मोठी बातमी: मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजे मनसेप्रमुख राज ठाकरेंची भेट घेणार

आता संभाजीराजे आणि राज ठाकरे यांच्या भेटीत काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. | Sambhaji Raje Chhatrapati Raj Thackeray

मोठी बातमी: मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजे मनसेप्रमुख राज ठाकरेंची भेट घेणार
राज ठाकरे आणि संभाजीराजे छत्रपती
Follow us
| Updated on: May 27, 2021 | 1:11 PM

मुंबई:  गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी राज्यभरातील अभ्यासक, जाणकार आणि नेत्यांच्या भेटीगाठी घेत असलेले संभाजीराजे छत्रपती गुरुवारी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेणार आहेत. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास संभाजीराजे (Sambhaji Raje) राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी दाखल होतील, असे सांगितले जात आहे. मराठा आरक्षणावर राज ठाकरे यांची नेमकी काय भूमिका आहे, हे जाणून घ्यायचा संभाजीराजे यांचा प्रयत्न आहे. त्यासाठीच संभाजीराजे राज ठाकरे यांना भेटणार असल्याचे समजते. (Sambhaji Raje Chhatrapati will meet MNS cheif Raj Thackeray)

संभाजीराजे यांनी गुरुवारी सकाळीच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणासाठी शरद पवार यांच्यासह राज्यातील प्रमुख नेत्यांना एकत्र येण्याचे आव्हान केले होते. या पार्श्वभूमीवर आता संभाजीराजे आणि राज ठाकरे यांच्या भेटीत काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

पवारांच्या भेटीनंतर संभाजीराजे छत्रपती काय म्हणाले?

गेल्या तीन-चार दिवसांपासून मी राज्यभरात फिरून मराठा समाजाच्या भावना जाणून घेत आहे. आज शरद पवार यांना भेटलो तेव्हा मराठा समाज किती अस्वस्थ आणि दु:खी आहे, हे मी त्यांच्या कानावर घातले. त्यामुळे आता मराठा आरक्षणासाठी तुम्ही पुढाकार घेणे गरजेचे आहे. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नारायण राणे या सगळ्या नेत्यांनीही एकत्र आले पाहिजे.

शरद पवार यांनी या सगळ्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आता मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करेन. त्यानंतर शुक्रवारी रात्री आठ वाजता मी मुंबईत पत्रकारपरिषद घेऊन माझी भूमिका जाहीर करेन, असे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. संबंधित बातम्या:

Maratha Reservation: शरद पवार आणि संभाजीराजेंची अवघ्या 10 मिनिटांची चर्चा सकारात्मक कशी, विनायक मेटेंचा सवाल

‘श्रीमंत मराठ्यांना एक टक्काही आरक्षण नको, पण बहुजनांना जो न्याय, तोच गरीब मराठ्यांनाही द्या’

संभाजी छत्रपती आणि भाजपात मतभेद वाढतायत? पाटील म्हणतात, पक्षाने किती सन्मान दिला हे संभाजीराजे सांगत नाहीयेत!

(Sambhaji Raje Chhatrapati will meet MNS cheif Raj Thackeray)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.