AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत मे महिन्यात 11 हजार कोटींची मालमत्ता विक्री; मुद्रांक शुल्क रद्द करण्याची उद्योजकांची मागणी

कोविड-19 च्या दुसर्‍या लाटेचे परिणाम आणि एप्रिल 2021 पासून महाराष्ट्र सरकारच्या मालमत्ता नोंदणीवरील मुद्रांक शुल्क माफी बंद करण्याच्या निर्णयामुळे एप्रिल आणि मे 2021 मध्ये मालमत्ता विक्रीत घट दिसून आली आहे. | Real estate sector

मुंबईत मे महिन्यात 11 हजार कोटींची मालमत्ता विक्री; मुद्रांक शुल्क रद्द करण्याची उद्योजकांची मागणी
| Edited By: | Updated on: Jun 02, 2021 | 11:29 AM
Share

मुंबई: लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असताना आणि अर्थव्यवस्था आक्रसलेली असताना मुंबईत मात्र नव्या मालमत्तांची खरेदी जोरात सुरु असल्याचे दिसत आहे. कारण, मे महिन्यात मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रात (MMRA) तब्बल 11 हजार कोटींची मालमत्ता विक्री व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. (Real estate sector in Mumbai)

30 मे 2021 रोजी सीआरई मॅट्रिक्स प्रॉपर्टी ट्रॅकर आणि आयजीआर महाराष्ट्र कडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) मे 2021 मध्ये मालमत्ता विक्री व्यवहारांची नोंद रु. 10979 कोटी इतकी तर एप्रिल 2021 मध्ये रु. 22,507 कोटी इतकी झाली. मार्च 2021, फेब्रुवारी 2021 आणि जानेवारी 2021 मध्ये एमएमआर मध्ये नोंदणीकृत मालमत्ता विक्रीचे व्यवहार अनुक्रमे रू. 44167 कोटी, रु. 21696 कोटी आणि रु. 21484 कोटी इतके झाले.

30 मे 2021 पर्यंत मुंबईत मालमत्ता विक्री व्यवहारांची नोंद मे 2021 मध्ये रु. 7246 कोटी तर एप्रिल 2021 मध्ये रु. 16250 कोटी इतकी झाली. मार्च 2021, फेब्रुवारी 2021 आणि जानेवारी 2021 मध्ये मुंबईत मालमत्ता विक्रीचे व्यवहार अनुक्रमे रु. 28961 कोटी, रु. 12989 कोटी आणि रु. 12890 कोटी इतके झाले.

‘मुद्रांक शुल्क माफ करा’

कोविड-19 च्या दुसर्‍या लाटेचे परिणाम आणि एप्रिल 2021 पासून महाराष्ट्र सरकारच्या मालमत्ता नोंदणीवरील मुद्रांक शुल्क माफी बंद करण्याच्या निर्णयामुळे एप्रिल आणि मे 2021 मध्ये मालमत्ता विक्रीत घट दिसून आली आहे.

कोविडची दुसरी लाट ही लाटेपेक्षा अधिक प्राणघातक असल्याने घर खरेदीदार घरगुती मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा आपत्कालीन परिस्थितीत पैसे वाचवण्यासाठी अधिक सावध झाले. राज्यातील कोविड केसेस मध्ये झालेली अचानक वाढ आणि लॉकडाऊनमध्ये लागलेल्या विविध निर्बंधांमुळे या क्षेत्राला हळूहळू मंदीचा सामना करावा लागला ज्यामुळे गती टिकविणे अत्यंत कठीण झाले. मागील तिमाहीत विक्रमी व्यवहार पाहता घर खरेदीदारांनी मार्चच्या अंतिम मुदतीपूर्वी मुद्रांक शुल्काचा लाभ घेतला होता, म्हणूनच घर खरेदीदारांच्या हितासाठी मुद्रांक शुल्क माफीबाबतच्या निर्णयावर पुन्हा विचार करण्याची आम्ही सरकारला विनंती करत असल्याचे बांधकाम उद्योजक प्रीतम चिवूकुला यांनी सांगितले.

‘लॉकडाऊन हटवल्यानंतर परिस्थिती सुधारेल’

एप्रिल 2021 पासून महाराष्ट्र सरकारने मुंबईत 5% टक्के आणि उर्वरित महाराष्ट्रात 6% टक्के मुद्रांक शुल्क परत केल्यापासून मालमत्ता विक्रीत 50% घट झाली आहे. एप्रिल आणि मे महिन्यात नोंदणीकृत विक्री ही मागील तिमाहीत नोंदणीच्या ओव्हरफ्लोमुळे आहे जेथे बर्‍याच घर खरेदीदारांनी मार्चच्या अंतिम मुदतीपूर्वी मुद्रांक शुल्काचा लाभ घेतला आणि त्यांची मालमत्ता नंतर नोंदविली. महाराष्ट्र सरकारने मुद्रांक शुल्क भरण्यास परवानगी दिली होती व नंतर मालमत्ता नोंदणी करण्यास चार महिन्यांची मुदत दिली. कोविड साथीची दुसरी लाट, लॉकडाऊनचे निर्बंध आणि आर्थिक कार्य ठप्प पडल्यामुळे खरेदीदारांच्या भावना गेल्या दोन महिन्यांपासून खाली आल्या आहेत.

आम्ही आधीपासूनच स्टॅम्प ड्यूटी बूस्टरचा सकारात्मक परिणाम पाहिला आहे ज्याने शहरातील घरांच्या मागणीस मागील तिमाहीत लक्षणीय उत्तेजन दिले. आम्ही मार्च 2022 पर्यंत त्यावर फेरविचार व आणखी एका वर्षासाठी ते कमी करण्यास विनंती करत आहोत. घर खरेदीदारांमध्ये अजूनही मागणी आहे आणि राज्यात अनलॉक झाल्यावर ही संख्या हळूहळू वाढेल असा आमचा विश्वास असल्याचे नरेडकोचे अध्यक्ष अशोक मोहनानी यांनी सांगितले.

(Real estate sector in Mumbai)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.