मोठा खुलासा! स्कॉर्पिओ चोरी झालीच नव्हती, वाझेंकडेच होती; सीसीटीव्ही फुटेजमधून ‘कार’नामे उघड?

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेली जिलेटीनने भरलेली स्कॉर्पिओ चोरी झालीच नसल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. (scorpio was in custody of sachin waze, he also destroy cctv footage)

मोठा खुलासा! स्कॉर्पिओ चोरी झालीच नव्हती, वाझेंकडेच होती; सीसीटीव्ही फुटेजमधून 'कार'नामे उघड?
sachin waze
Follow us
| Updated on: Mar 16, 2021 | 11:02 AM

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेली जिलेटीनने भरलेली स्कॉर्पिओ चोरी झालीच नसल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. ही स्कॉर्पिओ चोरी झालीच नव्हती. ही स्कॉर्पिओ सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंकडेच होती आणि त्यांनीच ती चोरीला गेल्याची खोटी तक्रार करायला सांगितल्याचं एनआयएच्या तपासात उघड झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. मात्र, वाझेंनी हे सर्व का?, कशासाठी? आणि कुणाच्या इशाऱ्यावर केलं? याचा अद्यापही मागमूस लागला नसल्याने त्याबाबतचं गूढ अधिकच वाढलं आहे. (scorpio was in custody of sachin waze, he also destroy cctv footage)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबानींच्या घराबाहेर सापडलेली स्कॉर्पिओ कार कधीच चोरी झाली नव्हती. कुणाच्या तरी दबावाखाली ही कार चोरी झाल्याची तक्रार विक्रोळी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती, असा एनआयएला संशय आहे. वाझेंनी त्यांच्या घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज बेकायदेशीररित्या काढून घेतल्याचंही तपासातून उघड झालं आहे. पोलिसांच्या ऑफिशियल वापरासाठी हे डीव्हीआर पाहिजेत, असं सांगून वाझेंनी सोसायटीकडून सीसीटीव्ही फुटेज घेतले होते. त्यानंतर हे फुटेज डॅमेज करण्यात आले होते. चौकशीच्यावेळी कोणताही पुरावा मिळू नये म्हणून त्यांनी हे केलं होतं. सीसीटीव्ही फुटेज मिळावं म्हणून वाझेंनी त्यांच्या एका मित्राच्या नावाने सोसायटीला पत्रंही दिलं होतं. हे पत्रं एनआयएच्या हाती लागलं आहे. अंबानी प्रकरणाच्या चौकशीसाठी हे फुटेज हवं असल्याचं या पत्रात म्हटलं असून त्यावर वाझेंचे हस्ताक्षरही आहेत, असं सूत्रांनी सांगितंल.

वकिलाचे आरोप

वाझे सध्या 25 मार्चपर्यंत एनआयएच्या कोठडीत आहे. वाझेंना 12 तास बेकायदेशीरपणे कोठडीत ठेवल्याचा आरोप वाझेंच्या वकिलांनी केला आहे. वाझेंना रविवारी अटक केली आणि सोमवारी कोर्टात सादर करण्यात आलं. कुटुंबातील सदस्य आणि वकिलांनाही वाझेंना भेटू दिलं नाही. वाझेंना फोन करण्याची परवानगीही देण्यात येत नाही. वाझेंच्या कुटुंबांना वाझेंच्या अटकेची अधिकृतपणे माहितीही देण्यात आली नव्हती, असा आरोपही करण्यात आला आहे. दरम्यान, वाझे यांनी जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

सीसीटीव्ही फुटेज नष्ट केले

एनआयएच्या तपासात वाझेंनी सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज नष्ट केल्याचं उघड झालं आहे. केवळ सीसीटीव्ही फुटेजच नव्हे तर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डिजीटल व्हिडीओ रेकॉर्डर नष्ट करण्याचा प्रयत्नही वाझेंनी केल्याचं उघड झालं आहे. हे सर्व डीव्हीआर वाझेंकडे होते आणि त्यातील अनेक डीव्हीर डॅमेज झालेले आहेत. तसेच वाझे बनावट नंबर प्लेट बनविणाऱ्या दुकानात गेले होते. त्यांनीच स्कॉर्पिओ आणि इनोव्हा कारचे बोगस नंबर प्लेट तयार केले. स्कॉर्पिओला एका स्कूटरची नंबर प्लेट लावण्यात आली होती, असंही सूत्रांनी सांगितलं. (scorpio was in custody of sachin waze, he also destroy cctv footage)

संबंधित बातम्या:

सचिन वाझे तपासात सहकार्य करत नाहीत, मोबाईल घरी ठेवून आले, कुटुंबीयही गायब

सचिन वाझेंच्या घराला टाळं; कुटुंबीयही 10-12 दिवसांपासून गायब, NIA घराची झडती घेणार?

मुंबई पोलिसातील ‘त्या’ बड्या अधिकाऱ्याच्या चौकशीसाठी NIAची तयारी; दिल्लीतील तीन वरिष्ठ अधिकारी मुंबईत दाखल

मोठी बातमी: NIA चे अधिकारी सचिन वाझेंना पीपीई किट घालून चालायला लावणार

(scorpio was in custody of sachin waze, he also destroy cctv footage)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.