AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray-Uddhav Thackeray : मी राज ठाकरेंना परवा फोन केला… उद्धव ठाकरे यांचा मोठा गौप्यस्फोट काय?

Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance : मुंबईतील मनसे आणि उद्धवसेना कार्यकर्ते आज पावसाने नाही तर राज-उद्धव एकत्र येण्याच्या स्वप्नपूर्तीच्या आनंदात चिंब झाले. दोघांनी राज्य सरकारवर तोंडसुख घेतलं. भाषणात उद्धव ठाकरे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला.

Raj Thackeray-Uddhav Thackeray : मी राज ठाकरेंना परवा फोन केला... उद्धव ठाकरे यांचा मोठा गौप्यस्फोट काय?
राज ठाकरे, उद्धव ठाकरे Image Credit source: गुगल
| Updated on: Jul 05, 2025 | 1:55 PM
Share

मुंबईमधील वरळी डोम परिसराला आज जणू आनंदाचे भरते आले होते. गेल्या 18 वर्षानंतर मनसे आणि उद्धवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी एकत्र आले. सभागृह आणि बाहेरील परिसर मनसैनिक, शिवसैनिकांनी तुडुंब भरला होता. हा एका पक्षाचा सोहळा नव्हता. पण दोन्ही भावांनी एकाच पक्षात असावा, असा सूर आणि संकेत या विजयी मेळाव्यातून दिसले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर वाग्बाण सोडले. त्यांच्या शाब्दिक फटकेबाजीने परिसर दणाणला. सरकारला दोघांनी धारेवर धरलेच. पण मराठी, मराठी माणूस या अस्मितेसाठी एकत्र आलो आणि आणि आता एकत्र राहणार अशी ग्वाही दिली.

एकनाथ शिंदेवर हल्लाबोल

यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. एक गद्दार काल म्हणाला ‘जय गुजरात’. किती लाचारी करायची. पुष्पा पिक्चर पाहिला झुकेगा नाही साला. आता हे गद्दार म्हणतात उठेगा नही साला. उठायला आहे काय तुझ्याकडे. कसं उठणार तुझं. विचार म्हणतोय, अशी बोचरी टीका त्यांनी शिंदेवर केली.

मालकासमोर जय गुजरात म्हणणारा बाळासाहेबांचा पाईक असेल का, असा सवाल त्यांनी विचारला. म्हणून म्हणतो डोळे उघडा. आताच जागी व्हा. आता येणारी जाग जाणार असेल तर मग मात्र मराठी आईची मुले म्हणू नका. शिवसेना प्रमुखांनी शिकवलं की अन्याय करू नका. पण अंगावर हात उद्गारला तर तो जागेवर ठेवू नका, असा इशारा त्यांनी दिला.

आता एकजूट महत्त्वाची

फडणवीस भाषिक गुंडगिरी सहन करणार नाही म्हणता, एक मराठी माणूस दाखवा इतर राज्यात गुंडगिरी करणारा. मराठी माणसाने दादागिरी केली तर त्याला तिकडे उभं चिरून टाकली. मग आमच्या घरात न्याय हक्काची गोष्ट सुरू केली तर. बिघडलं कुठे. राजने सांगितलं तसे आमचे सर्वांचे इतर अमराठी मित्र आहेत. तुम्ही आमच्या विष टाकता. तुमचे डाव उघड झाले आहे. महाराष्ट्राला आवाहन करतो. कोणत्याही पक्षाचे असू आपण एकजूट केली पाहिजे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. भाजपच्या मराठी माणसानेही त्यात आलं पाहिजे. का नाही यायचं. ज्या राज्यात राहता, मातीत जन्माला आला त्याचे धिंडवडे काढणार असतील, त्यांना पायघड्या टाकणार असू तर असे षंडाचं जीवन जगण्यापेक्षा मेललं बरं, असे ते म्हणाले.

हे तर पिक्चरचं प्रिमीयर

मी राज ठाकरेंना परवा फोन केला. अरे आपल्या पिक्चरचं प्रिमीयर असल्यासारखं विचारताहेत आत कसं येऊ. हा प्रीमियर असेल पण आजपासून सुरुवात झाली आहे. आजपासून सुरुवात झाली आहे. एकत्र आम्ही दादागिरी करणार नाही. कुणी दादागिरी केली तर सहनही करणार नाही. शिवसेनाप्रमुखांनी सांगितलं तेच सांगतो. मराठा मराठेत्तर, ब्राह्मण ब्राह्मणेत्तर, स्पृश्य अस्पृश्य आणि घाटी कोकणी हे भेदाभेट मिटवून एक या. तुटू नका फुटू नका आणि मराठी ठसा पुसू नका, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.