उद्धव ठाकरेंसमोर धर्मसंकट, या संघटनेकडून शिवसेनेच्या कोट्यातून जागांची मागणी

sambhaji brigade shiv sena ubt candidate: नांदेड उत्तरमधून मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार यांना उमेदवारी हवी आहे. त्यासाठी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज ठाकरे, गंगाधर बनबरे व सौरभ खेडेकर मुंबईत ठाण मांडून आहेत. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत संभाजी ब्रिगेडची युती आहे.

उद्धव ठाकरेंसमोर धर्मसंकट, या संघटनेकडून शिवसेनेच्या कोट्यातून जागांची मागणी
Follow us
| Updated on: Oct 21, 2024 | 4:11 PM

Sambhaji Brigade Shiv Sena UBT Candidate: महाविकास आघाडीचे जागा वाटप निश्चित झाले नाही. महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपावरुन वाद सुरु आहे. अनेक बैठकांमध्ये अजून शिवसेना आणि काँग्रेसमधील वाद मिटला नाही. त्यातच शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांच्यासमोर नवीन अडचण निर्माण झाली आहे. शिवसेनेच्या सोबतीला असलेल्या संभाजी ब्रिगेडने जागांची मागणी केली आहे. यामुळे पक्षातील दावेदार, काँग्रेस आणि आता संभाजी ब्रिगेड अशी तिहेरी अडचण उद्धव ठाकरे यांच्या समोर निर्माण झाली आहे.

या जागांची केली मागणी

शिवसेना उबाठा आणि संभाजी ब्रिगेड यांची युती आहे. आता या युतीचा वाटा संभाजी ब्रिगेड मागत आहे. संभाजी ब्रिगेडकडून उद्धव ठाकरे यांच्याकडे पाच जागांची मागणी करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेड चिखली, हिंगोली व नांदेड उत्तरच्या जागेसाठी आग्रह आहे. चिखलीतून पुरुषोत्तम खेडेकर यांच्या पत्नी माजी आमदार रेखाताई खेडेकर, हिंगोलीतून संभाजी ब्रिगेडचे राज्य अध्यक्ष अध्यक्ष मनोज आखरे इच्छूक आहेत.

नांदेड उत्तरमधून मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार यांना उमेदवारी हवी आहे. त्यासाठी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज ठाकरे, गंगाधर बनबरे व सौरभ खेडेकर मुंबईत ठाण मांडून आहेत. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत संभाजी ब्रिगेडची युती आहे. नांदेड उत्तरच्या जागेसाठी ठाकरे गटाचे पदाधिकारी ही मुंबईतच बसून आहेत.

हे सुद्धा वाचा

उद्धव ठाकरेंचे जिल्हाध्यक्ष अजित पवार गटात

शिरूर हवेली विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष इच्छूक उमेदवार माऊली कटके यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला आहे. प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे अजित पवार यांच्या उपस्थितीत माऊली कटके यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शिरूर लोकसभेत उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे. आता माऊली कटके यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच..
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच...
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'.
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्...
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्....
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्...
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्....
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्..
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्...
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल.
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली.
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल.
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?.
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी.