AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एशिया कपसाठी अंडर 19 च्या टीमची घोषणा, तांबे, हंगरगेकरला संधी, दिल्लीचा यश धुल संघाचा कर्णधार, वाचा संपूर्ण 20 क्रिकेटर्सची यादी

एशिया कपचा कर्णधार म्हणून दिल्लीचा यश धुलच का? तर त्याचं उत्तर आहे त्याची अलिकडची कामगिरी. त्यानं विनोद मंकड ट्रॉफित यावर्षी सर्वाधिक रन्स ठोकल्यात. दिल्लीकडून त्यानं 75.50 च्या सरासरीनं 302 रन्स ओढल्यात

एशिया कपसाठी अंडर 19 च्या टीमची घोषणा, तांबे, हंगरगेकरला संधी, दिल्लीचा यश धुल संघाचा कर्णधार, वाचा संपूर्ण 20 क्रिकेटर्सची यादी
दिल्लीचा यश धूल हा अंडर 19 एशिया कपचा कर्णधार असेल
| Edited By: | Updated on: Dec 10, 2021 | 2:13 PM
Share

आयपीएलचा सिझन संपलेला आहे. विजय हजारे ट्रॉफित ऋतुराज गायकवाडची चर्चा आहे. पण क्रिकेटचा नवा सिजन आता सुरु झालाय. आणि बीसीसीआयनं अंडर 19 एशिया कपसाठी 20 सदस्यीय टीमची घोषणा केलीय. (India U19 squad for the Asia Cup and preparatory camp) यातले काही स्टँडबाय खेळाडू आहेत. विशेष म्हणजे ह्या संघाचं नेतृत्व दिल्लीचा धडाकेबाज क्रिकेटपटू यश धूलकडे असेल. 23 डिसेंबरपासून आशियाई कप यूएईत (Asia Cup UAE) खेळला जाणार आहे. त्यासाठी 20 क्रिकेटपटूंची निवड करण्यात आलीय. पण यूएईला जाण्यापूर्वी ह्या सगळ्यांना बंगळुरुत नॅशनल क्रिकेट अकादमीत (NCA Preparatory Camp) स्वत:ला सिद्धही करावं लागेल. म्हणजेच ह्या अकादमीत एशिया कप तयारीचा कँप लागणार आहे. त्यामुळेच त्यासाठी 25 क्रिकेटपटूंची निवड करण्यात आलीय. त्यातले पाच हे स्टँडबाय असतील.

बीसीसीआयनं (BCCI announces Asia Cup squad) एक पत्रक प्रसिद्ध केलंय. त्यात म्हटलंय- ऑल इंडिया ज्यूनिअर सलेक्शन कमिटीनं येणाऱ्या एसीसी अंडर-19 एशिया कपसाठी 20 सदस्यांच्या टीमची घोषणा केलीय. एशिया कप हा यूएईमध्ये 23 डिसेंबरला खेळवला जाईल. त्याआधी बंगळुरुत 11 ते 19 डिसेंबर दरम्यान 25 जणांचा एक प्रिपेटरी म्हणजेच तयारीचा कँप लागेल. ह्या कँपमध्ये 25 खेळाडू भाग घेतील.

यश धुलच का? एशिया कपचा कर्णधार म्हणून दिल्लीचा यश धुलच का? तर त्याचं उत्तर आहे त्याची अलिकडची कामगिरी. त्यानं विनोद मंकड ट्रॉफित यावर्षी सर्वाधिक रन्स ठोकल्यात. दिल्लीकडून त्यानं 75.50 च्या सरासरीनं 302 रन्स ओढल्यात. त्यामुळेच यश धुल (Yash Dhull) हीच योग्य निवड असल्याची चर्चा आहे. एशिया कपसाठी अंडर 19 ची घोषणा केली असली तरीसुद्धा वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या अंडर-19 वर्ल्डकपसाठीच्या संघाची घोषणा मात्र नंतर होणार असल्याची बीसीसीआयनं स्पष्ट केलंय. पुढच्या वर्षी जानेवारी फेब्रुवारीत हा वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. आतापर्यंत आठ एशिया कप टुर्नामेंट खेळवले गेलेत. त्यापैकी भारतानं 6 वेळा विजय मिळवलाय. तर 2012 साली भारतानं पाकिस्तानसोबत ट्रॉफी शेअर केली होती.

अंडर-19 एशिया कप टीम- हरनूर सिंह पन्नू, अंगकृश रघुवंशी, अंश गोसाई, एसके रशिद, यश धूल (कप्तान), अन्नेश्वर गौतम, सिद्धार्थ यादव, कौशल तांबे, निशांत सिंधू, दिनेश बना, आराध्य यादव, रजनंड बावा, राज्यवर्धन हंगरगेकर, गर्व सांगवान, रवीकुमार, ऋषीथ रेड्डी, मानव परख, अमृत राज उपाध्याय, विकी ओस्तवाल, वसु वत्स

स्टँडबाय खेळाडू- आयुषसिंह ठाकूर, उदय सहारन, शाश्वत दंगवाल, धनूष गौडा, पीएम सिंह

हे सुद्धा वाचा:

Ruturaj Gaikwad: 5 षटकार, 14 चौकार, मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडचा पुन्हा क्रिकेटमध्ये डंका, टीम इंडियाचं तिकीट मिळणार?

शाळा सुरु करण्याबाबत राज्यस्तरीय निर्णय घेऊ, अजित पवारांची माहिती

सोयाबीनच्या दराने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर, आता साठवणूक ठरणार का फायद्याची?

निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.