पदोन्नतीमध्ये पुन्हा आरक्षण लागू केल्यास रस्त्यावर उतरु; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

राज्य सरकारने 7 मे रोजी पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याची अधिसूचना काढली होती. | reservation in promotion Maratha kranti morcha

पदोन्नतीमध्ये पुन्हा आरक्षण लागू केल्यास रस्त्यावर उतरु; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा
मराठा क्रांती मोर्चा
Follow us
| Updated on: May 31, 2021 | 11:08 AM

मुंबई: राज्य सरकारने पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय मागे घेतला तर आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajipt Pawar) यांनी पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याचा (Reservation in Promotion) आदेश काढला होता. तो आता कुठल्याही प्रकारे बदलू नये. तसे घडल्यास आम्ही आंदोलन करु, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे नेते विरेंद्र पवार यांनी दिला. (Maratha Kranti Morcha demands to cancel reservation in promotion)

राज्य सरकारने 7 मे रोजी पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याची अधिसूचना काढली होती. मात्र, हा निर्णय घेताना मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमधील आरक्षणासाठी राज्य मंत्रिमंडळाची जी उपसमिती तयार करण्यात आली त्या समिती विश्वासात घेण्यात आले नव्हते. त्यामुळे अनेकांनी रोष व्यक्त केला होता.

‘महाविकासआघाडीतील एका आडमुठ्या नेत्यामुळे पदोन्नतीमधील आरक्षण रद्द झाले’

महाविकासआघाडीतील एका आडमुठ्या नेत्याच्या भूमिकेमुळे पदोन्नतीमधील आरक्षण रद्द झाले, अशा शब्दांत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केले होते. पदोन्नती रोखण्याच्या निर्णयाचा फटका केवळ मागासवर्गीयच नव्हे तर धनगर आणि ओबीसी समाजालाही बसेल. मागासवर्गीयांची पदोन्नती रोखण्याचा निर्णय कुठलीही कॅबिनेट बैठक न करता घेण्यात आला. हे साफ चुकीचं आहे. महाविकासआघाडीतील एका नेत्याच्या आडमुठ्या भूमिकेमुळे हा जीआर काढण्यात आला. याप्रकरणी अजित पवार यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे प्रकाश शेंडगे यांनी म्हटले होते.

संबंधित बातम्या:

पदोन्नतीतील आरक्षणासाठी नितीन राऊत आक्रमक, सरकारला धोका आहे का? राऊत म्हणतात….

‘पदोन्नतीमधील 33 टक्के आरक्षण रद्द करण्याचा निर्णय मागे घ्या’, माजी सामाजिक न्यायमंत्र्यांचा सरकारला इशारा

अजित पवारांना प्रमुख करणे म्हणजे मेंढरांनी लांडग्याकडून संरक्षणाची अपेक्षा करण्यासारखं : गोपीचंद पडळकर

(Maratha Kranti Morcha demands to cancel reservation in promotion)

Non Stop LIVE Update
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.