जोरदार पावसाने चंद्रपूरकरांच्या चिंता वाढविल्या आहेत. विशेष म्हणजे अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात गेले 3 दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे इसापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पैनगंगा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

या धरणाचे पाणी पैनगंगा नदीतून वर्धा नदीत आल्याने वर्धा, इरई आणि झरपट नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. मात्र या सर्व परिस्थितीत दिलासादायक बाब म्हणजे सध्या इरई धरणातून पाण्याचा विसर्ग बंद आहे. इरई धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्यास इरई नदीमुळे चंद्रपूर शहरात पूर परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

भामरागडचा संपर्क तुटला

गडचिरोली जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसाचा फटक्यामुळे भामरागड तालुक्याच्या संपर्क जिल्हा मुख्यालयाशी तुटला. भामरागडच्या मुख्य पुलावरून तीन ते चार फूट पुराचे पाणी वाहत आहेत. रात्री अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू होता. छत्तीसगड राज्यातही मुसळधार पावसाचा फटका इंद्रावती नदीला बसला आहे.

जिल्ह्यातील प्रमुख नदी इंद्रावती व व उपनदी परलाकोटा या दोन नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. भामरागड तालुक्यातील जवळपास 40 गावे जिल्हा मुख्यालयाशी संपर्क च्या बाहेर आहेत. या पावसाळ्यात पाचव्यादा भामराड तालुक्याच्या संपर्क जिल्हा मुख्यालयाशी तुटला आहे. भामरागड गावाला नदी लागू नसल्यामुळे बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले आहे.तहसीलदारांनी भामरागड मधील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

पुण्यात पावसाचा जोर कायम

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होत आहे. मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू होत आहे. नदीकाठ परिसरातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. कालपासून पुण्यात मुसळधार पाऊस सुरू होता. धरण साखळीच्या पाणीपातळीत वाढ झाली. पानशेत, वरसगाव, टेमघर धरणांतून विसर्ग सुरू आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सोमवारी दिवसभरात चांगला पाऊस झाला, त्यामुळे या चारही धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली.

सद्यस्थितीत पानशेत धरणातून १ हजार २४२ क्युसेकने, वरसगाव धरणातून १ हजार ८७६ क्युसेकने तर टेमघर धरणातून ३०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. दरम्यान खडकवासला धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्यास खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.

पुण्याच्या खेड तालुक्यातील चास कमान धरण १०० टक्के भरले आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणातून १५०० क्युसेक्स ने भीमा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. विसर्ग सुरू झाल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चास कमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात भिमाशंकर परिसरात सातत्याने पाऊस सुरू असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. पवना धरणातून विसर्ग वाढणार असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये 19 ऑगस्ट रोजी आज पवना धरण 99.14% भरलेले असून सध्या नदीपात्रात एकूण 2130 क्युसेक विसर्ग सुरू आहे. यामध्ये जलविद्युत केंद्राद्वारे 1400 क्युसेक व सांडव्याद्वारे 730 क्युसेक पाणी सोडले जात आहे. पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सतत पाऊस पडत असल्याने आज सकाळी 9 वाजता सांडव्याद्वारे होणारा विसर्ग वाढवून 1460 क्युसेक करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीपात्रातील एकूण विसर्ग 2860 क्युसेकपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

धरणातून होणारा विसर्ग पावसाच्या तीव्रतेनुसार टप्प्याटप्प्याने कमी-जास्त केला जाईल, असे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे. पवना नदीकाठच्या सर्व नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचे, तसेच प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

धरणातील एकुण पाणीसाठा साठा

खडकवासला 1.09 टीएमसी ५४.९४ टक्के

पानशेत १०.१० टीएमसी ९४.८५ टक्के

वरसगाव १२.०४ टीएमसी ९३.९४ टक्के

टेमघर 3.57 टीएमसी ९६.३९ टक्के

सांगलीत पावसाची जोरदार बॅटिंग

सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी कायम आहे.गेल्या 24 तासात 92 मिलीमीटर इतक्या पाऊसाची नोंद झाली आहे,त्यामुळे चांदोली धरण जवळपास 94 टक्के इतकं भरले आहे. यामुळे चांदोली धरणातून सुरू असलेल्या पाण्याचा विसर्ग आणखी वाढवण्यात आला असून 18 हजार 630 क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदी पात्रामध्ये सुरू करण्यात आलेला आहे.34.40 टीएमसी साठवण क्षमता असणाऱ्या धरणात 32 टीएमसी इतका पाणीसाठा निर्माण झाला आहे,त्यामुळे धरण जवळपास भरत आले आहे.तर सकाळपासून धरणातून वारणा नदी पात्रात सुरू असलेला विसर्ग वाढवुन 18 हजार क्यूसेक करण्यात आलाय,यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून वारणा नदीकाठच्या गावाने सतर्क राहावे,असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

कोयना धरण अपडेट काय

कोयना धरणातून 41हजार 500 क्युसेक पाणी विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू झाला आहे. कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 6 फुटापर्यंत उघडले आहे. कृष्णा कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे.

वसई-विरार,नालासोपाऱ्यात मुसळधार

वसई विरार नालासोपाऱ्यात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. रात्रीपासून पावसाचा कहर सुरु होता. त्यामुळे वसई विरार आणि नालासोपारा शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचलं काहींच्या घरात ही पाणी साचलं शहरातील मुख्य रस्त्यावर पाणी साचले आहे. कामावर जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांना पाण्यातून मार्ग काढताना तारांबळ उडत होती. अनेक वाहने ही बंद पडत होते. हवामान विभागाने आज पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. तर पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी पालघर जिल्ह्यासह वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व शाळा कॅालेजना सुट्टी जाहीर केली आहे.

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.