AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ईडी कारवाईमुळे शिंदे गटात प्रवेश केला का? रवींद्र वायकर म्हणाले…

रवींद्र वायकर यांच्याविरोधात गेल्या काही दिवसांपासून कथित जोगेश्वर भूखंड घोटाळा प्रकरणी तपास यंत्रणांचा तपास सुरु होता. वायकर यांची याप्रकरणी अनेकदा चौकशीसुद्धा झाली. त्यामुळे ईडीच्या कारवाईमुळे आपण शिंदे गटात प्रवेश करत आहात का? असा प्रश्न रवींद्र वायकर यांना पक्षप्रवेशावेळी विचारण्यात आला.

ईडी कारवाईमुळे शिंदे गटात प्रवेश केला का? रवींद्र वायकर म्हणाले...
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Mar 10, 2024 | 10:30 PM
Share

मुंबई | 10 मार्च 2024 : ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांनी आज अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी रवींद्र वायकर यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. आपल्या मतदारसंघातील कामांसाठी आपण सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं रवींद्र वायकर यांनी यावेळी स्पष्ट केलं. यावेळी पत्रकारांनी त्यांना महत्त्वाचा प्रश्न केला. रवींद्र वायकर यांच्याविरोधात गेल्या काही दिवसांपासून कथित जोगेश्वर भूखंड घोटाळा प्रकरणी तपास यंत्रणांचा तपास सुरु होता. वायकर यांची याप्रकरणी अनेकदा चौकशीसुद्धा झाली. त्यामुळे ईडीच्या कारवाईमुळे आपण शिंदे गटात प्रवेश करत आहात का? असा प्रश्न रवींद्र वायकर यांना विचारण्यात आला. कारण विरोधकांकडून तसे आरोप करण्यात येत आहेत. यावर वायकरांनी प्रतिक्रिया दिली.

“प्रामुख्याने ज्या काही यंत्रणा असतील, मी त्यांच्याकडे गेलो आहे. त्यांच्यासमोर सामोरं गेलो आहे. त्या यंत्रणाला जे काही सहकार्य हवं ते दिलेलं आहे. त्यामुळे कोर्टामध्ये जे काही झालं आहे आणि कशापद्धतीने होतंय ते तुम्हाला कळून आलेलं आहे. जे काही अशा पद्धतीच्या यंत्रणा असतील त्यांना सहकार्य देणं आणि त्यातून आपल्याला जे योग्य आहे, दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊण जातं”, अशी प्रतिक्रिया रवींद्र वायकर यांनी दिली.

सरकार विरोधकांना फंड देत नाही? वायकर म्हणाले…

सरकार विरोधकांना फंड देत नाही का? असा प्रश्न यावेळी वायकरांना विचारण्यात आला. त्यावर “आम्ही कोर्टातही गेलो होतो. फंड हा मिळाला पाहिजे आणि सत्तेत असल्यावर तो जास्तच मिळतो, असं वायकर म्हणाले. सत्तेशिवाय पर्याय नसतो. याबाबत मी सभागृहातही मांडलं आहे”, असं वायकर म्हणाले. त्यावर “सत्तेत म्हणून ते आले”, असं मुख्यंत्री म्हणाले. “अडीच वर्ष सत्ता होती तेव्हा कामे झाली असती तर ते आले असते का? मलाही त्या सरकारचा अनुभव आहे. रवींद्र वायकर यांना एकनाथ शिंदे यांच्यामुळे हे झालं, रवींद्र वायकर यांना एकनाथ शिंदे यांच्यामळे हे झालं ते सांगितलं जात होतं. पण आता आम्ही एकत्र आलो तेव्हा आमच्यातला संभ्रम दूर झाला आहे”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

Follow Us
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची निलेशचंद्र मुनींशी भेट
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक...
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक... व्हिडीओ व्हयरल
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी...अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत...
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी... अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत गोगावलेंचा थेट पटवार
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, थेट...
हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर,
मोठी बातमी! हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर, पक्ष सोडण्याआधीच म्हणाले...
डीजेच्या तालावर अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन...
डीजेच्या तालावर आमदार अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी