सचिन वाझेंनीच स्वत:च्या सोसायटीमधील CCTV फुटेज गायब केले; NIAचा संशय

सचिन वाझे यांच्या गुप्तवार्ता शाखेने (CIU) साकेत सोसायटीमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कमेऱ्याचे फुटेज सोसायटीकडून मागितले होते |sachin vaze saket society

सचिन वाझेंनीच स्वत:च्या सोसायटीमधील CCTV फुटेज गायब केले; NIAचा संशय
सचिन वाझे यांच्या गुप्तवार्ता शाखेने (CIU) साकेत सोसायटीमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कमेऱ्याचे फुटेज सोसायटीकडून मागितले होते
Follow us
| Updated on: Mar 16, 2021 | 1:16 PM

मुंबई: राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) सुरु असणाऱ्या अंबानी स्फोटक प्रकरणात आता एक नवीन माहिती पुढे आली आहे. याप्रकरणातील मुख्य संशयित असलेले API सचिन वाझे (Sachin Vaze) यांनी ते राहत असलेल्या साकेत सोसायटीमधील CCTV फुटेज गायब केल्याचा NIAला संशय आहे. यासंदर्भातील काही पत्रं ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागली आहेत. (CCTV footage of sachin vaze saket society)

ही सर्व पत्रे साकेत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना लिहली आहेत. यामध्ये त्यांनी आपल्या सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज असलेला डीव्हीआर मुंबई पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आल्याचा उल्लेख आहे. सोसायटीने मुंबई पोलिसांना एकूण दोन पत्रं लिहली आहेत. सचिन वाझे यांनी त्यांचे सहकारी रियाझ काझी यांच्यामार्फत साकेत सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतल्याचे समजते.

पहिल्या पत्रात काय म्हटले आहे?

सचिन वाझे यांच्या गुप्तवार्ता शाखेने (CIU) साकेत सोसायटीमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कमेऱ्याचे फुटेज सोसायटीकडून मागितले होते, त्यासंदर्भात त्यांनी सोसायटीला पत्र लिहिले होते. मात्र पत्रावर कुठेही पोलिसाचा सही शिक्का नसल्याने सोसायटीने त्या टीममधल्या सर्वांची नावे, नंबर आणि सही त्या पत्रावर घेतली.

दुसऱ्या पत्रात काय म्हटले आहे?

साकेत सोसायटीला काहीसा संशय आल्याने 4 मार्चला याच सोसायटीने स्थानिक पोलीस स्टेशन असलेल्या राबोडी पोलीस स्टेशनला एक पत्र लिहिले आहे. यामध्ये आमच्या सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज CIU युनिटचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी घेतले असल्याने, तुम्हाला माहिती व्हावी म्हणून पत्र देतोय असे म्हटले आहे.

तिसऱ्या पत्रात काय म्हटले आहे?

हे पत्र ठाणे एटीएसने लिहिले आहे. ज्यात साकेत सोसायटीचे सीसीटीव्ही आम्हाला हवे असून, 17 फेब्रुवारी रात्री 12 पासून, 25 फेब्रुवारी रात्री 11 पर्यंत आम्हाला फुटेज हवे असल्याचे सांगितले होते. मात्र एटीएसला ते मिळाले नाहीत, कारण सीसीटीव्ही फुटेजचा डीव्हीआर CIU युनिटने आधीच नेला होता.

संबंधित बातम्या:

मोठा खुलासा! स्कॉर्पिओ चोरी झालीच नव्हती, वाझेंकडेच होती; सीसीटीव्ही फुटेजमधून ‘कार’नामे उघड?

स्कॉर्पिओ, इनोव्हाच्या दोन्ही ड्रायव्हरचा शोध लागला, दोघांचंही वाझेंशी कनेक्शन?

(CCTV footage of sachin vaze saket society)

Non Stop LIVE Update
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.
कुटुंबियांची साथ नाही? दादांचं विरोधकांना उत्तर; म्हणाले, मेरी माँ...
कुटुंबियांची साथ नाही? दादांचं विरोधकांना उत्तर; म्हणाले, मेरी माँ....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क, कुठं केलं मतदान?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क, कुठं केलं मतदान?.
महाराष्ट्रात 3 ऱ्या टप्प्यातील मतदान, राज्यात या 11 हायव्होल्टेज जागा
महाराष्ट्रात 3 ऱ्या टप्प्यातील मतदान, राज्यात या 11 हायव्होल्टेज जागा.
भावूक, भावकीनंतर मडकं अन् मिमिक्रीमुळे बारामतीच्या प्रचार सभा चर्चेत
भावूक, भावकीनंतर मडकं अन् मिमिक्रीमुळे बारामतीच्या प्रचार सभा चर्चेत.