AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : यंदा बाकीच्यांना हाणायचं म्हणजे हाणायचं, राज ठाकरेंकडून पुन्हा “मराठी कार्ड”

राज ठाकरेंनी मुंबई महापालिकेच्या (BMC) निवडणुकीवरून एक मोठं वक्तव्य केलं आहे. काही दिवसातच मुंबई महापालिकेच्या निवडणुका (Bmc Election) लागण्याची शक्यता आहे.

Video : यंदा बाकीच्यांना हाणायचं म्हणजे हाणायचं, राज ठाकरेंकडून पुन्हा मराठी कार्ड
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Mar 05, 2022 | 9:54 PM
Share

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुंबईतील कांदिवली भागात मनसेच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी राज ठाकरेंनी मुंबई महापालिकेच्या (BMC) निवडणुकीवरून एक मोठं वक्तव्य केलं आहे. काही दिवसातच मुंबई महापालिकेच्या निवडणुका (Bmc Election) लागण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर इतरही अनेक महापालिकांच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसातच निवडणुकांची घोषणाही होण्याची शक्यता इतर राजकीय पक्ष वर्तवत असताना राज ठाकरे यांनी इतक्यात निवडणुकांची शक्यता दिसत नाही असे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे. राज्यातल्या अनेक महापालिकांच्या मुदती संपत आल्याने महापालिकेवर प्रशासकही नेमण्यात आले आहेत. निवडणुकासाठी पूर्ण तयारी करण्यात आली आहे. नवी प्रभागरचनाही सर्व महानगरपालिकांची सादर झाली आहे. अशावेळी राज ठाकरेंचं हे वक्तव्य कोणते संकेत देत आहे, हे कळायला मार्ग नाही.

यंदा हाणायचं म्हणजे हाणायचं

यावेळी बोलताना निवडणुकांबाबत तर राज ठाकरेंनी भाष्य केलेच. मात्र कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना, यंदा निर्धार करायचा, यंदा निर्धार करा, इतर राजकीय पक्षांना हाणायंच म्हणजे हायणायचं असेही वक्तव्य राज ठाकरेंनी केल्यावर कार्यकर्त्यांनी टाळ्या आणि शिट्ट्यांचा पाऊस पडला. राज ठाकरे हे त्यांच्या भाषणाच्या खास शैलीसाठी ओळखले जातात. मतपेटीत मैदानासारखा प्रतिसाद मिळत नसला तर त्यांना ऐकण्यासाठी हजारोंची सख्या जमते. त्यामुळे राज ठाकरेंचे भाषण नेहमीच तडाखेबाज असते. आजही त्यांनी बोलताना मनसेच्या खळ्ळखट्याकची ओळख पुन्हा आठवण करून दिली आहे. त्यामुळे मनसे निवडणुकीत जोमाने उतरणार हे स्पष्ट झाले आहे.

मनसेचं पु्न्हा मराठी कार्ड

मनसेचं सर्व राजकारण मराठीच्या आग्रहाच्या अवतीभोवती फिरताना दिसतं. राज ठाकरेही अनेकदा मराठीवरून आक्रमक भूमिका घेतात. मुंबईवर मराठी माणसांचा पहिला हक्क आहे. असेही ते अनेकदा ठणकावून सांगतात. आज पुन्हा मुंबई ही मराठी माणसाचीची आहे. म्हणत राज ठाकरेंनी मराठी कार्ड काढलं आहे. मराठीच्या मुद्द्यावरून मनसेने राज्यभर अनेकदा खळ्ळखट्याकही केलं आहे. मराठी पाट्यांचा मुद्दा असो किंवा फोन लावल्यावर येणारा आवाज असो, सर्व मराठीत हवे यासाठी राज ठाकरेंनी अनेकदा आक्रमक झाले आहेत. मनसे सत्ता मिळवण्यासाठी धडपडत आहे. मनसे आणि भाजपच्या युतीच्या चर्चाही रंगत आहेत. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Video : साताऱ्यातला ‘तो’ पाऊस आणि ‘ती’ निवडणूक; शरद पवारांकडून श्रीनिवास पाटलांचं तोंडभरून कौतुक

Big Breaking : मोदींच्या पुणे दौऱ्याला मुख्यमंत्री जाणार नाहीत, कारण काय?

जशास तसं ! ईडीनं मविआ नेत्यांना तासनतास बसवलं आता मुंबई पोलीसांनी राणेंना, 5 तासापासून चौकशी

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.