आरोग्य विभागातील पेपर फुटीप्रकरणी केवळ माफी मागून चालणार नाही, राजेश टोपेंनी राजीनामा द्यावा; भाजपची मागणी

आरोग्य विभागाच्या परीक्षेचे पेपर फुटल्याने त्यावर भाजपने तीव्र संताप व्यक्त केला आहे. आरोग्य विभागातील क आणि ड वर्गाच्या परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणात खात्याच्या काही अधिकाऱ्यांचाच हात असल्याचे उघड होत आहे.

आरोग्य विभागातील पेपर फुटीप्रकरणी केवळ माफी मागून चालणार नाही, राजेश टोपेंनी राजीनामा द्यावा; भाजपची मागणी
keshav upadhye
Follow us
| Updated on: Dec 10, 2021 | 3:39 PM

मुंबई: आरोग्य विभागाच्या परीक्षेचे पेपर फुटल्याने त्यावर भाजपने तीव्र संताप व्यक्त केला आहे. आरोग्य विभागातील क आणि ड वर्गाच्या परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणात खात्याच्या काही अधिकाऱ्यांचाच हात असल्याचे उघड होत आहे. त्याची जबाबदारी आता आरोग्य मंत्र्यांवर आली असून आता माफी मागून किंवा दिलगिरी व्यक्त करून भरून चालणार नाही. विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी राजेश टोपे यांनी आरोग्य मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.

केशव उपाध्ये यांनी मीडियाशी संवाद साधताना ही मागणी केली. तसेच आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या पेपर फुटीप्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला. आरोग्य खात्यातील 6 हजारांहून अधिक जागांची भरती रखडवून ठाकरे सरकारने उमेदवारांना नैराश्यात ढकलले होते. वारंवार मागणी करूनही परीक्षांबाबत चालढकल करण्यात येत होती. वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्या एजन्सीला परीक्षांचे कंत्राट देण्यासाठी त्यांच्या सोयीकरिता तब्बल 21 वेळा निविदेत बदल करण्यात आला. तेव्हाच ठाकरे सरकारचा हेतू स्पष्ट झाला होता, असं उपाध्ये म्हणाले.

ठाकरे सरकारने 10 लाख विद्यार्थ्यांची माफी मागावी

परीक्षांच्या काही तास अगोदर काही उमेदवारांना व्हॉटसअप, टेलिग्रामवर प्रश्नपत्रिका मिळाल्या, अखेरच्या क्षणी वेळापत्रक बदलून परिश्रमपूर्वक तयारी करणाऱ्या उमेदवारांची फसवणूक करण्यात आली, तरीही आरोग्यमंत्री राजेश टोपे मात्र, एजन्सीची पाठराखण करून परीक्षा वेळेवर व पारदर्शक होण्याच्या बढाया मारत होते. पेपरफुटी ही अफवा नसल्याचे सिद्ध होऊनही आरोग्यमंत्र्यांनी वारंवार त्यावर मौन धारण केले, आणि आता या परीक्षेतील गैरव्यवहारांचे बिंग फुटल्यावर मात्र ते मूग गिळून गप्प बसले आहेत. या गोंधळामुळे ज्यांचे भवितव्य संकटात सापडले आहे, त्याची जबाबदारी स्वीकारून आरोग्यमंत्र्यांनी पायउतार व्हावे व ठाकरे सरकारने दहा लाख विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.

सरकारला विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी घेणंदेणं नाही

आरोग्य खात्यात असलेल्या वाझे प्रवृत्तींचा पेपरफुटी प्रकरणात हात असल्याचे दिसू लागले आहे. पेपरफुटीस जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर मंत्र्यांची मेहेरनजर होती का असा सवालही त्यांनी केला. परीक्षेतील गोंधळाबाबत जेव्हा हे विद्यार्थी सरकारसमोर आक्रोश करत होते, तेव्हा सरकारी यंत्रणा आर्यन खानला वाचविण्यासाठी धावपळ करत होत्या, असा आरोपही त्यांनी केला. लाखो परीक्षार्थींचे आईवडील मुलांच्या भवितव्याची चिंता करत होते, तेव्हा सरकारमधील एका पक्षाच्या खासदार महिला आई म्हणून आर्यन खानच्या कोठडीबद्दल काळजी करत होत्या. सरकारला विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी देणेघेणे नाही हे तेव्हाच स्पष्ट झाले होते, असा हल्लाबोलही त्यांनी केला.

फसवणुकीची किंमत मोजलीच पाहिजे

यावेळी उपाध्ये यांनी कंत्राटावरूनही जोरदार हल्ला चढवला. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या कंपनीस परीक्षेचे कंत्राट देण्याचा आटापिटा पाहता, ‘निवडणूक काळात विद्यार्थ्यांची दिशाभूल आणि सत्तेवर येताच फसवणूक’ असे ठाकरे सरकारचे धोरण असल्याचे उघड झाले आहे. या गैरव्यवहारास जबाबदार असलेल्यांवर कारवाई करून विद्यार्थ्यांचे नुकसान भरून निघणार नाही, या फसवणुकीची किंमत सरकारने मोजलीच पाहिजे, असे त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

सोमवारपर्यंत कामावर या, नाही तर?, एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन करताना अनिल परब यांनी केलं मोठं विधान

VIDEO: म्हाडाच्या परीक्षेबाबतच्या अफवांना बळी पडू नका, नाही तर मीच परीक्षा रद्द करेन; जितेंद्र आव्हाडांनी जोडले हात

एशिया कपसाठी अंडर 19 च्या टीमची घोषणा, तांबे, हंगरगेकरला संधी, दिल्लीचा यश धुल संघाचा कर्णधार, वाचा संपूर्ण 20 क्रिकेटर्सची यादी

Non Stop LIVE Update
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.