श्वसनासंबंधी 20 आजारांसाठी मोफत उपचार, शुल्क आकारल्यास हॉस्पिटलला पाचपट दंड, राजेश टोपेंच्या सूचना

श्वसनासंबंधित 20 आजारांसाठी मोफत उपचार करण्याच्या सूचना रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

श्वसनासंबंधी 20 आजारांसाठी मोफत उपचार, शुल्क आकारल्यास हॉस्पिटलला पाचपट दंड, राजेश टोपेंच्या सूचना
Follow us
| Updated on: Aug 18, 2020 | 5:27 PM

मुंबई : महात्मा ज्योतिबा फुले जनारोग्य योजनेबाबत सरकारने विशेष आदेश जारी केले आहेत (Rajesh Tope On Mahatma Phule Jan Aarogya Scheme). श्वसनासंबंधित 20 आजारांसाठी मोफत उपचार करण्याच्या सूचना रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली (Rajesh Tope On Mahatma Phule Jan Aarogya Scheme).

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आणि कोरोनाच्या परिस्थितीबाबत आढावा घेण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीत सार्वजनिक गणपती, गणपती मुरवणुका याबाबतच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. तसेच, कोरोनाविरोधात लढा आणि अडचणी यावरही चर्चा झाल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

यादरम्यान, “महात्मा ज्योतिबा फुले जनारोग्य योजनेबाबत सरकारने विशेष आदेश जारी केले आहेत. श्वसनासंबंधित 20 आजारांसाठी मोफत उपचार करावे. महात्मा ज्योतिबा फुले जनारोग्य योजनेतील रुग्णालयात मोफत उपचार करावे. उपचारासाठी पैसे घेतले तर 5 पट दंड लावण्याचा, परवाना रद्द करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे”, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुखांशी चर्चा झाली.

सामाजिक उद्देश घेऊन गणेशोत्सव साजरा व्हावा – मुख्यमंत्री

सार्वजनिक गणपती कमीत कमी बसतील त्यावर लक्ष द्यावे, आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुकीवर मर्यादा हवी, सामाजिक उद्देश घेऊन गणेशोत्सव साजरा व्हावा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती, समाज प्रबोधन यावर भर द्यावा. राज्य सरकारने लोकहिताचे जे निर्णय घेतले आहेत त्याची माहिती गणेशोत्सव मंडळानी द्यावी, असं यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याची माहिती राजेश टोपेंनी दिली.

सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव मंडळांनी सॅनिटायझ करायला हवं. मोहरमही सर्व नियम पाळून केला पाहिजे.

कोरोना मृत्यूदर 1 टक्क्याच्या आत आणण्याच्या आमचा हेतू – राजेश टोपे

शेवटच्या क्षणी आलेल्या रुग्णांचं प्रमाण मृतांमध्ये जास्त आहे. ग्रामीण भागात रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जम्बो फॅसिलिटी खर्चिक आहे. आपल्याकडे आहे त्या ठिकाणी सुविधा वाढविण्यावर भर दिला जाणार, असंही राजेश टोपेंनी सांगितलं (Rajesh Tope On Mahatma Phule Jan Aarogya Scheme).

SDRF चा निधी आधी पूर्ण वापरा, जिल्हा नियोजन निधीतील 33 टक्के रक्कम वापरण्याची मुभा उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे निधी कमी पडणार नाही. डॉक्टरांची संख्या कमी आहे. स्पेशालिस्ट डॉक्टरांची कमतरता जाणवत आहे. टेली आयसीयूचा प्रयोग सहा जिल्ह्यात करतो आहे. भिवंडीत प्रत्यक्ष सुरु झाला आहे. कोव्हिडचे तज्ज्ञ डॉक्टर ऑनलाइन मार्गदर्शन यामुळे देऊ शकतात. रेमडेसेवीर इंजेक्शन्सचा परिणाम चांगला जाणवतो त्याची उपलब्धता वाढवण्याबाबत चर्चा झाली, असं राजेश टोपे म्हणाले.

वाढणार्‍या संख्या नियंत्रणात आणण्यासाठी संपर्क शोधणे महत्त्वाचे आहे. हे प्रमाण वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. टेस्टिंग वाढवण्याच्याही सूचना दिल्या आहेत. मृत्यूदर 1 टक्क्याच्या आत आणण्याच्या आमचा हेतू आहे. सगळ्यांनी मिशन मोडवर काम करण्याचे मार्गदर्शन मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांना केले आहे.

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत, एकास 20 हवे, काही ठिकाणी 8 आहे.

मृत्यूदर जास्त असलेले जिल्हे

  • मुंबई – 5.54
  • नंदुरबार – 4.48
  • सोलापुर – 4.35
  • अकोला – 4.24
  • लातूर – 3.83
  • जळगाव – 3.78
  • रत्नागिरी – 3.69
  • राज्याच्या मृत्यूदर – 3.35

Rajesh Tope On Mahatma Phule Jan Aarogya Scheme

संबंधित बातम्या :

‘कोरोनाविरोधात लढण्यासाठी, सर्वसामान्यांना मदत करण्यासाठी पुन्हा सज्ज’, किरीट सोमय्यांची कोरोनावर मात

N 95 असो किंवा कोणताही मास्क, ठरलेल्या किमतीतच विकावे लागतील, राजेश टोपेंनी ठणकावलं

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.