अखेर मुंबईतही देवदर्शन होणार, 7 ऑक्टोबरपासून धार्मिकस्थळे उघडणार, किती लोकांना प्रवेश मिळणार?; वाचा नवी नियमावली काय?

तब्बल दीड वर्षानंतर अखेर मुंबईकरांना मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेता येणार आहे. मुंबई महापालिकेने धार्मिकस्थळे सुरू करण्यास परवानगी दिली आहे. (religious places reopen in mumbai from October 7, bmc issues guidelines)

अखेर मुंबईतही देवदर्शन होणार, 7 ऑक्टोबरपासून धार्मिकस्थळे उघडणार, किती लोकांना प्रवेश मिळणार?; वाचा नवी नियमावली काय?
religious places

मुंबई: तब्बल दीड वर्षानंतर अखेर मुंबईकरांना मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेता येणार आहे. मुंबई महापालिकेने धार्मिकस्थळे सुरू करण्यास परवानगी दिली आहे. येत्या 7 ऑक्टोबरपासून मुंबईत धार्मिकस्थळे सुरू होणार असून महापालिकेने तसं परिपत्रकच आज जारी केलं आहे.

महापालिकेने आज परिपत्रक काढून मुंबईकरांना मोठी बातमी दिली आहे. महापालिकेने येत्या 7 ऑक्टोबरपासून धार्मिकस्थळे सुरू करण्यास संमती देत असल्याचं जाहीर केलं आहे. तसेच काही नियम आणि अटीही टाकल्या आहेत.

प्रवेश कुणाला?

येत्या 7 ऑक्टोबरपासून मुंबईतील धार्मिकस्थळे सुरू करण्यात येतील. मात्र, धार्मिक स्थळांमध्ये उपस्थितांची संख्या त्या धार्मिक स्थळांच्या एकूण क्षमतेच्या 50 टक्क्यांपर्यंत मर्यादित राहणार असल्याचं पालिकेने जाहीर केलं आहे.

नियम काय?

महापालिका आणि राज्यशासनाने दिलेल्या नियमांचं पालन भाविकांना करावं लागणार असल्याचं महापालिकेने म्हटलं आहे. कोविड प्रतिबंधात्मक उपाय योजनांचे पालन करणे धार्मिकस्थळांना बंधनकारक असणार आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर आणि सॅनिटायझेशन आदी गोष्टीही बंधनकारक राहणार असल्याचं महापालिकेने म्हटलं आहे.

कारवाई करणार

महापालिकेच्या नियमांची अंमलबजावणी करण्यास कुणीही टाळाटाळ केल्यास अथवा त्याला विरोध केल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता 1860मधील कलम 188 आणि इतर कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचं महापालिका आयुक्त आयएस चहल यांनी म्हटलं आहे.

नवरात्रोत्सवाची नियमावली पुढीलप्रमाणे

💠 कोरोना साथीच्या रोगामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता घरगुती तसेच सार्वजनिकरीत्या स्थापन करण्यात येणाऱ्या देवमूर्तींची सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी.
💠 देवींची मूर्ती सार्वजनिक मंडळांकरिता 4 फूट आणि घरगुती मूर्तींकरिता 2 फुटांपेक्षा जास्त उंचीची नसावी.
💠 पारंपरिक देवीमूर्तीऐवजी शाडूची मूर्ती असल्यास विसर्जन घराच्या घरीच करावे, जेणेकरून आगमन/विसर्जनाची गर्दी टाळता येऊ शकते.
💠 देवीच्या आगमनासाठी 5 व्यक्तींचा समूह असावा. जे कोविड नियमांचे काटेकोर पालन करतील. तसेच शक्यतो त्या व्यक्तींनी कोरोना लसीचे दोन डोस घेतलेले असावेत आणि दुसरा डोस घेऊन 15 दिवस झालेले असावेत.
💠 सार्वजनिक देवीमूर्तींच्या आगमनाच्यावेळी आणि विसर्जनाच्या वेळी 10 पेक्षा जास्त लोक नकोत.
💠 नवरात्रोत्सवादरम्यान गरब्याचे आयोजन नको, तसेच अन्य धार्मिक कार्यक्रमातही गरदी होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे.
💠 शक्यतो देवीमूर्तींच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन किंवा फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करून दिलेली असावी.
💠तसेच देवी मंडपांमध्ये थर्मल स्क्रीनिंगची पर्यायी व्यवस्था करण्यात यावी. स्वच्छतेचे नियम पाळणे बंधनकारक राहील.
💠मंडपाच्या मुख्य भागांचे दिवसातून तीन वेळा निर्जंतुकीकरण केलेले असावी.
💠नवरात्रोत्सव 2021 साजरा करताना आरोग्य विषयक आणि सामाजिक संदे असलेल्या जाहिरातींना पसंती देण्यात यावी
💠शक्यतो व्यावसायिक जाहिराती करू नयेत.
💠कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रसाद वाटणे, फुले, हार अर्पण करणे टाळणे आवश्यक आहे.
💠कोरोना विषाणूची गंभीर आपत्ती लक्षात घेता गर्दी टाळावी, गरब्याचे आयोजन करू नये.
💠मंडळातर्फे रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी आयोजित करावेत.
💠मंडपात एका वेळी पाच पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी उपस्थित राहू नये. तसेच मंडपात मास्क घालणे बंधनकारक असेल. सामाजिक अंतर राखून नियमांचं काटेकोट पालन करावे लागेल.
💠देवीच्या आरतीच्या वेळी मंडपात दहापेक्षा जास्त कार्यकर्ते उपस्थित नसावेत. मास्क आणि कोविड नियमाचे काटेकोर पालन केलेले असावे.
💠देवीच्या विसर्जनाच्या मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाचा कार्यक्रम कमीत कमी लोकांमध्ये पार पाडणे आवश्यक आहे. लहान मुले आणि वरिष्ठांनी सुरक्षेच्या कारणास्तव विसर्जनस्थळी जाणे टाळावे.
💠सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनी मंडपापासून विसर्जन स्थळापर्यंत मूर्ती असलेले वाहन धिम्या गतीनं नेऊ नये. तसेच विसर्जनादरम्यान वाहन थांबवून रस्त्यांवर भाविकांना देवीमूर्तीचे दर्शन घेऊ देण्यास सक्त मनाई आहे.
💠नैसर्गिक विसर्जनस्थळी देवीमूर्तींचे विसर्जन करताना नागरिकांना थेट विसर्जन करता येणार नाही. नागरिकांना मूर्ती जमा कराव्या लागतील. त्यानंतर पालिकेमार्फत त्यांचं विसर्जन होईल.
💠नैसर्गिक विसर्जन स्थळी प्रकाश योजना, जनरेटरची व्यवस्था केलेली असावी.
💠शासनाने दिलेल्या कोविड नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.
💠ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे.

संबंधित बातम्या:

पीएमआरडीएच्या प्रस्तावित आराखड्यात 1 हजार कोटींचा घोटाळा; आशिष शेलारांचा नवा बॉम्ब

पंकजा मुंडेंना फोन करण्याचा प्रयत्न करत असाल तर ही बातमी आधी वाचा, ‘अनवेल’चं ट्विट

नांगरे पाटील म्हणजे मविआचे माफिया, सोमय्यांच्या नव्या आरोपानं खळबळ, नेमकं काय म्हणाले?

(religious places reopen in mumbai from October 7, bmc issues guidelines)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI